Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Dr. Shankarao Chavan | ‘स्वारातीम’ विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी -NNL

Dr. Shankarao Chavan | ‘स्वारातीम’ विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी -NNL

नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये दि.१४ जुलै रोजी डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयिका डॉ. योगिनी सातारकर यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्रा. डॉ. राजाराम माने, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, मा. उपमहापौर सतिश देशमुख, अवधुत क्षीरसागर, अविनाश रावळकर, नारायण गोरे, रामदास खोकले, बबन हिंगे, अंगद इंगोले व विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले....
Dr. Hansraj Vaidya | 20 रोजी ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मागनी पदयात्रा – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Dr. Hansraj Vaidya | 20 रोजी ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मागनी पदयात्रा – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड
नांदेड| येत्या शनिवार दिनांक 20 जुलै(20/7/24) ला "माय-बाप ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मागणी पदयात्रा" सकाळी आकरा वाजता निघणार आहे. या पदयात्रेत जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डाॅ.हंसराज वैद्य यांनी केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मागण्या करूनही पूर्ण होत नाहीत, यामुळे प्रलंबित प्रमुख असलेल्या 1)ज्येष्ठ नागरिक धोरण तंतोतंत त्वरित अंमलात आणा. 2)ज्येष्ठ नागरिकांचे वय वर्ष साठ(60 वर्ष) च ग्राहय धरा. 3)किमान मानधन रू 3500/- प्रतिमहा द्या. 4)2007चा कायदा,2010चे नियम,व 2013 चा कायद्याची तंतोतंत अंमल बजावणी करा. 5)ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा. 6)ज्येष्ठ नागरिकांचे समर्पण,त्याग, टक्का लक्षात घेऊन एक महिला व एक पुरूष प्रतिनिधी विधान परिषदेवर व राज्य सभेवर घेण्याची तरतूद करा.7) मागण्या अमान्य करून ज्येष्ठ नागरिकांचा रोष ओढूण घेऊ नका व इतर मागण्या ...
contaminated water | दुधड येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना दुषित पाणी प्यायल्यामुळे पोटदुखी -NNL

contaminated water | दुधड येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना दुषित पाणी प्यायल्यामुळे पोटदुखी -NNL

नांदेड
हिमायतनगर। तालुक्यातील दुधड- वाळकेवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानींना दुषित पाणी प्यायल्यामुळे उलटी, मळमळ, हिवताप, सर्दी, खोकला व पोटदुखी यासह अनेक आजाराची लागण झाली आहे. सात विद्याथ्यानींना अधिकचा त्रास होवु लागला असल्याने त्यांना उपचारांसाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी सायंकाळी 4 वाजता दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार गेल्या दोन तीन दिवसापासून सुरु असताना देखील संबंधित अधीक्षक, मुख्याध्यापक याकडे लक्ष देत नसल्याने आज या विद्यार्थिनींना हिमायतनगर येथे दाखल करण्यात आल्यासचे विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. तालुक्यातील दुधड- वाळकेवाडी येथे निवासी शासकीय आदिवासी आश्रम शाळा आहे. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी गेल्या काही दिवसांपासून आजारी अवस्थेत आहेत. दि.१४ रोजी कु. दुर्गा शिवाजी वागतकर वय १४ वर्ष, कु. सोनी माधव धनवे...
Department of Education | बंडू आमदूरकर: शिक्षण विभागाचा आत्मा -NNL

Department of Education | बंडू आमदूरकर: शिक्षण विभागाचा आत्मा -NNL

नांदेड, लेख
नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर हे जिल्ह्या भरातातील शिक्षकांच्या मदतीला अडीअडचणी धावून जाणारे अधिकारी .ते 30जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत .शिक्षण विभागाचा " आत्मा " असे त्याचे संबोधन व्हायचे आणि ते अगदी बरोबर होय .त्याच्या कार्याचा थोडक्यात आढावा जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांनी घेतला आहे एकदा बंडूला मी विचारलं, 'खूप ताण येतो तेव्हा तुम्ही काय करता?' 'काही नाही, कामांमध्ये स्वतःला व्यस्त करून घेतो', तो उत्तरला. मला नवलच वाटतं या माणसाचं. कायम, सतत कामात व्यस्त. या कामातूनही फोनवर उत्तरं देणार. डोक्यात हजारो कामांची जंत्री, तरीही आता कोणतं काम करायचं याचं प्राधान्य लक्षात राहणार. नाही हे उत्तर वरिष्ठांना कधीच नाही. सोपवलेलं काम बरहुकूम करणार. तेही अचूक, अपेक्षित, वेळेवर! जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाचा कोणताही पुरस्कार स...
Amarnath |अमरनाथ गुहेतून भाग – ९ \ लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath |अमरनाथ गुहेतून भाग – ९ \ लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
आज सकाळीच आम्हाला कटरा साठी निघायचे होते. पण यात्रेकरूमध्ये आपसात कुजबुज चालू होती की, श्रीनगरला येऊन शंकराचार्य मंदिर चे दर्शन घेणे आवश्यक आहे. दोघा तिघांनी मला सांगितले की, भाऊ कसेही करून शंकराचार्याचे आम्हाला दर्शन घेऊन द्या. प्रॉब्लेम असा होता की, शंकराचार्य मंदिर सकाळी साडेसातला उघडत होते.नो एन्ट्री सुरू होण्यापूर्वी डल लेक वरून कोणत्याही परिस्थितीत मोठ्या बसेस काढणे आवश्यक होते. यावर मी असा तोडगा काढला की, ज्यांना शंकराचार्य चे मंदिर पाहायचे आहे त्यांनी आपले सामान आपल्या मोठ्या बस मध्ये ठेवावे आणि दुसऱ्या कोणत्याही वाहनाने शंकराचार्य मंदिर पाहून बायपास वर उभ्या असलेल्या आपल्या बसमध्ये यावे. त्यावर सगळ्यांनी सांगितलं की, तुम्हीच काहीतरी वाहनाची व्यवस्था करून द्या. आता इतक्या सकाळी सगळ्यांसाठी वाहने मिळणे थोडे अवघड होते. मी सज्जादभाईला फोन लावला आणि सांगितले की, सहा टाटा सुमो कसेही ...
Nationalist Congress Party | राष्ट्रवादी शहर सहसचिवपदी सपना जोंधळे -NNL

