Monday, July 6

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

शिस्तप्रिय शिक्षिका मंगला जमगे यांना सेवापुर्तीनिमित्त समारंभपूर्वक निरोप -NNL

शिस्तप्रिय शिक्षिका मंगला जमगे यांना सेवापुर्तीनिमित्त समारंभपूर्वक निरोप -NNL

नांदेड
नांदेड। शिक्षिका मंगला जमगे यांना सेवापुर्तीनिमित्त समारंभपूर्वक निरोप विद्यार्थ्यांच्या शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या . मंगला जमगे ह्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने गुजराती शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित सेवापुर्ती समारंभात त्यांचा यथोचित सन्मान, सत्कार करुन निरोप देण्यात आला. शहरातील गुजराती शिक्षण संस्थेत . मंगला जमगे या सन 1992 मध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या.सेवेची 33 वर्ष पूर्ण करुन त्या नुकत्याच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याची माहिती प्रेमला साकोळकर यांनी सांगितले. यानिमित्त गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केतन नागडा, उपाध्यक्ष चंद्रकांत पटेल, शंभुलाल मंगे, सचिव दिपक दामा, सदस्य मुकेश पटेल, राकेश शाहा, दिपेश शाहा, भावेश नागडा, अतुल लोटीया, योगेश पटेल, लक्ष्मीकांत गणात्रा, किर्तीभाई छेडा यांनी समारंभपूर्वक त्यांना निरोप दिला. या ...
महाविकास आघाडीत राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ नये – खा.नागेश पाटील आष्टीकर – NNL

महाविकास आघाडीत राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ नये – खा.नागेश पाटील आष्टीकर – NNL

नांदेड, हिंगोली
नांदेड,अनिल मादसवार| नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीत राहून पक्ष विरोधी काम करणाऱ्याच्या विरोधात पत्र देऊन तक्रार करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक काळात महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव, सुभाष वानखेडे आणि जयप्रकाश मुंदडा यांनी महाविकास आघाडी उमेदवाराच्या विरोधात काम केले आहे. असा गंभीर आरोप एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून हिंगोली लोकसभा नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या हिंगोली लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीत राहून पक्ष विरोधी काम करणाऱ्याच्या विरोधात खा.नागेश पाटील आष्टीकर यांनी पत्र देऊन तक्रार केली आहे. निवडणूक काळात महाविकास आघाडी युतीच्या उमेदवाराच्या विरोधात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून येत असलेल्या प्रज्ञा सातव यांनी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या हिताच्या विरोधात काम केले. त्यांनी प...
स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे गरजूंना मिनीबस ,व्हीलचेअर, आणि वॉटर कुलरचे वितरण -NNL

स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे गरजूंना मिनीबस ,व्हीलचेअर, आणि वॉटर कुलरचे वितरण -NNL

नांदेड
नांदेड। स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशात सर्वात मोठी बँक म्हणून गणल्या जाते. ग्राहकांची विश्वासार्हता जपत बँकेने ग्राहकांना अनेक सेवांचा लाभ देते. इतर सेवा देण्याबरोबरच सामाजिक जाणीवेतून सामाजिक दायित्व बँक पार पाडत असते. याचाच एक भाग म्हणून बँकेने दिनांक 27 जून रोजी शिवाजीनगर नांदेड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात वसरणी येथील दिव्यांग शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्याना सात व्हीलचेअरचे वाटप केले. तसेच लातूर येथील दिव्यांग संस्थेच्या दिव्यांगांना ये -जा करण्यासाठी मिनी बसचे वितरण केले. तसेच नांदेडच्या महानगरपालिकेच्या 16 शाळांना वॉटर कुलर चे वितरण बँकेचेमहाराष्ट्र सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक श्री अरविंद कुमारसिंग .महाव्यवस्थापक अनिरुद्ध कुमार चौधरी .नांदेड विभागीय कार्यालयाचे उप महा व्यवस्थापक प्रिया कुमार सरिगला आणि नांदेड क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक श्र...
सागवान झाडीतील तीन रत्नांची उत्तुंग भरारी ; आशय तामगाडगे, कनिष्क भवरे व अनवित तामगाडगेंनी घेतला सैनिकी शाळेत प्रवेश -NNL

