Thursday, May 14

स्पोर्ट्स

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

sports competition | जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत बिलोली तालुक्याचे वर्चस्व – NNL

sports competition | जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत बिलोली तालुक्याचे वर्चस्व – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्याने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावर्षीही या स्पर्धेमध्ये या तालुक्यातील शिवाजी हायस्कूलने आपली आगेकूच कायम ठेवली आहे. सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली,आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नांदेड, जिल्हा क्रीडा परिषद,नांदेड मार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा अंतर्गत सबज्युनियर 15 वर्षे मुले व ज्युनियर 17 वर्षे मुले-मुलींचे स्पर्धाचे आयोजन दि. 11 व 12 जुलै,2024 या कालावधीत ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल, निळा रोड, नांदेड येथील मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन शिनेजो जोसे, प्राचार्य, ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल, निळा रोड, नांदेड व जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी...
पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड -NNL

पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड। येत्या सप्टेंबर महिन्यात पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडची भुमिकन्या, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हिची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू आहे. नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेली भाग्यश्री माधवराव जाधव हिने चीन, दुबई, पोर्तुगाल, मोरक्को, पॅरिस, जपान येथे झालेल्या जागतिक पातळीवरील दिव्यांग क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राबरोबर देशाचे प्रतिनिधीत्व करून पदकांची लयलूट केली आहे. सदर स्पर्धांमध्ये आपल्या क्रीडा कौशल्याने भारताचा नावलौकिक केला आहे. बंगळूरू, नवी दिल्ली, गोवा येथे वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांवर आपले नाव कोरत तिने महाराष्ट्राची शान राखली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा ...
टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

स्पोर्ट्स
मुंबई|भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून, कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वविजेत्या भारतीय संघावर कौतुकाची उधळण केली. तसेच भारतीय संघासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने अकरा कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले. मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मासह, त्याचे सहकारी सुर्यकूमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम् दुबे, प्रशिक्षक पारस म्हाब्रे, संघ व्यवस्थापक अरूण कानडे यांचा आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला. खचाखच भरलेले हे मध्...
ट्वेंटी-ट्वेंटीच्या अंतिम फेरीत हिंदुस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर क्रीडा रसिकांचा अभूतपूर्व जल्लोष -NNL

ट्वेंटी-ट्वेंटीच्या अंतिम फेरीत हिंदुस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर क्रीडा रसिकांचा अभूतपूर्व जल्लोष -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड। क्रिकेट ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हिंदुस्तान ने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांच्यातर्फे लावण्यात आलेल्या मोठ्या पडद्यावर क्रिकेट सामना पाहण्यासाठी जमलेल्या क्रीडा रसिकांनी अभूतपूर्व जल्लोष करत रोहित शर्मा च्या टीमचे अभिनंदन केले. भाजपा नांदेड महानगर व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , अमरनाथ यात्री संघाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता .खा. अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, ला. योगेश जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियम मध्ये बसल्याचा आनंद मोफत लुटण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. भाजप वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक डॉ. सचिन उमर...
तालुका क्रीडा संकुलासाठी ४ कोटी ९९ लाख रुपये मंजूर; आ.भिमराव केराम यांच्या प्रयत्नांचे मोठे फलित -NNL

तालुका क्रीडा संकुलासाठी ४ कोटी ९९ लाख रुपये मंजूर; आ.भिमराव केराम यांच्या प्रयत्नांचे मोठे फलित -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
श्रीक्षेत्र माहूर। माहुर येथील तालुका क्रीडा संकुलासाठी शासनाने ४ कोटी ९९ लक्ष रुपये मंजूर केले आहे. किनवट /माहूर विधानसभा मतदार संघाचे कार्यकुशल आ.भिमराव केराम यांच्या प्रयत्नांचे मोठे फलित असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लवकरच क्रीडा संकुलाचा मुहूर्त साधला जाईल अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे यांनी दिली आहे. माहुर तालुक्यात विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंची वाढती संख्या, सोई,सुविधा,साधने, मैदान, अनुभवी प्रशिक्षक आदी बाबींचा अभाव व अनेक स्पर्धेतून क्रीडा क्षेत्रात माहुर तालुक्याचे नाव मोठे करणाऱ्या खेळाडूंची गरज लक्षात घेऊन आ.भिमराव केराम यांनी क्रीडांगण आणि क्रीडा संकुलासाठी अविरतपणे पाठपुरावा केला होता. पांडवलेणी जवळील २-५० एकर शासकीय जागेत सदर क्रीडा संकुल उभारले जाणार आहे.क्रीडा संकुलाचा मार्ग प्रशस्त करून दिल्याबद्दल नगरसेवक सागर महामुने,अनिल वाघमारे यांचेसह ...
जागतिक किर्तीचे शरीरसौष्ठवपट्टू व अभिनेता अनुप सिंग यांच्या हस्ते होणार लोकार्पण ..! -NNL

जागतिक किर्तीचे शरीरसौष्ठवपट्टू व अभिनेता अनुप सिंग यांच्या हस्ते होणार लोकार्पण ..! -NNL

