Sunday, July 5

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

पोलीस भरती निःपक्षपातीपणे होत असुन उमेदवारांनी दलाला पासुन सावध रहावे – एसपी श्रीकृष्ण कोकाटे -NNL

पोलीस भरती निःपक्षपातीपणे होत असुन उमेदवारांनी दलाला पासुन सावध रहावे – एसपी श्रीकृष्ण कोकाटे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार। नांदेड जिल्हा पोलीस भरती-२०२२-२३, साठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना सुचना देण्यासंदर्भात आज पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता भरती प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. पोलीस भरती निःपक्षपातीपणे व पारदर्शकपणाने होत असुन उमेदवारांनी दलाला पासुन सावध रहावे असे आवाहन त्यानी केले आहे. नांदेड येथे पोलीस भरतीची मैदानी चाचणी दि.१९.०६.२०२४ ते ०३.०७.२०२४ पर्यंत पोलीस मुख्यालय, नांदेड येथे सकाळी ०५०० वाजता पासून राबविण्यात येणार आहे. भरती दरम्यान पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. भारती काळात काही उमेदवारांना वेगवेगळया पदांकरीता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली...
आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करणार- व्यंकट मुदीराज – NNL

आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करणार- व्यंकट मुदीराज – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असे प्रतिपादन अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटना नवी दिल्ली या संघटनेचे मराठवाडा प्रमुख मा.श्री. व्यंकट मुदीराज यांनी केले. ते दि. 16 जून 2024 रविवार रोजी सकाळी ठिक 12.00 वाजता आदिवासी कोळी समाजाची नांदेड जिल्हास्तरीय बैठक गौरक्षण सभागृह, हनुमान मंदिर प्रांगण गोकुळनगर नांदेड येथे पार पाडली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष पदावरुन बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या दहा- बारा वर्षापासून कोळी महादेव व तत्सम अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद येथे संचिका हेतुपुरस्सर अडवून ठेवत आहेत. आठ हजार संचिका कोळी महादेव व तत्सम जमातीचे प्रलंबित असल्यामुळे दप्तर दिरंगाई कायदा 2026 कलम मधील तरतुदीनुसार शासनाने संबंधित अधिकार्‍यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा म...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास टेकडीचा विकास साधणार – नवनिर्वाचीत खा. नागेश पाटील आष्टीकर -NNL

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास टेकडीचा विकास साधणार – नवनिर्वाचीत खा. नागेश पाटील आष्टीकर -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर हे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथम निवडून आल्या नंतर पहिल्यांदाच किनवट आदिवासीबहुल भागाचा दौरा करत असताना प्रथम त्यांनी लाखो भावीकांचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास टेकडी येथे जाऊन प्रथम दर्शन घेतले तसेच येथिल परमपूज्य लिंबाजी महाराज यांचे दर्शन घेऊन चर्चा केली असता त्यांनी या तीर्थक्षेत्राचा विकासा बरोबर या भागात शेतकऱ्यांसाठी सिंचन तलावाची निर्मिती करून हा भाग सुजलाम सुफलम करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. यावर नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर की या भागातील शेतकरी नागरिक यांच्या समस्या जाणून घेऊन या भागातच सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांची बैठक येथे लावून काय समस्या आहे ते इथे सोडू असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. ज्यावेळेस मी प्रथम इथे दर्शनाला आलो तेव्हा माझ्या मनात लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती मी अनेक वेळा उद्धव स...
‘आम्ही जरांगे’…मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर -NNL

