Thursday, July 9

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Dr. Kailash Yadav | नांदेड जिल्ह्यामध्ये खूप प्रतिभावंत योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचवतील – डॉ.कैलाश यादव – NNL

Dr. Kailash Yadav | नांदेड जिल्ह्यामध्ये खूप प्रतिभावंत योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचवतील – डॉ.कैलाश यादव – NNL

नांदेड, करियर
नांदेड| आपल्या परिसरातील घरांघरात खूप पोटेन्शिअल आहे फक्त त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते नांदेडचे नाव देशपातळीवर पोहोचवतील असे प्रतिपादन प्रा. डॉ. कैलाश भानुदास यादव यांनी केले. ते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय, नांदेड अंतर्गत ललित कला भवन, नांदेड येथे गटस्तरीय समरगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली या मंचावरून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. कैलाश भानुदास यादव, प्रमुख पाहुणे श्री. उमेश थळंगे उपकार्यकारी अभियंता महापारेषन, जगमवाडी नांदेड तर प्रमुख उपस्थिती प्रा. प्रितम लोणेकर, मा. श्री गुणवंत मिसलवाड ( गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त) व कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस सर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे परीक्षक मा. श्री.संतोषसिह चौधरी, मा. श्री. गंगाधर चिते, मेघा गायकवाड (जोंधळे) यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण केले. या कार्यक्रमात ...
The approved road of Pawanmari went to someone; Villagers question…? – हिमायतनगर तालुक्यातील पावनमारीचा मंजूर रस्ता गेला कुणीकडे; ग्रामस्थांचा सवाल…? – NNL

The approved road of Pawanmari went to someone; Villagers question…? – हिमायतनगर तालुक्यातील पावनमारीचा मंजूर रस्ता गेला कुणीकडे; ग्रामस्थांचा सवाल…? – NNL

महाराष्ट्र, नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील राज्य रस्ता ते पावनमारी अंतर्गत रस्त्याचे मंजूर काम होत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजीचा सुर उमटत आहे. पावसाळ्यात या अंतर्गत रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी इतरत्र वळविला जात असल्याची ओरड होत असून, मग हा रस्ता गेला कुठे..? असा सवाल आता पावनमारी करांमधून उपस्थित केला जात आहे. हिमायतनगर तालुक्यात पावनमारी या गावाला जाण्यायेण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही पावनमारी करांची रस्त्याच्या बाबतीत मोठी उपेक्षा कायम होती. वेळोवेळी वर्तमान पत्रात या संदर्भाच्या बातम्या ही प्रकाशित झाल्या. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन राज्य रस्ता ते पावनमारी अंतर्गत रस्त्याच्या कामांसाठी जिल्हा परिषद बांधकाम खात्याकडून १ कोटी ५० लक्ष रूपयांचा ...
Justice to commoners by repealing the oppressive orders of bounty land | इनामी जमिनीचे जाचक आदेश रद्द करून सामान्यांना न्याय – NNL

Justice to commoners by repealing the oppressive orders of bounty land | इनामी जमिनीचे जाचक आदेश रद्द करून सामान्यांना न्याय – NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड| शहरातील असदुल्लाबाद येथील एकूण २८ सर्वे नंबर मधील इनामी 'जमिनीच्या बाबतीत मागील वर्षी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले जाचक आदेश रद्द करून तेथील खरेदी विक्रीसाठी पुन्हा परवानगी द्यावी आणि सर्वसामान्यांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा यासाठी असदुल्लाबाद कृती समिती अध्यक्ष डॉ.विश्‍वास कदम यांनी कृती समितीच्या माध्यमातून या भागातील नागरिकांसोबत मिळून मोठा लढा उभा केला होता. यासह मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील या जमीनींबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. याचा विचार करून या खालसा झालेल्या इनाम जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात मोठा पुढाकार घेतला होता. तेही या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. मराठवाडयात साधारणतः 13,803 हेक्टर इतक्या मदतमाश...
Distribution of Umbrellas at Agricultural Produce Market Committee | नांदेड उत्तर मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन मोंढा येथे छत्री वाटप – NNL

