नांदेडकरियर

Zilla Parishad Fake Transfers ; जिल्हा परिषदेतील बदल्यांमध्ये खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करून कार्यवाही करा-माधवराव पा.देवसरकर

नांदेड। नांदेड जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील कर्मचारी, अधिकारी, ग्रामसेवक, केंद्र प्रमुख व शिक्षक यांच्या होत असलेल्या सार्वत्रिक बदल्यात स्वतःचे, पत्नीचे, पाल्याचे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र काढून संवर्ग एक मधून लाभ घेतलेल्यांची जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथून शारीरिक तपासणी करून बोगस दिव्यांगावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी माधवराव पाटील देवसरकर यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

नांदेड जिल्ह्यात खोटे दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्याचे मोठे रॅकेट असून एका प्रमाणपत्रास एक लाख रूपये देऊन अनेक अधिकारी-कर्मचारी यांनी स्वतः किंवा पत्नीचे, पाल्याचे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र काढून आपल्या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग, आरोग्य, बांधकाम (दक्षिण/उत्तर/मध्य), कृषी विभाग, पाणी पुरवठा, महिला व बालविकास विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी या वर्षीच्या सार्वत्रिक बदलीमध्ये लाभ घेतलेला असून शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये लाभ घेऊन मनासारखी गावे घेत आहेत. यामुळे खर्‍या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अन्याय होत आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचे फार मोठे रॅकेट जिल्ह्यात असून यात अनेक अधिकारी, कर्मचारी यांचा हात आहे. यातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत आहे. याची चर्चा जनमानसात होत आहे.

IMG 20250615 WA0024 Zilla Parishad Fake Transfers ; जिल्हा परिषदेतील बदल्यांमध्ये खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करून कार्यवाही करा-माधवराव पा.देवसरकर

तरी या सर्व दिव्यांग कर्मचारी, अधिकारी यांची व त्यांची दिव्यांग पत्नी किंवा पाल्य यांची शारीरिक तपासणी जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथील वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्यात यावी. सर्व कर्मचारी, शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक, क्लार्क, इंजिनीअर यांची तपासणी न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही माधवराव पाटील देवसरकर यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!