
हिमायतनगर। लोकसभा निवडणूक होताच हिमायतनगर येथील स्मशानभूसाठी मंजूर करण्यात आलेला तब्बल 0.95 कोटी रुपये तर हदगाव नगरपरिषदेला 0.85 कोटी रुपये, किनवट नगरपरिषद 0.30 कोटी, माहूर नगरपंचायत 0.20 कोटी असा एकूण 2 कोटी 40 लाख रुपयाचा निधी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात हिंगोली नगरपरिषदेला 11 जून रोजी दिल्याचे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव श्रीकांत आडगे यांनी संबंधित नगरपंचायत, नगरपरीषदेला पत्र पाठवून कळविले आहे. हिंगोली लोकसभा महायुतीच्या पराभूत उमेदवारांना महायुतीच्या शासनाने तत्कालीन खा. हेमंत पाटील यांनी दिलेला निधी जैसे थे ठेवण्यात यश येईल का? याकडे हदगाव किनवट विधानसभा क्षेत्रातील जनतेचे लक्ष लागून आहे.


हिमायतनगरसह नांदेड जिल्ह्यातील उपरोक्त नगरपंचायत नगरपरिषदेला तत्कालीन खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून वैशिष्ट्य पूर्ण योजनेअंतर्गत हिमायतनगर येथील स्मशानभूसाठी 0.95 कोटी रुपये, हदगाव नगरपरिषदेला 0.85 कोटी रुपये, किनवट नगरपरिषद 0.30 कोटी, माहूर नगरपंचायत 0.20 कोटी असा एकूण 2 कोटी 20 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. दरम्यान लोकसभा निवडणूक लागली त्यामुळे ही मंजूर कामे सुरू करण्यासाठी टेंडर टाकता आलं नाही.

लोकसभा निवडणुकीत पक्षाने हेमंत पाटील यांची उमेदवारी डावलून त्यांच्या सौभाग्यवती राजश्री पाटील यांना वाशिम येथून उमेदवारी दिली होती. तर हिंगोली मतदार संघातुन बाबुराव कदम यांना उमेदवारी दिली होती. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांचा पराभव झाला. महायुतीचे उमेदवार पराभूत होताच मंजूर निधी हिंगोलीकडे वळविण्यात आल्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे. एकूणच आगामी काळात विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक होणार आहेत, या निवडणुकी डोळ्यासमोर ठेऊन शासन मोठ्या प्रमाण निधी वितरित करत आहे. मात्र मंजूर निधी अश्या प्रकारे निवडणूक होताच इतरत्र वळविला जात असंल्याने जनतेचा राजकीय नेत्यांवरील विश्वास उडू लागला आहे,


निवडणूक लागण्यापूर्वी हिमायतनगर येथील स्मशानभूसाठी बाबुराव कदम कोहळीकर याच्या माध्यमातून तत्कालीन खा हेमत पाटील यांनी निधी मंजूर केल्याचा आव त्यांच्या चाहत्यां कार्यकर्त्यांनी आणला होता. मात्र जोपर्यंत निधी उपलब्ध होऊन काम सुरू होईपर्यंत स्मशानभूमीसाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांनी विश्वास ठेवला नव्हता. आता तर उपलब्ध झालेला निधी अवघ्या आठ दिवसांत हिंगोलीकडे वळविल्याचे पत्र नगरपरिषदेला 11 जून रोजी दिल्याचे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव श्रीकांत आडगे यांच्या स्वाक्षरीनिशी संबंधित नगरपंचायत, नगरपरीषदेला पाठवून कळविले आहे. मंजूर करण्यात आलेला निधी इतरत्र हिंगोली नगरपरिषदेला वळविल्याबद्दल शहरवासीयांतुन तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे. हदगाव, हिमायतनगर, किनवट माहूर हे तालुके हिंगोली लोकसभा मतदार संघातील नव्हेत काय..? असा सवालही उपस्थित करून निवडणुकीनंतर मंजूर निधीला लावण्यात आलेली वळण विकास कामात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे.


लोकसभा निवडणुकीत पराभुत झालेले उमेदवार, शिवसेना जिल्हाप्रमुख (शिदेगट) यांनी त्यावेळी शासनाने दिलेला निधी रोखण्यासाठी अपयश आल्याचे दिसत आहे. ईतर विधानसभा क्षेत्रांचे तर सोडाच आपल्या हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे १ कोटी ८० लाख रुपये रद्द होतांना थांबविण्यासाठी काही प्रयत्न केला गेला नाही का? असा सवाल समोर येत आहे. हिमायतनगर येथील लकडोबा चौका शेजारील स्मशानभूमीसाठी निधी देण्याची घोषणा बाबुराव कदम कोहळीकर यांनी केल्याने त्यांचे हितचिंतक सांगत होते. पुर्वी दिलेला निधी जैसे थे ठेवण्यात यश आले नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार असलेल्या कोहळीकर यांना आता जनतेतून देखील नाराजीचा सामना करण्याची वेळ येणार एवढं मात्र खरे.



