भारतीय स्वातंत्र्य आंदोलन जरी 1857 ला सर्वप्रथम राष्ट्रीय उठावाच्या माध्यमातून आणि महात्मा गांधींजी यांच्या नेतृत्वाखाली गो- बॅक ब्रिटीश, इंग्रज चले जाव आदी आंदोलने प्रखरतेने झाले. सदरील आंदोलनात क्रांतीकारकांच्या आवाहनावरुन अनेक दलित महिलांनी राष्ट्रीय उठावाच्या प्रदर्शनामध्ये स्वातंत्र्य आंदोलनात उत्स्फुर्तपणे सक्रियतेने योगदान दिले आहे. विशेषतः दलित महिलांचे योगदान विशेष नोंद घेण्यासारखी बाब आहे. इतिहासामध्ये असे अनेक उदाहरणे आहेत. दलित आणि शोषित समाजाच्या महिलांनी आपापल्या परीने गाव, मोहल्ला, शहर, महानगर आदी ठिकाणी ब्रिटीशांना अतिशय प्रखरतेने विरोध दर्शवला.


डब्ल्यू गार्डन अलेक्झांडरने सिकंदरबागच्या किल्ल्यावरुन काही दलित मर्दानी महिलांना स्वातंत्र्य आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तत्कालीन 1857 च्या राष्ट्रीय उठावात दलित, मागासवर्गीय, शोषित, आदिवासी आदी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय क्रांतिकारी पाऊल ठेवले. त्यामुळे अनेक जुलूमकारी ब्रिटीशांची व्यवस्था महिलांनी आपल्या हिंमतीवर हुसकावून लावली.


उदा. डुकरांची चरबी लावलेले बंदुकीचे काडतुस त्या काळात भारतीय जवानांना स्वतःच्या तोंडाने काढावे लागत असे. त्यामुळे मुस्लिम आणि हिंदू महिलांना या बाबी खेदजनक, अन्यायकारी वाटत होत्या. त्याच्या विरोधात मंगल पांडेंनी जसा आवाज उठविला त्याच्याही अगोदर दलित मर्दानी वीरांगणा आदींनी ब्रिटीशांच्या या चुकीच्या धोरणावर कडाडून हल्ला केला. आंदोलनाच्या माध्यमातून ब्रिटीशांना जाब विचारला. त्याचाच एक भाग म्हणून दलित महिलांनी सार्जेट थॉम्स मिशन सर्वप्रथम व्यक्ती यांच्या विरोधात महिलांनी जोरदार विरोध केला. सिकंदरबाग किल्ल्याच्या परिसरात दलित महिलांनी मोठ्या प्रमाणात इंग्रजांच्या विरोधात घेराव घातला.


त्यामुळे तत्कालीन इंग्रज लेखकांनी सदरील महिलांना ब्लॅक अॅक्ट म्हणून टार्गेट केले. तरीही दलित वीरांगणा न डगमगता एक पाऊल पुढे सरसावत महिलांचे आंदोलन अधिक तीव्र केले. या संदर्भात विल्यम रसेल द्वारा 1857 चा राष्ट्रीय उठाव आणि लंडन टाईम्स या इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्रात सिकंदरबाग आणि साहसी महिलांचे तोंडभरुन कौतुक केले.1857 चे राष्ट्रीय आंदोलन हे स्वातंत्र्याची पहि वात ज्या दलित महिलांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, जीवाची पर्वा केली नाही, अशा उदाबाई पासी, महात्रिवेदी भंगी, लाजो सहेज आदी महिलांनी या उठावात तन- मन- धनाने सहभाग नोंदविला.

