हदगाव, गौतम वाठोरे l राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी हदगाव शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरव वाडेकर यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना व्यक्त केले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप. अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश चामनीकर. गटविकास अधिकारी कैलास बळवंत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे. विविध कार्यालयाचे अधिकारी व शहरातील अनेक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी पत्रकार बांधव उपस्थित होते.


पुढे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप यांनी सुद्धा माहिती दिली ते म्हणाले उद्या १० नोव्हेंबर पासून निवडणुकीचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे ते १७ नोव्हेंबरच्या दुपारी साडेतीन वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत १८ नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी तर १९ ते २१ पर्यंत तर २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप होणार आहे २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


हदगाव नगरपरिषद अंतर्गत १० प्रभाग असून २० सदस्य अणि एक नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून निवडणूक होणार आहे. शहरात २७ मतदान केंद्रात मतदान होणार आहे. नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे आचारसंहितेचे भंग करणाऱ्या विरोधात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे.


मतदारांनी भयमुक्त वातावरणामध्ये मतदानाचा हक्क बजवाव शक्यतो सकाळच्या सतरात मतदान करावे व मतदानाचा टक्का वाढवावा मतदाराला काही अडचण असल्यास प्रत्येक ठिकाणी बी एल ओ हे मतदार यादी घेऊन उपस्थित राहणार आहे मतदारांनी मतदानापासून वंचित राहू नये निवडणुकीसाठी आमची पूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप यांनी सांगितली शुक्रवार ७ रोजी झालेल्या बैठकीला नागरिकांनी व विविध पक्षाच्या प्रतिनिधीने प्रतिसाद दिला



