
नवीन नांदेड| श्री हुजूर साहेब नांदेड सिडको साईबाबा नगर बिडी कॉलनी येथी ल साईबाबा मंदिर येथून द 6 ऑगस्ट रोजी शिर्डी कडे प्रस्थान करणार असून या पालखी सोहळ्यास खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आरती व मान्यवरांच्या उपस्थित या पदयात्रेची सुरूवात होणार आहे.


दर वर्षी प्रमाणे सलग 13 व्या वर्षी नांदेड हुजूर साहेब ते शिर्डी पालखी सोहळा सिडको येथून प्रस्थान करणार आहे,या पदयात्रेत जवळपास १०० भाविक भक्त सहभागी होणार असून ही यात्रा ४१७ किलोमीटर आहे,यात पहिल्या दिवशी सिडको ते मरळक, आरळ, परभणी, पाळोदी, पाथरी, आष्टी, पिपरखेडा, घुंगरडे, हदगाव, ऊचेगाव, पैठण, भायेगाव, नेवासा मार्ग शिर्डी २० आगस्ट रोजी ही पदयात्रा पोहचणार आहे.

६ आगस्ट रोजी या पदयात्रा शुभारंभ खासदार अशोकराव चव्हाण ,माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर ,नांदेड भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे. या शुभारंभ सोहळ्याला परिसरातील नागरिक अध्यक्ष गणेश शामलाल जयस्वाल व ऊपाध्यक्ष मारोती वाघमारे ,साईबाबा पालखी सोहळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.





