Friday, May 22

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Nanded police : नांदेड पोलिसांचा धडाकेबाज कारवाई, गोवंश चोरी करून बाजारात विकणाऱ्या अंतरराज्जीय टोळी पकडली

Nanded police : नांदेड पोलिसांचा धडाकेबाज कारवाई, गोवंश चोरी करून बाजारात विकणाऱ्या अंतरराज्जीय टोळी पकडली

क्राईम, नांदेड
नांदेड | नांदेड जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत मोठे यश मिळाले आहे. गोवंश जनावरांची चोरी करून बाजारात विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्हा उघड केला असून ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून या प्रकरणी रामतीर्थ, उमरी, नायगाव आणि कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कलम 303(2) BNS अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. या गुन्ह्यांची माहिती ४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. यामध्ये महिंद्रा कंपनीची XUV Go मॉडेलची चारचाकी, तसेच इतर मुद्देमाल असा एकूण ५.५२ लाख ...
Farmers losses : अवकाळी वातावरणाचा तूर पिकाला फटका; उतारा घटल्याने नुकसान

Farmers losses : अवकाळी वातावरणाचा तूर पिकाला फटका; उतारा घटल्याने नुकसान

नांदेड, कृषी, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यात सध्या तूर पिकाच्या काढणीला वेग आला असला तरी बदलत्या हवामान व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी बांधवांमध्ये पिकांच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांकडून घाईगडबडीत तूर काढणीची लगबग सुरू आहे. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे उरलेल्या तुरीवर शेतकऱ्यांची मोठी आशा होती. मात्र प्रत्यक्षात तुरीचा उतारा मोठ्या प्रमाणात घटल्याने उत्पादनात लक्षणीय घसरण झाली आहे. परिणामी खरीपातील नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांसाठी अवघड बनले आहे. तूर पेरणी, तीन वेळची फवारणी, कापणी ते गोळा करणे, मळणी यंत्रातून बाहेर काढणे, ओलसर असल्याने वाळवणे आणि घरापर्यंत वाहतूक करणे यासाठी प्रति क्विंटल सुमारे 6 हजार रुपये खर्च येत आहे. मात्र बाजारात सध्...
Dangerous DP : हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ भागात धोकादायक डीपी

Dangerous DP : हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ भागात धोकादायक डीपी

नांदेड, कृषी
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मंगरूळ परिसरात वीज वितरण व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. मंगरूळ भागातील बबन खंदारे यांच्या शेतात असलेला वीज डीपी सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून या डीपीवर तब्बल २१ शेतकरी अवलंबून आहेत. डीपीवरील केबल जळालेली असून किटकॅटही नसल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धोकादायक स्थितीबाबत शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यातच संबंधित अभियंता चव्हाण व लाईनमन जाधव यांना प्रत्यक्ष माहिती दिली होती. मात्र, त्यानंतरही आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती अथवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याचप्रमाणे भदेवाड येथील डीपीवरही २५ शेतकरी अवलंबून असून तेथेही अगदी अशीच भयावह परिस्थिती आहे. दोन्ही ठिकाणी वीजपुरवठा असुरक्षित असल्याने शेतकरी जीव मुठीत धरून शेतीकामे करत...
Hunger Strike : महावितरणविरोधात हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण; अर्धनग्न आंदोलन तीव्र, अनेक गंभीर मागण्या

Hunger Strike : महावितरणविरोधात हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण; अर्धनग्न आंदोलन तीव्र, अनेक गंभीर मागण्या

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील महावितरणच्या मनमानी, बेजबाबदार व धोकादायक कारभाराविरोधात ३ फेब्रुवारीपासून सुरू असलेले अर्धनग्न आंदोलन आता ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषणात रूपांतरित करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एकूणच खडकाच्या थंडीतही आंदोलनची चर्चा शहरात गरम होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष वामनराव गंगाबाई लक्ष्मणराव मिराशे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, महावितरणच्या विविध गंभीर गैरप्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे असून,शहर व ग्रामीण भागात विनापरवानगी बसवलेले डीपी तात्काळ काढून उपविभाग कार्यालयात जमा करावेत, शहरातील स्थलांतरित ३३ केव्ही लाईनच्या विनापरवाना कामाची खातेनिहाय चौकशी करावी. र...
Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