सागवान झाडीतील तीन रत्नांची उत्तुंग भरारी ; आशय तामगाडगे, कनिष्क भवरे व अनवित तामगाडगेंनी घेतला सैनिकी शाळेत प्रवेश -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE) उत्तीर्ण होऊन आदिवासी , दुर्गम , डोंगरी तालुक्यातून तीन विद्यार्थ्यांनी सैनिकी शाळेत प्रवेश मिळविल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. तालुक्यातील गोकुंदा येथील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयात  इयत्ता पाचवीत शिक्षण घेतलेले आशय आशा राजा तामगाडगे , कनिष्क पुष्पाताई कपिलकुमार  भवरे यांचा सैनिक शाळा चंद्रपूर (महाराष्ट्र) येथे आणि अनवित अश्विनी राहुल तामगाडगे याचा सैनिक शाळा रेवा (मध्यप्रदेश) येथे प्रवेश झाला असून त्यांच्या प्रशिक्षणाला सुरवात झाली आहे. बिनपगारी रजा घेऊन तंत्रस्नेही शिक्षक राहूल तामगाडगे यांनी सतत 3 महिने या विद्यार्थ्यांचा सराव घेतला होता. 300 गुणांपैकी आशय 264 , कनिष्क 243 व अनवित 229 गुण घेऊन कठीण परिश्रम, कुशाग्र बुद्धी,  जिद्द आणि अभ्यासू वृत्ती यामुळेच  जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची मुले असल...
शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळून देण्यासाठी हिमायतनगर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने यांची धडपड -NNL

शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळून देण्यासाठी हिमायतनगर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने यांची धडपड -NNL

नांदेड
हिमायतनगर| शहरातील ज्या शेतकऱ्यांना गतवर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. त्या सर्व शेतकऱ्यांनी तातडीले आपल्या बँकेच्या खात्याची ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी केल्यानंतर हिमायतनगर येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने हे शहर परिसरातील ज्या शेतकऱ्यांची नवे यादीत आहेत त्यांना दूरध्वनीवर संपर्क करून आपले नाव अतिवृष्टीच्या अनुदान यादीत आलेले आहे असे सांगत तात्काळ बँक खात्याची ई-केवायसी करून घेऊन अनुदान प्राप्त करून घ्यावे अशी विनंती करत आहेत. हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी सामाजिक कार्यात हीरीहीने सहभागी होणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा परमेश्वर मंदिराचे संचालक संजय माने हे ज्या शेतकऱ्यांना आपल्या नावाने अनुदान आले किंवा यादीत नाव आहे कि नाही. याची माहीती नसलेल्या...
इयत्ता तिसरीच्या मराठी विषयाच्या अमृतवाणी पुस्तकातील दोष दूर करण्याची मागणी -NNL

इयत्ता तिसरीच्या मराठी विषयाच्या अमृतवाणी पुस्तकातील दोष दूर करण्याची मागणी -NNL

नांदेड
नांदेड,बिलोली, गोविंद मुंडकर। इंग्रजी माध्यमांच्या शाळातील मराठी अमृतवाणी हे पुस्तक यातील चुका यामुळे पालक आणि विद्यार्थी यासह शिक्षकात गोंधळ निर्माण झाला आहे. इयत्ता तिसरीच्या अमृतवाणी यातील *कुशाग्र राजा* या पाठातील प्राण्यांच्या आवाजाच्या जोड्या जुळवा यातील दोष शिक्षण विभागाने का दूर केले नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गाढवाच्या ऐवजी म्हशीचा उल्लेख करून शिक्षण क्षेत्रातील गाढवाचा गोंधळ चर्चेला आला आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनींना मराठी शिक्षण आणि त्याविषयीचे ज्ञान सुलभ पद्धतीने अवगत करण्यासाठी विविध संशोधन केले जातात. शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे आणि राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे इंग्रजी माध्यमातील मराठी विषयाच्या अमृतवाणी पुस्तकात त्रुटी नव्हे तर अनेक दोष आढळून आले आहेत. राज्य प्रकल्प समन्वयक श्री भाऊ गावंडे यांनी महाराष्ट्र शासन यांच्यावतीने युनिसेफ उपक्रमा...
शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा अर्थसंकल्प – खा.अशोकराव चव्हाण -NNL

शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा अर्थसंकल्प – खा.अशोकराव चव्हाण -NNL