जे इंग्रज अधिकारी उदादेवी जे की पारसी समाजातून पुढे आली होती. 8 मे 1857 ला होनाजी महिला क्रांतीकारी सहकार्यांच्या सोबत शहीद झाल्या होत्या. उदादेवी पारसी, बेगम हजरत महल यांच्याकडून स्थापित झालेल्या महिला सेनेची सुप्रिमो होती. अर्थात सेनापती होती. महाराणी लक्ष्मीबाई द्वारा स्थापन झालेल्या महिला सैनिकांच्या तुकडीचे दुर्गादासची सेनापती झलकारीबाई कोरी ही होती. या जुन्या संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात दलित महिला सहभागी होत्या. अशोकमध्ये एक आश्वर्यकारक घटना घडली. 1857 मध्ये क्रांतीसेनेमध्ये भाग घेतलेल्या दलित महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक होती. ही बाब कोणत्याही इतिहासकाराने नोंद घेण्यासारखी आहे आणि सर्व समाजासाठी गर्वाची बाब आहे.
सिकंदरबागमध्ये जमीनीवर 53 हजार विद्रोही सेना इंग्रज कमांडर इन चिफ यांना कानोकानी माहिती मिळाली. याचबरोबर सिकंदरबागमध्ये रक्षक पारसी महिला दलाचे सर्व नवाबी जनानी सेना शेवटी बादरी नजीब पारसी, दलित वीरांगणा यांच्यासोबत नवीन फौज अख्तरी, बाद्री, नजीब आणि पारशी समाजातील अनेक महिला वीरांगणाचे खूप मोठे योगदान होते. काही आफ्रिकन महिला या वाजीद यांच्यासोबत हातमिळवणी केली आणि या पारसी महिलांना अर्थात ब्लॅक कॅट म्हणून ओळखल्या जाणार्या पारशी, दलित, भंगी इत्यादी महिलांना ही बाब वार्ता समजली. मग सिकंदरबागला एका बाजूला गोमती नदी आणि दुसर्या बाजूला कॅनॉल, पश्चिम दिशेला क्रांतीकारी महिला यांची घेरावबंदी फौज तैनात होती. ही वार्ता इंग्रज सुरक्षा अधिकार्यांना समजताच त्यांनी सिकंदरबागवर विद्रोही सेना यांचा मुकाबला करण्यासाठी त्यांना हुसकावून लावण्यासाठी ब्रिटीश फौज तैनात केली. ब्रिटीशांच्या फौजांना सळो की पळो करुन सोडले होते. ही प्रेरणादायी बाब नाकारता येत नाही.
आशा उदादेवीला इंग्रजांनी ब्लॅक कॅट म्हणत होते. शहीद वीरांगणा उदादेवी पारशी समाजातून आपल्या पोषपूर्ण पुस्तकात सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणादायी महिलांस्त्रोतांमध्ये पृष्ठ क्रं. 198 वर अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन महामहीम राज्यपाल माताप्रसाद लिहितात की, मे महिन्यात क्रांती आंदोलन झाले. त्या क्रांती आंदोलनात अनेक दलित महिलांना स्थानबद्ध केले होते. तरीही भूमीगत राहून इंग्रजांवर तुटून पडणार्या या दलित महिला होत्या. ही बाब लखनौ रेसिडेन्सीमध्ये जिथे इंग्रज परिवार मुक्काम ठोकून राहत होते. त्या विश्रामालयाला या ब्लॅक कॅटनी लिलया घेराव घातला आणि इंग्रजांना तेथून पळ काढण्यास मुश्किल केले. बेगम हजरत महल, राजा बेनीमाधवसिंह, राजा जयलालसिंह, भमखो, हिसामुदोला, बेनी माधवसिंह यांनी इंग्रज अंगरक्षकांनी पारशी महिलांना पूर्ण सहकार्य केले.
