Saturday, July 4

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

national highway bad | राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, ठिकठिकाणी खड्डे अन् भेगा होऊन झालेय भगदाड – NNL

national highway bad | राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, ठिकठिकाणी खड्डे अन् भेगा होऊन झालेय भगदाड – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील धनोडा ते भोकर राष्ट्रीय महामार्ग वाहनचालकांसाठी मृत्युचा सापळा बनला असून, इस्लापूर - हिमायतनगर - भोकर दरम्यान सरसम - सोनारी फाटा - याठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जागोजागी सिमेंट काँक्रेट रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. या भागांमध्ये दुचाकी वाहनांचे चाक फसून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व येत असून, काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जमीन खचल्यामुळे या रस्त्याला तडे जाऊन आणि चार ते सहा इंचाच्या भेगा पडल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. सततच्या अपघातांमुळे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित कामाची देखरेख करणाऱ्या अभियंत्यांचा स्वार्थीपणा आणि ठेकेदाराकडून झालेल्या निकृष्ट कामाचा हा परिणाम असून, यास जबाबदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकावे. पडलेल्या भेगांची व भगदाडाची थातुरम...
social afforestation | लोहा -कंधार येथील सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार; अधिकारी उंटावरून हकतात शेळ्या -NNL

social afforestation | लोहा -कंधार येथील सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार; अधिकारी उंटावरून हकतात शेळ्या -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार। महाराष्ट्र शासन,लागवड अधिकारी, सामाजिक वनीकरण कंधार स्थित लोहा कार्यालयाचा भोंगळा कारभार चालू असून, कर्मचारी व अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने यांचेवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघमारे यांनी एका निवेदनातुन दिला आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सामाजिक वनीकरण, कंधार स्थित लोहा कार्यालयात भोंगळा कारभार चालविला जातो आहे. कर्मचारी व अधिकारी हे कागदोपत्री मीटिंग, दौरे, दाखवत शिपायाच्या हवाली कार्यालय सोडुन अनेक दिवस,महिने अनुपस्थित राहून या कार्यालयाचा कारभार चालवतात. त्यामुळे शेतकरी लाभार्थी व्रक्ष लागवडीसाठी कार्यालयात नेहमी चकरा मारल्या तरी कर्मचारी व अधिकारी यांचे दर...
Dr. Baban Jogdand | डॉ. बबन जोगदंड यांना राज्यपालांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड – NNL

Dr. Baban Jogdand | डॉ. बबन जोगदंड यांना राज्यपालांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेडचे भूमिपुत्र तथा यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या सामाजिक, शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईच्यावतीने त्यांना नुकताच डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने यावर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक १८ व्यक्तींना हा अवॉर्ड देण्यात आला. त्यामध्ये डॉ. बबन जोगदंड यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, ज्येष्ठ सरकारी वकील ॲड.उज्वल निकम, ॲड.बी.के. बर्वे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. वामन आचार्य, कार्यकारी समिती अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांची उपस्थिती होती. यशवंत...
Eknath Shinde | महाराष्ट्र कृषी क्रांतीचा जनक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Eknath Shinde | महाराष्ट्र कृषी क्रांतीचा जनक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

महाराष्ट्र
नवी दिल्ली| पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार काल नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. 15 व्या कृषी नेतृत्व समितीच्या- 2024 काँनक्लेव्हचे ॲग्रीकल्चर टुडे समूहाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल दखल घेत महाराष्ट्राची सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात के...
senior citizen | येत्या विधान सभा निवडणूकीत ज्येष्ठ नागरिक समूह फॅक्टरच” भारी ठरणार – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

senior citizen | येत्या विधान सभा निवडणूकीत ज्येष्ठ नागरिक समूह फॅक्टरच” भारी ठरणार – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| आता विधानसभा निवडणूका अगदिच जवळ येऊन ठेपल्या आहेत."माय-बाप ज्येष्ठ नागरिक मत दाता समूह" हा एक अनुभवी,निरपेक्ष, शतप्रतिशत मतदान करणारा, एकूण जन संख्येच्या आठरा टक्के जन संख्येने असून एक एक ज्येष्ठ नागरिक सहा सहा मताचा हुकमी राजा तथा हुकमी एक्का आहे. एवढेच नाही तर तो अनेकांची मते प्रवृत्त करू शकतो. असे मत रविवारच्या ज्येष्ठ नागरिकांच्या व्यापक बैठकित "जण जागृण तथा गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापणा" या फेस्काॅमच्या चळवळी अंतर्गत डाॅ हंसराज वैद्य बोलत होते. व्यासपिठावर गिरिष बार्‍हाळे, प्रभाकर कुंटूरकर,डाॅ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार, माधवराव पवावार काटकळंबेकल, प्रभा चौधरी अदि. उपस्थित होते. पुढे बोलताना डाॅ.हंसराज वैद्य म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील एकून नऊ आमदार आपण ठरविणार आहोत. आपण सर्वजन आज पर्यंत कुण्या तरी एकाच चिन्हावर मतदान करत आलो व त्या पक्षाच्या आमदार किंवा खासदार प्रतिनिधी...
Chief Minister my dear sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलाना लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात कॅम्प -NNL