Distribution of Umbrellas at Agricultural Produce Market Committee | नांदेड उत्तर मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन मोंढा येथे छत्री वाटप – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| येथील नांदेड उत्तर मतदार संघातील काँग्रेसचे निष्ठावान कार्येकर्ते तथा जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांच्या वतीने पावसाळी वातावरण लक्षात घेता गरजूंना छत्री वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून खा.वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती चौक परिसरातील झेंडा चौक येथून या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली होती. त्या उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध भागात छत्री वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार राजेश पावडे मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात झेंडा चौक व परिसर, हस्सापूर नसरतपूर ,निळा,एकदारा,कांचननगर ,वाणेगाव,कल्याण नगर,भानपुर आंबेडकरनगर,नई आबादी,नुरी चौक व नवीन मोंढा येथील नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले असून शहरासह ग्रामीण भागातही छत्र्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येणार असल्याची माहीती संयोजक राजेश पावडे यांनी यावेळी दिली. राजेश पावडे मित्रमंडळाच्या वतीने मानव से...
S. Manmeet Singh Kunjwale as Yuvasena City Chief | युवासेना शहर प्रमुख पदी स.मनमित सिंग कुंजीवाले – NNL

S. Manmeet Singh Kunjwale as Yuvasena City Chief | युवासेना शहर प्रमुख पदी स.मनमित सिंग कुंजीवाले – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या प्रमुख उपस्थितीत आ.बालाजीराव कल्याणकर यांच्या शिफारशीनुसार नांदेड शहर युवासेना शहर प्रमुख पदी स.मनमित सिंग कुंजीवाले यांची नियुक्तीची घोषणा करून नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समवेत उत्तरचे आ. बालाजीराव कल्याणकर यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण नागरिकांच्या न्याय हक्कासाठी कार्य सुरू केले असून आपल्या सामाजिक कार्याची दखल घेत स.मनमितसिंग कुंजीवाले यांची युवासेना शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. स.मनमित स...
Availed the free laptop scheme | शिवांश कम्युनिकेशन येथे शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला मोफत लॅपटॉप योजनेचा लाभ – NNL

Availed the free laptop scheme | शिवांश कम्युनिकेशन येथे शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला मोफत लॅपटॉप योजनेचा लाभ – NNL

करियर, नांदेड
नांदेड| तारासिंह मार्केट येथील शिवांश कम्युनिकेशन यांच्या मार्फत भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या अनेक शासकीय योजनांची नाव नोंदणी व लाभार्थ्यांना लाभ मिळवून देत अनेकांना मदतीचा हात दिला असून २०२४ च्या सुरूवातीला जाहीर केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजनेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून शेकडो विद्यार्थ्यांनी या योजनेअंतर्गत फ्रॉम भरून योजनेचा लाभ घेतला असल्याची माहीती शिवांश कम्युनिकेशनचे संचालक विरेंद्रसिंह हजारी यांनी यावेळी दिली तसेच ते म्हणाले की प्रति विद्यार्थी एक लॅपटॉप हा या योजनेचा उद्देश असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवांश कम्युनिकेशन येथे सुक्षिशित बेरोजगार भत्ता ,मोफत स्कुटी योजना , मोफत टॅब योजना, प्रधानमंत्री मोफत सोलार योजना यासह विविध शासकीय योजनांची नोंदणी सुरू असून ज्यांना या योजने अंतर्गत अर्ज क...
Shut down the illegal businesses in Nanded district | नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा अन्यथा गाठ माझ्याशी – शहाजी उमाप यांनी दिली पोलीस अधिकाऱ्यांना तंबी – NNL

