Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - मुंबई - Union Home Minister Amit Shah – पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
मुंबई पुणे महाराष्ट्र October 6, 2025

Union Home Minister Amit Shah – पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभ
NNL TeamBy NNL TeamOctober 6, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

शिर्डी| अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली.

लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभप्रसंगी श्री. शाह बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री शाह म्हणाले, केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ३ हजार १३२ कोटींची मदत मंजूर केली आहे. यापैकी एप्रिलमध्ये १ हजार ६३१ कोटी वाटप करण्यात आले असून, यात महाराष्ट्रासाठी २१५ कोटींचे विशेष मदत पॅकेज देण्यात आले आहे. कर्जवसुलीवर तात्पुरती स्थगिती व विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये सवलती यांसारखे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मविभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार आंदोलन, ग्रामीण विकास व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेले कार्य अभूतपूर्व आहे. त्यांच्या कार्याच्या पायावर आज महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र उभे आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ व वैकुंठभाई मेहता यांनी सहकार चळवळीची पायाभरणी केली. विखे पाटील यांनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पाया रचला. व्यापाऱ्यांच्या घरात जाणारा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जाऊ लागला.

डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये वित्त राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांनी आरबीआयमार्फत गुजरातमधील सहकारी बँकांना वाचविणारे महत्त्वपूर्ण ‘रिव्हायव्हल पॅकेज’ मिळवून दिले, असे श्री. शाह म्हणाले. १९५१ मध्ये ५० टन क्षमतेने सुरू झालेला डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आज ७ हजार २०० टन क्षमतेने कार्यरत आहे. लवकरच त्याची क्षमता १५ हजार टनांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. १९७० मध्ये स्थापन झालेल्या डिस्टिलरीची क्षमता १५ केएलपीडी वरून ९० केएलपीडीपर्यंत वाढली असून २४० केएलपीडीपर्यंत विस्तारास मंजुरी देण्यात आली आहे. बायोगॅस संयंत्राची क्षमता १२ हजार घनमीटरवरून ३० हजार घनमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. को-जनरेशन प्लांटमधून ८ मेगावॅट वीज निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा १० हजार कोटींहून अधिक प्राप्तिकर माफ केला आहे. यामुळे सहकारी साखर कारखान्यांवरील वार्षिक १०० कोटींचा कर भार दूर झाला आहे. साखर उत्पादनासाठी लागणाऱ्या मोलायसिसवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला असून ३९५ वस्तूंवरील जीएसटी दरही घटविण्यात आले आहेत. सहकारी साखर कारखान्यांनी मल्टी-फीड इथेनॉल प्रकल्प उभारावेत, ज्यातून मका व तांदळापासूनही इथेनॉल तयार करता येईल. अशा प्रकल्पांसाठी केंद्र सरकार कर्ज उपलब्ध करून देईल व इथेनॉल खरेदीत सहकारी संस्थांना प्राधान्य दिले जाईल, असेही श्री. शाह यांनी सांगितले. भारताला जगात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी या दिवाळीत आपण सर्वांनी एकत्र येऊन घरात कोणतीही परदेशी वस्तू आणणार नाही असा संकल्प करावा. देशातील १४० कोटी लोकांनी व व्यापाऱ्यांनी ‘मेक इन इंडिया’चा अंगीकार केला, तर २०४७ पूर्वी भारत जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असेही शाह यांनी नमूद केले.

नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्याचा दुष्काळ दूर करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सहकाराची चळवळ रुजवली आणि  आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी जल नियोजनाच्या संदर्भात महाराष्ट्रात जागृती घडवून आणली. या दोघांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण हे ‘पद्मस्मरण’ आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखान्याने १० हजार टीपीडीपर्यंत आता मजल मारली आहे.  ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र सहकाराची पंढरी आहे. या क्षेत्राच्या विकासाचे श्रेय  डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांना जाते. त्यांनी सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे उभा राहिला. महाराष्ट्रामध्ये ज्या-ज्या भागात सहकार चळवळ पोहोचली, सहकारी साखर कारखाने पोहोचले, तिथला शेतकरी समाधानी झाला आणि त्या ठिकाणचे औद्योगीकरणदेखील चांगल्याप्रकारे झाले, इथला शेतकरी संपन्न झाला.

 पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार चळवळ पुढे नेण्यासोबत जलसंवर्धन चळवळ महाराष्ट्रात रुजविण्याचे कार्य केले. राज्य शासनाने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्याचा आणि त्यातून राज्यातील दुष्काळ दूर करण्याचा निश्चय केला आहे. विदर्भामध्ये वैनगंगा – नळगंगा, तापीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणायचं काम,  उल्हास खोऱ्यातले समुद्रात वाहून जाणारे ५४ टीएमसी पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि गोदावरीच्या खोऱ्यातला दुष्काळ दूर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पुढच्या पाच ते सात वर्षात टप्प्या टप्प्यानं हे संपूर्ण पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर नाशिक, अहिल्यानगर परिसर आणि  मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ असेल असे कार्य राज्य शासन करेल, असे मुख्यमंत्री विश्वासाने म्हणाले.

 प्रधानमंत्री मोदी यांनी पहिल्यांदा सहकाराचे महत्त्व समजून घेतलं आणि स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले आणि सहकारातला कार्यकर्ता म्हणून पहिले सहकार मंत्री म्हणून श्री.शाह यांना जबाबदारी देण्यात आली. सहकारमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी वेगाने निर्णय घेऊन या क्षेत्रातील धु्रिणींना चकित केले. राज्यातल्या सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ८ ते १० हजार कोटींची मदत देण्यात आली. सहकार चळवळ रुजविण्याचे कार्य केंद्र सरकारच्या चांगल्या निर्णयाने होत आहे. साखर कारखान्याच्या सर्क्यूलर इकॉनॉमी विकसित करण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. साखर कारखान्याचा मालक शेतकरी आहे, म्हणून त्याच्या पाठीशी शासन उभे राहील, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत असून लवकरच भरीव मदत करण्यात येईल, यात केंद्र सरकारचेही सहकार्य मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

लोणी – प्रवरानगर देशातील ग्रामीण विकासाचे मॉडेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, लोणी-प्रवरानगर परिसरातून महाराष्ट्रातला नाही तर देशाला सहकाराचा वारसा मिळाला. शेतकरी संघटित होऊन आणि एकजुटीने क्रांती घडवू शकतो हे या भूमीने दाखवून दिले. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकार क्षेत्रातील साखर कारखाना उभारून सहकाराची क्रांती घडवून आणली.शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे, त्यांची मुलं शिक्षण घेऊन पुढे जावेत म्हणून विठ्ठलरावांनी संपूर्ण आयुष्य वेचलं आणि त्यांचा हाच वारसा लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जीवापाड जपला. त्यांनी सहकार, शेतीपुरते कार्य मर्यादित न ठेवता प्रवरा मेडिकल कॉलेज, प्रवरा को-ऑपरेटिव्ह बँक, शैक्षणिक संस्था कृषी व आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यालाच खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली आहे. त्यानंतरही पुढील पिढीने हे कार्य पुढे नेल्याने आज लोणी-प्रवरानगर देशातील ग्रामीण विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाते.

सहकारमंत्री श्री. शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राची वेगाने वाटचाल सुरू आहे.  जुन्या परंपरा आणि नवतंत्रज्ञान, नवसंशोधन याची सांगड घालण्याचा प्रयत्न होतं आहे. साखर उद्योगांमध्ये पारदर्शकता आणण्यासोबत  इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यात आली आहे.  त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळाला पाहिजे असे केंद्राचे प्रयत्न आहेत. सहकाराच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर होईल, महाराष्ट्र आत्मनिर्भर होईल यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे मदत मिळेल असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

सहकारच्या प्रवासाला दिशा देणारा क्षण – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला आणि त्यामुळे महाराष्ट्राचा देशातल्या सहकारी साखर कारखानदारीला नवी दिशा मिळाली, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध झाला. तर देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून अमित शाह यांनी  साखर कारखान्यांना प्राप्तिकर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. म्हणून सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील या सहकार चळवळीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणे हा दुग्ध शर्करा योग आहे.  सहकाराच्या प्रवासाला एक नवीन दिशा देणारा हा एक महत्वाचा क्षण आहे, सहकारच्या शतकातले एक सुवर्णपान आहे.