Chief Minister my dear sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलाना लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात कॅम्प -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथे बुधवार दिनांक १० जुलै रोजी आकस्मित भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, संबंधित कर्मचारी यांनी शिबिर भरवून पात्र महिला भगिनींचे फॉर्म भरुन घेत असल्याचे आढळून आले. कासारखेडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ऑफलाइन व ऑनलाईन फॉर्म भरण्यास मदत केली. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांची बैठक घेऊन प्रत्येक गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण य...
Maratha Reservation  | राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

Maratha Reservation | राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

महाराष्ट्र
मुंबई| राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. सह्याद्री अतिथीगृह येथे आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, दादाजी भुसे, अतुल सावे, धनंजय मुंडे यांच्यासह खासदार अशोक चव्हाण, सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते ॲड. प्रकाश आंबेडकर, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, बच्चू कडू, भरत गो...
Earthquake Nanded । आजचा भूकंपाचा धक्का नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात जाणवला..! -NNL

Earthquake Nanded । आजचा भूकंपाचा धक्का नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात जाणवला..! -NNL

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
नांदेड,अनिल मादसवार। नांदेड शहरात सकाळी 7:15 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून, नांदेड शहरासह शेजारील परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही भागात सौम्य धक्के बसले आहेत. नागरीकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवाना बळी पडू नये याबाबत सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. बुधवारी सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केलचा होता. भूकंपा पासून बचावाची जनजागृती केली जाईल असे सांगून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सतर्कतेचा सूचना दिल्या आहेत.  नांदेड शहरातील मोरचौक ,वेदानगर, यश नगरी, तसेच अर्धापुर भागात सकाळी सात वाजून पंधरा मिनिटाला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंप होऊ लागल्याने जाणवताच अनेक नागरिक जिवाच्या भीतीने घराबाहेर पडले होते. तसेच भूकंप बाबत चर्चा करत होते, भूकंपाचे सौम्य धक्के बसताच सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली असून, नांदेड सोबतच हिंगोली, परभणी जिल्ह्यात देखील भूकंप जाणवले आसल्या...
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या अभूतपूर्व रॅलीला लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर -NNL

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या अभूतपूर्व रॅलीला लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दि. ८ जुलै रोजी नादेड शहरात सगेसोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्तुन आरक्षण मिळावे. यासह अन्य मागण्यांसाठी शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत जरांगे पाटील याना पाठिंबा देत एक मराठा... लाख मराठा... या घोषणां देत लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाड्यात दौरा सुरू आहे. आज हिंगोलीहून नांदेड शहरात त्यांचे आगमन झाल्यानंतर शहरातील राज कॉर्नर तरोडेकर चौक येथून या शांतता रॅलीला सुरूवात झाली. सगेसोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्जुन आरक्षण मिळावे. महाराष्ट्रातील आतापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यात यावे. या मागण्यांसाठी निघालेली अभूतपूर्व रॅलीने राजमाता जिजाऊ चौक-श्रीनगर-महात्मा ज्योतिवा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा आय. टी.आय. चौक-शिवाजीन...
शिवराज्याभिषेकाने सांस्कृतिक उत्क्रांती झाली – ‘शिवजागर’ उपक्रमात चेतन कोळी यांच मत – NNL

शिवराज्याभिषेकाने सांस्कृतिक उत्क्रांती झाली – ‘शिवजागर’ उपक्रमात चेतन कोळी यांच मत – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| “शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील राज्याभिषेकाची घटना ही इतिहासाचा प्रवाह बदलण्यास कारणीभूत ठरली. महाराजांच्या मृत्यूनंतरही कित्येक वर्षे मुघलांच्या सत्तेला भिडण्याचे आणि दिल्लीचे तख्त राखण्याचे असामान्य शौर्य व धैर्य मराठे दाखवू शकले याची प्रेरणाबीजे राज्याभिषेकाच्या घटनेत आहेत. राज्याभिषेकाने केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक क्षेत्रांतही उत्क्रांती घडली. शिवराय हे केवळ राष्ट्रपुरुष नव्हते तर ते जागतिक स्तरावरील युगपुरुष होते” असे मत चेतन कोळी यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नांदेड , कृष्णा पब्लिकेशन्स आणि सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “शिवजागर” या उपक्रमात ते नांदेड येथे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अविनाश कदम विभाग प्रमुख भुशास्त्र विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदय...
error: Content is protected !!