‘आम्ही जरांगे’…मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड। नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित 'आम्ही जरांगे' गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. आणि आज नांदेड शहरात आम्हीं जरांगे या चित्रपटाची पुर्ण टीम प्रेक्षकांच्या भेटीला आली होती यावेळी नांदेड येथिल हॉटेल आकृती येथे पत्रकार परिषद घेऊन संवाद साधण्यात आला सोबतच सकल मराठा समाज बांधवाना हितगुज साधत चित्रपटाचं प्रोमोशन करण्यात आलं. यावेळी चित्रपटात 22 वर्षा चे जरांगे पाटील यांची भुमिका निभावणारे चित्रपटाचे नायक पृथ्वीराज थोरात तसेच चित्रपटाचे निर्माते डॉ दत्ता मोरे, कामाजी पवार,डॉ संजय कदम,पंजाब काळे पाटील,सौं कल्पना डोंगळीकर,नानाराव कल्याणकर,...
हिमायतनगर पोलिसांची अवैद्य दारूविक्रेत्यावर धडाकेबाज कार्यवाही; देशीविदेशी दारूचा मोठा साठा केला जप्त – NNL

हिमायतनगर पोलिसांची अवैद्य दारूविक्रेत्यावर धडाकेबाज कार्यवाही; देशीविदेशी दारूचा मोठा साठा केला जप्त – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। शहरासह तालुक्यातील अनेक गावागावात अवैध रित्या देशी-विदेशी दारू विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे अबाल, वृद्ध नागरिक दारूच्या आहारी जाऊन आपले आयुश्य बरबाद करून घेत आहेत. त्यामुळे जागरूक महिला मंडळी कडून हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन अवैद्य दारू विक्री थांबवा आणि आमचे उघड्यावर येणारे संसार वाचवा, अन्यथा आम्हालाच धडक मोहीम उघडावी लागेल असा इशारा दिला होता. याची हिमायतनगर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन अवैध दारू विक्रेत्यावरील कार्यवाहीची धडक मोहीम उघडली आहे. आज दि.17 जून रोजी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम, इंदिरानगर आबादि येथे एका किराणा दुकानावर छापा टाकून देशी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त करून पोलिसांनी धडाकेबाज कार्यवाही केली आहे. पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचे महिलांनी अभिनंदन करून अशाच प्रकारचा दबदबा गावातील इतर दारू विक्रेत्यावर ...
नांदेडमध्ये वैश्विक (जागतिक) वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक दुर्व्यवहार तथा गैरव्यवहार जागृती दिन मोठ्या उत्साहात संपन्न -NNL

नांदेडमध्ये वैश्विक (जागतिक) वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक दुर्व्यवहार तथा गैरव्यवहार जागृती दिन मोठ्या उत्साहात संपन्न -NNL

नांदेड
नांदेड| नांदेड मध्ये "वैश्विक (जागतिक) वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक दुर्व्यवहार तथा गैरव्यवहार जागृती दिन" मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हा सोहळा सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ तथा नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नांदेड वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ तथा ज्येष्ठ नागरिक संघटणा फेष्काॅम मुंबईच्या उत्तर मराठवाडा विभागचे संस्थापक अध्यक्ष मा.सुभाषरावजी बार्‍हाळे तर प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ फेस्काॅम मुंबईच्या ज्येष्ठ नागरिक संघ उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाचे सचिव मा.जयवंत सोमावाड,व कोषाध्यक्ष मा. नारायणराव वाढोणकर,तसेच मा.आनंदरावजी पाटील जवळगावकर, डाॅ.लक्ष्मिताई पुरनशेट्टीवार, श्रीमती प्रभाताई चौधरी,योग शिक्षिका श्रीमती शुश्माताई हुरणे व योग शिक्षिका शुश्माताई स...
कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर (दिड महिन्याचा कालावधी झाले पण शहरात जागाच मिळेना) -NNL

कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर (दिड महिन्याचा कालावधी झाले पण शहरात जागाच मिळेना) -NNL

महाराष्ट्र, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट येथे अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाला मंजुरी मिळून दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे, पण न्यायालयासाठी शहरात तात्पुरती इमारत मिळत नसल्याने बिल्डिंगची फरफट कायम आहे. अनेक वर्षांनंतर अतिरिक्त व सत्र न्यायालय मंजूर झाल्याने पक्षकार व वकिलांनी समाधान व्यक्त केले आहे, पण लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांनी बिल्डिंग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हा मुख्यालयापासून किनवट हा तालुका दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. येथे अतिरिक्त सत्र न्यायालय नसल्याने पक्षकाराची मोठी परवड व्हायची. सत्र न्यायालयाशी निगडित न्यायालयीन कामकाजासाठी गोरगरीबांना नांदेड येथे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे वेळ व पैशांचा अपव्यय होत होता. आणखी हे काही थांबलेले नाही. किनवट हा आदिवासी डोंगराळ तालुका आहे. या तालुक्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायालय नाही. ते इथे मंजू...
धन्ना भक्त यांचा जन्मदिन उत्साहात साजरा..संत बाबा बलविंदरसिंघ यांची प्रमुख उपस्थिती -NNL

