नांदेड| मांजरम गावची पाणीपुरवठा योजना निर्मितीत अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे अपूर्ण राहिलेली आहे. या योजनेच्या विरोधात अनेकदा गावकऱ्यांनी निवेदने दिली होती. गावामधील लोकांनी हंडा मोर्चा आंदोलन सुद्धा केले होते.


तरीपण अद्याप संबंधित कंत्राटदारावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. त्यामुळे आज मुंबई येथे चालू असलेल्या अधिवेशन काळात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.


संतोष कन्स्ट्रक्शन व रोहित कन्स्ट्रक्शन आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने मांजरम गावची पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ केलेला आहे. शासनाला आमची नम्र विनंती आहे, संबंधित कंत्राटदारावर व अधिकार्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि महत्वकांक्षी गावची पाणीपुरवठा योजना यशस्वी करावी हीच आमची मागणी आहे. सरकारने जर योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही कायदेशीर लढाई न्यायपालिकेत लढणार आहोत. अशी प्रतिक्रिया पांडुरंग शिंदे मांजरमकर, नायगाव तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प)यांनी दिली.