Shut down the illegal businesses in Nanded district | नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा अन्यथा गाठ माझ्याशी – शहाजी उमाप यांनी दिली पोलीस अधिकाऱ्यांना तंबी – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यात चालू असलेले अवैध धंद्यासंदर्भाने नेहमीच खडे फोडले जात आहेत, असे असताना देखील कुठे उघड तर कुठे चोरी छुपे सर्वच अवैद्य धंदे सुरु आहेत. हा मुद्दा नांदेड येथे शनिवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत गाजल्यानंतर नांदेड परिक्षेत्राचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी यांची मंगळवार दि.३० रोजी बैठक घेत येत्या १५ ऑगस्ट पुर्वी जिल्हयात सूरु असलेले सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करा. अश्या कडक सूचना दिल्या आहेत. अन्यथा गाठ माझ्याशी असल्याची तंबी देखील त्यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. मागील आठवड्यात २५ जूलै रोजी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक पदाचा पदभार शहाजी उमाप यांनी स्वीकारल्यानंतर त्यांना दुसर्याच दिवशी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सामोरे जावे लागले होते. या बैठकीत अवैध धंद्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असून...
Collector will advise strict action against illegal sand transporters – Ashok Chavan | अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकारी देईन – अशोक चव्हाण – NNL

Collector will advise strict action against illegal sand transporters – Ashok Chavan | अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकारी देईन – अशोक चव्हाण – NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नांदेड| गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना या शासकीय रेती डेपोचा फायदा होत नसेल आणि डेपो चालक जरा रेती बाहेर पाठवून याचा वारेमाप उपयोग घेत असेल तर त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. शासनाचा महसूल बुडू नये हि देखील महत्वाची बाब आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांना देईन अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र राज्य महसूल प्रशासनाच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभधारकांना रेती ही अल्प दरात व घरकुलधारकांना मोफत देण्यात यावी. यासाठी शासकीय डेपोची उभारणी केली असून, डेपो मधून रेती सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना न मिळता ती रेती आंध्राप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, सोलापूर लातूर या ठिकाणी जात आहे. ऑनलाइनच्या नावाखाली झिरो मध्ये म्हणजे ब्लॅक मध्ये रेतीची विक्री केली जाते आहे...
If illegal businesses in Himayatnagar city are not stopped | हिमायतनगर शहरातील अवैध धंदे बंद नाही झाल्यास पोलीस ठाण्या समोरच आमरण उपोषण करणार – बंटी गुड्डेटवार – NNL

If illegal businesses in Himayatnagar city are not stopped | हिमायतनगर शहरातील अवैध धंदे बंद नाही झाल्यास पोलीस ठाण्या समोरच आमरण उपोषण करणार – बंटी गुड्डेटवार – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात मटका, गुटखा, अवैध देशी, विदेशी दारू, जुगार अश्या अनेक प्रकारच्या अवैध धंद्यानी थैमान घातले आहे. अवैध धंद्यापोटी दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असून, अवैध धंदे वाले गब्बर होत आहेत. तर व्यसनाधीन झालेल्या नागरीकांना मात्र आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. परिणामी अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत. त्यामुळे मिलन जेऊ देईना... आणि कल्याण झोपू देईना... अशी अवस्था मटका बहाद्दरांची झाली असल्याने हिमायतनगर येथील एका युवकाने या अवैद्य धंदयांच्या विरोधात बंड पुकारले आहे. आत्तापर्यंत स्थानिक पोलिसांना निवेदन देऊन देखील एकही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मनोज उर्फ बंटी गुड्डेटवार यांनी उपविभागीय अधिकारी यांनानिवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात राजकीय वरदहस्ताने जागोजागी मुख्य चौकात मटका बुक्या, जुगार अड्डे व अवैद्...
Shankaraoji Chavan Vishnupuri project filled to 91% capacity | शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प 91 % क्षमतेने भरला -NNL

Shankaraoji Chavan Vishnupuri project filled to 91% capacity | शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प 91 % क्षमतेने भरला -NNL

नांदेड, मराठवाडा, लाइफस्टाइल
नांदेड| शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प दि. 30/07/2024 रोजी 91 % क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे व बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल. तरी विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही. यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती पूर नियंत्रण अधिकारी , शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जन , नांदेड यांच्याकडून देण्यात आली आहे....
error: Content is protected !!