Nationalist Congress Party | राष्ट्रवादी शहर सहसचिवपदी सपना जोंधळे -NNL

नांदेड
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर सहसचिवपदी इतवारा भागातील सपना जोंधळे निवड करण्यात आली आहे. शहर जिल्हाध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात संघटन बांधणी सुरू आहे. प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची कार्यकारिणी आखणी कार्यक्रम सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांच्या नेतृत्वात शहरामध्ये प्रभागनिहाय कार्यकत्यांच्या बैठका सुरू आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय, वार्डनिहाय व्युहरचना केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरात विविध पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी येण्यासाठी इच्छुक आहेत. त्या अनुषंगाने पक्ष बळकटीसाठी ज...
CEO Visit to tribal village | सीईओ मीनल करणवाल यांची किनवट तालुक्यातील शिवशक्तीनगर आदिवासी गावास भेट-NNL

CEO Visit to tribal village | सीईओ मीनल करणवाल यांची किनवट तालुक्यातील शिवशक्तीनगर आदिवासी गावास भेट-NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट/नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी शनिवार दिनांक १३ जुलै रोजी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या किनवट तालुक्यातील घोगरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत शिवशक्तीनगर या आदिवासी गावात पोहोचल्या. गावाच्या मुख्य ठिकाणापासून तीन किलोमीटर अंतर पायी प्रवास करून त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान (पीएम- जनमन) अंतर्गत आदीम व कोलाम समाजातील लाभार्थ्यांना शासकीय विविध योजनेचे लाभ यासंदर्भात कामांची पाहणी केली. तसेच गावातील महिला भगिनींना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देवून पात्र लाभार्थ्यांचे अर्ज देखील भरून घेतले. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी प्रत्येक गावांमध्ये कॅम्प घेवून...
youth died after touching an electric wire । शेतात विद्युत तारेला स्पर्श होऊन 22 वर्षे तरुणाचा मृत्यू -NNL

youth died after touching an electric wire । शेतात विद्युत तारेला स्पर्श होऊन 22 वर्षे तरुणाचा मृत्यू -NNL

क्राईम, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। शेतातील पोल वाकून लोंबकाळलेल्या विद्यूत वाहक तारांचा स्पर्श र्होऊन पार्डी खुर्द येथिल संभाजी कांदे (वय वर्ष ६६) आजोबा जखमी तर बोधडी खुर्द येथिल नातू पवन रामेश्वर मुंडे (वय वर्ष २२) या तरुणाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. सदर दुर्घटना १२ जुलै रोजी पेन्दा गावच्या शिवारात घडली. या संतापजनक आणि र्‍हदयाचे ठोके वाढवणार्‍या घटनेला जबाबदार असणार्‍या लाईनमनसह संबंधितांवर कर्तव्यकसूरतेसह चक्क मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी संतप्त नागरीकांची मागणी आहे. या घटनेपेक्षाही अनेकांचा जीव घेणारी घटना प्रधानसांगवी गावातील मुख्य चौकात घडण्याची भिती गावकर्‍यांनी व्यक्त केली. लोकवर्दळ असलेल्या चौकातील एक पोल बुडातून तुटलेला तर दुसरा पूर्ण वाकलेला असून कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. असे असतांना देखिल महावितरण कम्पनी प्रशासन लापरवाह करीत असेल तर त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी क...
Camp in every village | मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक गावात कॅम्प लागणार – NNL

Camp in every village | मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक गावात कॅम्प लागणार – NNL

नांदेड
नांदेड| राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. ग्रामस्तरीय समितीला प्रत्येक गावांमध्ये कॅम्प ( शिबीर ) घेण्याचे सूचित केले आहे. तसेच ठीक ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची सुविधा करण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागातील जनतेने याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व त्यांची पूर्ण चमू तसेच नांदेड महानगरासाठी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात दररोज आढावा घेत असून ठिकठिकाणी भेटी देत आहे. राज्य शासनाने नव्या शासन आदेशानुसार ग्रामस्तरीय समितीने गाव पातळीवर शिबिर आयोजित करून अर्ज भरण्याचे स्पष्ट केल्यामुळे आपल्या गावातील पात्र लाभार्थ्यांची निवड करणे ही जबाबदारी या समितीवर आली आहे. ऑफ...
Especially for women | खास महिलांसाठी…‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ -NNL

Especially for women | खास महिलांसाठी…‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ -NNL

लेख, नांदेड
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना आता निकष झाले सोपे ;ऑफलाईनही अर्ज स्वीकारणार राज्यातील महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विविध योजना शासनाच्या वतीने राबविण्यावर भर देण्यात येत आहेत. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ योजना सुरु केली आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेत नांदेड जिल्ह्यात एकटया ग्रामीण भागात कालपर्यत 48 हजारावर अर्ज दाखल झाले आहेत. तसेच जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय, वार्डनिहाय, गावनिहाय अर्ज भरुन घेण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर मेळावे, कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. आता या योजनेत अर्ज भरण्याची सुविधा अत्यंत सुलभ झाली असून शासनाने कागदपत्रातील निकष व अटीमध्ये शिथीलता दिली...
error: Content is protected !!