क्राईम, नांदेड
बिलोली /नांदेड, गोविंद मुंडकर | नांदेड जिल्ह्यात अवैध वाहतूक आणि नियमबाह्य वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बिलोली येथे थेट धडक कारवाई केली. विनानंबर व विनापरवाना सुरू असलेली चार हायवा वाहने पकडून तात्काळ कारवाई करण्यात आल्याने अवैध वाहतूकदारांत खळबळ उडाली आहे. बिलोली परिसरात तपासणीदरम्यान एमएच 24 बीडब्लू 7727, एमएच 24 बीडब्लू 7227, एमएच 24 सीई 7227 आणि एमएच 20 जीएस 0793 ही हायवा वाहने अनधिकृतरीत्या वाहतूक करत असल्याचे आढळून आले. या सर्व वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाला पाचारण करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, विनानंबर, बनावट नंबर किंवा अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर यापुढे कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियम...
Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

कृषी, नांदेड
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या एकूण 5 हजार 106 शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात आले असून, त्यांच्या 7/12 उताऱ्यावरील कर्जबोजा कमी करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 2 फेब्रुवारी रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तालुकानिहाय थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी देण्यात येणार असून, मंडळस्तरावर विशेष कॅम्प आयोजित करून 7/12 वरील भू-विकास बँकेच्या कर्जबोजाची नोंद कमी करण्याचे व त्याचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक (भू-विकास बँक) नांदेड या बँकेची 8 मार्च 2025 रोजी नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्याआधीच राज्य शासनाच्या 9 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्यादित, मुंबई (शिखर भू-विका...
Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

नांदेड, राजकीय
लोहा| “सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करणारे महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व आपण गमावले आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही,” अशा भावनिक शब्दांत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. लोहा नगर परिषदेच्या प्रांगणात बुधवारी (ता. ४ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजितदादांच्या आठवणी सांगताना आ. चिखलीकर यांचे डोळे पाणावले होते. “दादांचे विचार, कार्यपद्धती आणि शेवटच्या घटकेपर्यंत गरजवंतांसाठी मदतीची भावना आत्मसात करून काम करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे त्यांनी सांगितले. या शोकसभेस आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद ...
Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, या उद्देशाने शासनाने अत्याधुनिक ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार जुनी कागदपत्रांवर आधारित पडताळणी प्रक्रिया बंद करून ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अनुदानित एकविध क्रीडा संघटना, पदाधिकारी तसेच संबंधित खेळाडूंनी अनिवार्यपणे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. सदर शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी व या प्रणालीचा लाभ तळागाळातील खेळाडूंपर्यंत पोहोचावा, यासाठी क्रीडा संचालनालयामार्फत पुढीलप्रमाणे कार्यवाही तातडीने राबविण्यात येत आहे. क्रीडा संघटनांसा...
PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| पारंपरिक कारागिरीला आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून होत असून, कारागिरांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले. एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर आणि खादी ग्रामोद्योग मंडळ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य मंगल कार्यालय, अण्णाभाऊ साठे चौक, सम्राट नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक राहुलकुमार मिश्रा, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर, जिल्हा उद्योग केंद्र व कौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ५ व ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७...
Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

क्राईम, नांदेड
कंधार | कंधार तालुक्यात अवैध जुगारावर मोठी कारवाई करत कंधार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल २ लाख ७५ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस ठाणे कंधार हद्दीत करण्यात आली असून, याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० ते ६.५६ या वेळेत गोपनीय माहितीच्या आधारे कंधार पोलिसांनी सापळा रचत जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. यावेळी आरोपी जुगार खेळताना रंगेहात आढळून आले. पोलिसांनी छाप्यात जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, ०५ मोबाईल फोन, ०४ दुचाकी वाहने असा एकूण ₹२,७५,८४०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण ९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सु...
error: Content is protected !!