शेतकऱ्याला आपली ताकद

ओळखायला लावायची आणि सहकारच्या माध्यमातून त्याला सशक्त करायचं या विचारातूनच आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला उभा राहिला. हा केवळ उद्योग नव्हता तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभबिंदू होता. आज या कारखान्याची क्षमता वाढत असताना शेतकऱ्यांनाही नवे तंत्रज्ञान स्वीकारून उत्पादन वाढवावे लागेल. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आली, त्यांच्या मदतीने शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, ग्रामीण भागामध्ये लक्ष्मी बरोबरच सरस्वतीदेखील नांदू लागली. सहकार चळवळ अडचणीत येत असताना केंद्र सरकारने ‘सहकारातून समृद्धी’ ही संकल्पना व्यवहारात आणली. मोलायसिसवरील कर २८ टक्क्यावरून ५ टक्क्यावर आणण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. नव्याने स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील संस्थानमुळे राज्याच्या सहकार क्षेत्राला संजीवनी मिळाली आहे, असे श्री. पवार म्हणाले. नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी लवकरच पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येईल, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. सहकारमंत्री प्रवरानगरमध्ये दुसऱ्यांदा येत आहेत. देशातील पहिल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी ते सक्षमपणे सांभाळत आहेत. केंद्र शासनाच्यावतीने सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम केले जात आहे. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनींच्या नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्याचे काम राज्य शासन करत आहे. येत्या काळात राज्य निश्चितच दुष्काळमुक्त होईल. सहकार चळवळीच्या विचारांशी कधीही प्रतारणा होऊ दिली जाणार नाही.

प्रवरा उद्योग समूहाच्यावतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.याप्रसंगी आमदार रविंद्र चव्हाण, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे, अमोल खताळ, आशुतोष काळे, किरण लहामटे, विक्रम पाचपुते, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील,  माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते.

Central Government to flood-affected farmers Union Home Minister Amit Shah will provide substantial assistance
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShri Sai Baba Samadhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन
Next Article Reservation : पंचायत समित्यांच्या राखीव सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Jijau statue : राष्ट्रमाता जिजाऊ पुतळ्याच्या स्तंभ बांधकामाचे भूमिपूजन; हदगाव नगरपरिषदेत उद्यान सुशोभीकरणाला सुरुवात

Budget 2026-27 : विकसित महाराष्ट्र 2047 च्या ध्येयावर आधारित 2026-27 चा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Establish Damini squad to protect girls : रोडरोमिओंच्या जाचंपासून मुलींची सुरक्षा करण्यासाठी दामिनी पथक स्थापन करा – मुन्ना शिंदे यांची मागणी – NNL

January 5, 2025

In Maharashtra State Road Transport Corporation : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात; ए‍क वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती

February 24, 2025

Hambarde’s demand for road in Nur Masjid area ; पंचेविस वर्षे नंतर सिडको परिसरातील नुर मस्जीद भागात सिमेंट काँक्रीट रस्त्याची मागणी आ.हंबर्डे यांनी केली मागणी मान्य – NNL

September 16, 2024

Ms. Jayashree Sanjay Patil Ingle ; नांदेड जिल्हा गावकामगार महिला पोलीस पाटील संघटनेच्या नांदेड तालुका अध्यक्षपदी सौ.जयश्री संजय पाटील इंगळे यांच्यी नियुक्ती – NNL

September 20, 2024
Advertisement
टॉप बातम्या

farmers : मान्सूनपूर्व पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

Apeel Belkhode ; देवाभाऊ फाउंडेशनचे तालुका सह-समन्वयकपदी अपील बेलखोडे यांची नियुक्ती

Maharashtra New Model of Women Empowerment : महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू -NNL

Guru Teghbahadur : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त मैदानावर भव्य श्रमदान

Agricultural Technology course have started : कृषि तंत्र पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?