Due to heavy rain : सिडको परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरावरील पत्रे उडून पडली,कुठलीही जीवितहानी नाही

नवीन नांदेड़| सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सिडको येथील,शंकरनगर परिसरातील सम्यक नगर येथे राहणाऱ्या लक्ष्मी अमोल मेडपलिवार यांच्या निवासस्थाना वरील पत्रे उडून पडल्याने घराची पडझड संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरातील कोणालाही मार लागला नसुन अचानक झालेल्या नुकसाना बदल नांदेड़ तहसीलदार संजय वारकड यांनी माहिती दिल्यानंतर यांनी त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिले असून वाघाळा तलाठी सज्जा वानोळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.


बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे पावसाने सम्यक नगर येथील मेडपलिवार यांच्या निवासस्थानी असलेले पत्रे उडून खाली ऊडुन संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सदरील घटनेबाबत सहायक आयुक्त मिर्झा बेग, पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी चर्चा केली घटना स्थळी तलाठी एस.ए.वानोळे सहायक व्यंकट इंगले,विजय जोंधळे यांनी पंचनामा केला,असून लक्ष्मी अमोल मेडपलिवार यांच्या घरातील छताचा पंखा, कूलर, टेबल टीव्ही व घरातील संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसान झाले.

सदरील घटना घडली यावेळी घरातील सात सदस्य होते यात एक गरोदर माता पण होती, आजुबाजुच्या नागरीक यांनी सहकार्य करून सारवा सारव करून संबंधित परिवाराला दिलासा देऊन सदरील घटना वाघाळा तलाठी सज्जा यांना कळवली, घटनास्थळी तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल तहसीलदार संजय वारकड यांना पाठविला आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते गणेश जयस्वाल, गजाननसिंह चंदेल यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.