महूजाबाद या राज्याचे राजा नवाब अली खान यांनी आणि राजा दुर्गाविजयसिंह किल्ला उमरगड (उत्तरप्रदेश) आदी पाच- पाच सैनिकांना तयार करुन बेगम हजरत महल यांच्या सहकार्यासाठी सुरक्षा कमांडो पाठविण्यात आले. त्यावेळेस जनरल हायवलाक 23 ऑगस्ट 1857 ला कानपूर येथे गेले आणि एका महिलेने पूर्ण तयारीनिशी एक मोठी सेना आलबागमध्ये पाठवली. त्या सेनेने बारुदांचा वर्षाव इंग्रज अधिकार्यांवर त्या चार दरवाजांवर तोफांचा वर्षाव केला. त्यामध्ये दोनपेक्षा जास्त सैनिक शहीद झाले. अनेक ब्रिटीश अधिकारी 25 सप्टेंबर ब्रिटीश रेसिडेन्सीला पोहोचले. त्यावेळेस आदिवासी महिलांनी त्यांना घेराव घातला. 11 जुलै 1857 मध्ये लेफ्टनंट कॅम्पबेल इस्ट इंडिया कंपनीचा कमांडर चिफ म्हणून लखनौत आला. 3 ऑक्टोंबरला कोलकाताहून इलाहाबाद मार्गे तो कानपूरला पोहोचला. दुसर्या इंग्रज सैनिकांनी होपाग्रॅण्ड मुसरी सेना घेऊन लखनौच्या दिशेने गेले.
आलबागमध्ये बेगम हजरत महल आपल्या महिला सैनिकांसोबत इंग्रजांचा चांगल्या प्रकारे मुकाबला करीत होत्या. त्यावेळेस अनेक ब्रिटीश अधिकारी शहीद झाले. उदादेवी मक्का येथे शहीद झाले. परंतु प्रतिहिंसा ब्रिटीशांचा कडा मुकाबला या महिलेने जिवात जिव असेपर्यंत केला आणि त्यावेळेस काही महिलांनी शपथ घेतले की, उदादेवीच्या मृत्यूचा बदला अनेक इंग्रज अधिकार्यांनी 16 नोव्हेंबर रोजी सिकंदरबागेमध्ये ब्रिटीश सेना आणि दलित महिला क्रांतीकारी यांच्यात रणसंग्राम घडून आला आणि उदादेवी सिकंदरबागमध्ये पिंपळाच्या झाडावर दबा धरुन बसली होती आणि झाडाखाली पाण्याच्या घागरी भरुन ठेवल्या होत्या. जेथे इंग्रज सैनिक पाणी पिण्याच्या हेतुने व आराम करण्याच्या हेतूने दुपारच्यावेळेस त्या पिंपळाच्या झाडाखाली येतील ही रणनिती होती आणि ती यशस्वी झाली. 16 नोव्हेंबरला इंग्रज सैनिक लढाईच्या ठिकाणापासून काही अंतरावर पाणी न मिळाल्यामुळे ते सर्व पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसले. त्यावेळेस उदादेवी एकाएकाला टिपून आपल्या गोळ्यांचा निशाणा करु लागली आणि या हल्ल्यामध्ये 36 ब्रिटीश सैनिक ठार झाले.
या लोकांसोबत उदादेवी बंदुक चालवून अनेक ब्रिटीश सैनिकांना मरणाच्या दाढेत ढकलले. अशाप्रकारे माहेश्वरी, महोतराणी, नावाच्या कौर, भगवती देवी, इंद्रकौर, कुशलदेवी, राजशोभादेवी, सब्जीवाल्या महिला होत्या. या सर्वांनी शिलादेवीसोबत स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये अनेक ब्रिटीश सैनिकांना नामोहरम करुन आपल्या स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. अशा थोर, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, पारशी आणि इतर जाती- जमातीतील अनेक महिला स्वातंत्र्य आंदोलनात उत्साहाने सहभाग घेतला हे इतिहासाच्या पानोपानी सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतल्याचे दर्शवते. अशा थोर महिला वीरांगणांना आजच्या स्वातंत्र्यदिनी विनम्र अभिवादन आणि त्यांच्या मर्दानी कार्यास मानाचा मुजरा!
– मारोती भु. कदम, नांदेड.
मो. 9049025351