स्पोर्ट्स, नांदेड
नांदेड। येथील नव्यानेच उभारण्यात आलेल्या भव्य अशा महात्मा फुले मार्केट आयआयटी रोड येथे आजघडीची नांदेडमधील सर्वात आलिशान जिम असलेल्या व्हीएफसी हेल्थ क्लब चे उद्धाटन जागतिक किर्तीचे शरीरसौष्ठवपट्टू अनुप सिंग यांच्या हस्ते उद्या सोमवार दि. १ जुलै रोजी सायकांळी ५ वा. होणार आहे, व्हीएफसी हेल्थ क्लब येथे तुम्ही तुमच्या फिटनेस ध्येयांची सहज पूर्तता करण्यासोबतच शरीराला अतुलनीय सुरेखता देण्यासाठी येथील उच्च-स्तरीय सुविधांचा लाभ आनंददायी व आल्हाद दायक वातावरणात घेऊ शकणार आहेत .. शहरातील नामाकिंत डॉक्टर असलेल्या देशमुख कुंटूबिंयापैकी डॉ पंकज देशमुख यांनी व्यायामाच्या आवडीतून आणि पुढाकारातून व्हीएफसी हेल्थ क्लब या अदयायावत आणि आधुनिक हेल्थ क्लबची मुहूर्तमेढ रोवल्या जात आहे. व्हीएफसी हेल्थ क्लब येथील प्रीमियम ब्रँडेड उपकरणांसह सर्वोत्तम एक्सरसाईजच्या माध्यमातून फिटनेस गोल, वर्कआउट मोटिव्हेशन, जिम...
हिंदुस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या स्क्रिनवर दाखणार – दिलीप ठाकूर -NNL

हिंदुस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या स्क्रिनवर दाखणार – दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकातील उपांत्य फेरीत इंग्लंडला चारी मुंड्या चीत करून हिंदुस्तान ने लगान वसूल केल्यामुळे हिंदुस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा अंतिम सामना शनिवार दि.२९ जुन रोजी सायंकाळी ७ वाजता उमरेकर हाइट्स, शिवाजीनगर नांदेड येथील तळमजल्यावरील मोठ्या स्क्रिनवर दाखविण्यात येणार असून सामना संपल्यानंतर विजयी जल्लोष करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी दिली आहे.मोठ्या पडद्यावर सामने दाखविण्याचे हे विक्रमी १६ वे वर्ष असल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शनिवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा रोमांचकारी सामना होणार आहे.खा. अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतु...
शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीत सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया  -NNL

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीत सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, अद्ययावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधीनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्यांद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी चाचण्यांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. तरी जिल्हयातील खेळाडूंनी चाचणीसाठी आपले अर्ज 5 जुलै, 2024 पर्यंत श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक ॲथलेटिक्स-9657092794 ) यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळसेवा प्रवेश प्रक्रिया या खेळनिहाय कौशल्य चाचणीबाबत अर्हता खालीलप्रमाणे आहे. खेळनिहाय प्रवेश मर्यादा विचारात घेऊन प्रवेश देण्यात ये...
चालण्याची भव्य स्पर्धा रिमझिम पावसात देखील २८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला- धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर -NNL

चालण्याची भव्य स्पर्धा रिमझिम पावसात देखील २८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला- धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त घेण्यात आलेली २३ वी चालण्याची भव्य स्पर्धा रिमझिम पावसात देखील २८९ स्पर्धकांनी सहभाग घेतल्यामुळे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण संयोजनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून ११ विजेत्यांना मोबाईल तर ३३ स्पर्धकांना आकर्षक स्मृतीचिन्ह व सर्वांना टी-शर्ट मोफत देण्यात आले. भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.श्रीराम सेतू गोवर्धन घाट नांदेड येथे रविवारी सकाळी सहा वाजता भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते भाजपाचा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ विविज्ञ ॲड.प्रवीण आयाचित, मुकेश पटेल, सुधीर आंबेकर, राजू बच्चेवार, साईनाथ पदमवार, सुभाष वळबे, सुरेश इंदुरकर, गणेश गुरुपवार, सूर्यकांत सुवर्णकार यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रमुख अतिथीं...
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मीडिया प्रमुख पदी पुन्हा गणेश भालेराव यांनी निवड – NNL

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मीडिया प्रमुख पदी पुन्हा गणेश भालेराव यांनी निवड – NNL

स्पोर्ट्स
नाशिक| टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2024- 25 ची वार्षिक सहविचार सभा नाशिक येथील. मा खारोडीयार काठीयावाडी हॉटेल येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मागील वर्षाचे मीडिया प्रमुख गणेश राजु भालेराव यांची पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली या सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय टेनिस क्रिकेट च्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी मॅडम ,महाराष्ट्र महिला डायरेक्टर धनश्री गिरी, टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे, मुंबई विभाग अध्यक्ष महेश मिश्रा,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड ,विलास गिरी सर्व जिल्हा सचिव अध्यक्ष इत्यादी उपस्थित होते. या वार्षिक सहविचार सभेमध्ये भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी मॅडम यांनी आलेल्या सर्व जिल्हा सचिवांना टेन...
error: Content is protected !!