धन्ना भक्त यांचा जन्मदिन उत्साहात साजरा..संत बाबा बलविंदरसिंघ यांची प्रमुख उपस्थिती -NNL

नांदेड
लोहा/नांदेड। लोहा येथून जवळच असलेल्या कारेगाव येथे सुसज्ज अशा लोहगड गुरुद्वारा मधे धन्ना भक्त यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संत बाबा बलविंदरसिंघ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. धन्ना भगत यांनी ६०८ वर्षांपूर्वी दिलेले विचार आजही आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. भक्त शिरोमणी धन्ना यांनी श्रद्धेच्या जोरावर दगडात देव प्रकट केले होते. या महान भक्तांचा जयंती सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोहगड गुरुद्वारा मधे आयोजित केला होता. यानिमित भजन,कीर्तन,प्रवचन, कथा, अखंड पाठ आदि कार्यक्रम झाले. नांदेड व लोहा तालुक्यातील भक्त मंडळी मोठ्या श्रधेने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराचे मित जथेदार भाई ज्योतिंदरसिंघ जी यांच्या अरादास कार्यक्रमाने सोहळ्याची उत्तम सांगता झाली. गुरुद्वारा मधे लंगर महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. उपस्थित कथावाचक भाई सरबजितसिं...
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा भव्य समारोप सोहळा संपन्न -NNL

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा भव्य समारोप सोहळा संपन्न -NNL

नांदेड
नांदेड। महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकऱ्यांचे हित जपत शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कर्ज दिले, देऊन शेतकऱ्यांकडून पीक कर्ज मुद्दतीच्या आत भरून घेऊन बिनव्याजी कर्जाचा फायदा करून दिला आहे त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनेचा शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून फायदा मिळवून दिला आहे त्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँक ही काही ठीकाणी नंबर वन तर काही ठिकाणी दोन वर आहे अशीच वाटचाल हो त्यामुळे शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखली जात आहे असे प्रतिपादन शनिवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नवचेतना संवाद यात्रा भव्य समारोप व्यासपीठावरून बोलत होते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचा भव्य समारंभ सोहळा नक्षत्र हाॅल नांदेड येथे मुख्य अतिथी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांच्या प्रमुख उपस्...
नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणसाठी तरुण युवकाची गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या -NNL

नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणसाठी तरुण युवकाची गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या -NNL

नांदेड
नांदेड। जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील मांडणी या गावातील एक चळवळीतील तरुण तिरुपती उर्फ किरण लांडगे या युवकाने मराठा सामाजाला आरक्षण मिळण्यास दिरंगाई होत आहे, शासन जागा भरत नाही, जाहिरात काढली तर भरती करून घेत नाही आणि केलीच भरती तर नियुक्ती पत्र देत नाही अशा अतिशय वस्तूतिथी आणि बोलक्या शब्दात चिट्टी लिहून अतिशय उद्विगन भावनेतून गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मराठ्यांच्या लेकरांचे सर्वात जास्त मुडदे पाडणारं सरकार म्हणुन तुमची नोंद हो आहे, थोड्या तरी लाजा बाळगा..... एका कॅबिनेट मध्ये सुटणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा शेकडो बळी घेऊन सुद्धा तुम्ही सोडवत नाहीत याचा अर्थ मराठ्यांनी काय कारायच असा सवाल मराठा बांधव उपेक्षित करत आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मांडणी या गावातील तिरुपती उर्फ किरण लांडगे या युवकाने मराठा सामाजाला आरक्षण मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे बोलक्या शब्दात...
error: Content is protected !!