नांदेड
मुंबई| महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसह महिला व विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते.खा.चव्हाण म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी शहरी व ग्रामीण भागाला समतोल न्याय दिला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिलमाफी, आधारभूत किमतीनुसार कडधान्ये व तेलबियांच्या खरेदीसाठी १०० कोटी रुपयांचा फिरता निधी,कापूस व सोयाबीनचे भाव घसरल्याने दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर ५ हजार रुपयांची आर्थिक मदत, ई-पंचनामा योजना आदी घोषणांमधून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर, बचत गटांच्या निधीत वाढ, महिलांसाठी १० हजार पिंक रिक्षा आदी निर्णयातून महायुत...
एमजीएम नांदेड येथे नव्या दोन अभियांत्रिकी विद्याशाखेस एआयसीटीईची मान्यता -NNL

एमजीएम नांदेड येथे नव्या दोन अभियांत्रिकी विद्याशाखेस एआयसीटीईची मान्यता -NNL

नांदेड
नांदेड| एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयास आर्टिफिशियल इंटेलिजन्स अ‍ॅन्ड मशिन लर्निग तसेच ऑटोमेशन अ‍ॅन्ड रोबोटीक यासाठी विद्यार्थी क्षमता असलेल्या दोन आधुनिक पदवी अभियांत्रिकी विद्याशाखेस 2024-25 पासून परवानगी दिली आहे. महात्मा गांधी मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी नांदेड येथे 1984 साली मराठवाड्यासारख्या मागास प्रभागातील युवकांना अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळावी म्हणून शासनाच्या धोरणाच्या अनुषंगाने तंत्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली होती. तेव्हापासून महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवी शिक्षणाच्या विविध पाच शाखा, अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षणाच्या चार शाखा आणि रिसर्च सेंटर कार्यरत आहे. महाविद्यालयातून गेल्या 36 वर्षांत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध आस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. आजही येथील विद्यार...
आवडलेल्या क्षेत्रात शिक्षण घेतल्याने नवीन संधी आणि करिअरच्या दृष्टीने विविध पर्याय मिळू शकतात -NNL

आवडलेल्या क्षेत्रात शिक्षण घेतल्याने नवीन संधी आणि करिअरच्या दृष्टीने विविध पर्याय मिळू शकतात -NNL

नांदेड
नांदेड। आवडलेल्या क्षेत्रात शिक्षण घेतल्याने नवीन संधी आणि करिअरच्या दृष्टीने विविध पर्याय मिळू शकतात. त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या आवडीनुसार शिक्षण घ्‍यावे. शिक्षण हा आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच आपल्याला प्रगती साधता येते, असे प्रतिपादन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. लोहा तालुक्‍यातील माळाकोळी येथे पीएमश्री योजनेअंतर्गत जिल्‍हा परिषद शाळा वर्ग खाली बांधकाम व ग्राम पंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या हस्‍ते आज शुक्रवार दिनांक 28 जून रोजी करण्‍यात आले, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. या प्रसंगी सरंपच गंगाबाई माधवराव तिडके, प्राथमिक विभागाच्‍या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, गट विकास अधिकारी डी.के. आडेराघो, पोलिस निरिक्षक संजय निलपत्रेवार, उपसर...
हदगाव शहर व तालुक्यात कोट्यावधी रुपायाच्या विकास कामावर माहीतीचा फलकच नाही – NNL

हदगाव शहर व तालुक्यात कोट्यावधी रुपायाच्या विकास कामावर माहीतीचा फलकच नाही – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| शासनाच्या विविध योजनाद्वारे हदगाव शहर व तालुक्यात बहुतांशी सुरु असलेल्या विकास कामाची माहीती देणारे फलक संबंधित कञांटदारांनी लावले नसल्याने या कामात 'कुछ तो गडबड है 'चे स्पष्ट मत बहुतांशी रोडचा दर्जा पाहील्यावर दिसुन येत आहे. हदगाव शहरात तालुक्यात कोट्यावधी रुपयाचे निधीतून रोडचे विकास कामे सुरु आहेत. यामुळे शहरातील नागरीक व गावातील ग्रामस्थ संभ्रमात असून, शासनाच्या विविध विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या करोड रुप्याच्या कामाची माहीती नागरिकांनाच नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे. शासना दारे लोकप्रतिनिधींनी विकास कामाच्या नावाखाली निधी आणला अस सागतात. पण ते काम कोणत्या कंञाटदाराच्या नावावर कोणत्या एजन्सीच्या नावावर आहे, आणि काम कुणी तरी तिसरी व्यक्ती करत असल्याने माञ कामाचा काहीच दर्जा राहीलेला नाही. या बाबतीत नागरिक व ग्रामस्थ अनभिज्ञ असुन, संबंधित विभाग काम आमच्या विभागामा...
error: Content is protected !!