नांदेडमहाराष्ट्र

Mayor Kavita mule : गुरू नंतर ग्रंथ मार्ग दाखवतात – महापौर कविता मुळे

नांदेड ग्रंथोत्सव २०२५ च्या उद्घाटन थाटात संपन्न

नांदेड, गोविंद गोडसेलवार | वाचाल तर वाचाल अशी आपली वाचन संस्कृती आहे, आपण गुरूंना मानाच स्थान देतोत, मग ते आई -वडील, शिक्षक असतील, गुरू जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात परंतु गुरू ज्या ठिकाणी मार्ग दाखवत नाहीत, तिथे ग्रंथ मार्ग दाखवतात, म्हणुन ग्रंथ हेच गुरू अस म्हटल जात. असे विचार नांदेड मनपाच्या महापौर कविता मुळे यांनी मांडले त्या नांदेड ग्रंथोत्सव २०२५ च्या उद्घाटना नंतर उद्घाटनपर भाषणात विचार पिठावरून मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.

विचार पिठावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. सुरेश सावंत, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, स. ग्रंथालय संचालक अनिल बाविस्कर, राज्य ग्रंथालय निरीक्षक प्रताप सुर्यवंशी, प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवंशी, माजी जि.प. अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, साहित्यिक नारायण शिंदे यांची उपस्थिती होती.

सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालय शास्त्राचे जवक डॉ. एस. आर रंगनाथन यांचे प्रतीमा पुजन, दिपप्रज्वलना नंतर कार्यक्रमाला सुरूवात झाली. सकाळीच महात्मा फुले पुतळा येथुन ग्रंथदिंडी निघुन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय परीसरात समारोप झाला.

पुढे बोलतांना मुळे म्हणाल्या, आज बाल, तरूण पिढीला वाचन करण्याची गरज आहे, त्यांच्या हातातील मोबाईल काढुन, वाचनासाठी परावृत्त केल पाहिजे, घरी ग्रंथ आनुन मुलांना वाचनाची सवय लावावी, वाचुन मुलांना संस्कारीत कराव, वाचनामुळे माणुस घडतो अस सांगत, पुस्तक मनाला विचार देतात, विचार मानसाला शिकवतात अस त्या शेवटी म्हणाल्या.

प्रास्ताविकपर भाषण जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांचे झाले, दोन दिवशीय कार्यक्रमातील विषय, मान्यवरांची उपस्थिती या बद्दल त्यांनीब माहिती दिली.

वाचन संस्कृती लोप पावत चालली नाही – ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

वाचन संस्कृती लोप पावत चालली नाही तर, काही ठिकाणच्या कार्यक्रमातील, पुस्तक स्टॉल वरील ग्रंथ विक्रीचा आकडा पाहता तो वाढत आहे, हि बाब चांगली आहे, परंतु आपणच कुठेतरी कमी पडतोत का याचाही विचार होण गरजेच आहे.

वाचन सेवा प्रभावी व्हावी यासाठी वाचनालयात चांगले ग्रंथ ठेवा, ग्रंथ प्रदर्शन भरवा, नांदेडला आल की पटणे सरांची आठवण येते त्यांचा फोन नेहमी असायचा, ते अडचणीवर मार्गर्शन करत होते, त्या बरोबर जाधव सर आपल्यात नाहीत त्यांची उणीव भासते, त्यांच्याप्रती गाडेकर यांनी संवेदना व्यक्त केली.

यापुढे ग्रंथोत्सव नांदेडला राहणार नाही, तर तालुका स्तरावर ग्रंथोत्सव राहिल, १६ तालुक्यात पहिली मागणी, ग्रंथालय अधिक असतील तिथे ग्रंथोत्सव झाला पाहिजे, नवीन पायंडा पाडण्याची सुचना त्यांनी केली. वाचकांचा गौरव झाला पाहिजे, कार्यक्रम कमी करा, वाचकांचा गौरव करा. यावर त्यांनी भर दिला.

पुरपरस्थिती नंतर राज्यातील पुरग्रस्त ग्रंथालयाला त्यांनी भेटी दिल्याच सांगितल, राज्यातील पुरग्रस्त भागातील ५६ ग्रंथालयांना पुराच्या पाण्याचा फटका बसला, यातील २४ ग्रंथालय नांदेड जिल्हयातील आहेत, अशा वाचनालयांना पुस्तक, कपाट रॅक देण्यात येणार आहे, मोठ्या वाचनालयास संगणक देखिल दिल जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. एक हजार ग्रंथालयांना राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाण कडुन पुस्तके पाठवली आहेत, ग्रंथ मिळताच पोच पाठवण्याच आवाहनही त्यांनी केल.

१६ वर्षा पासुन राज्य ग्रंथालय परीषद अस्तित्वात नव्हती सदर परीषदेची बैठक झाली आहे. अ वर्ग ग्रंथालयांना ई ग्रंथालय आज्ञावली दिली जाणार आहे यामुळे ४३ लाख ग्रंथालयाचा डाटा उपलब्ध होणार आहे. यासह विविध विषयांवर विस्तृत माहिती त्यांनी दिली.

शासनाकडुन ग्रंथालय चालकांना भरपुर अपेक्षा आहेत, ग्रंथालयाची अवस्था बिकट आहे, आशेच्या किरणावर आम्ही जगतो आहोत, अशा उल्प शब्दात जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह निर्मलकुमार सुर्यवंशी यांनी वाचनालयाची अल्प अपुऱ्या अनुदानामुळे होत असलेली हेळसांड कळवळुन मांडली.

पुस्तकाविना घर म्हणजे स्मशान – डॉ सुरेश सावंत

घरामध्ये ग्रंथांसाठी एक कोपरा असावा, घरात चांगले ग्रंथ असावेत असे मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. सुरेश सावंत यांनी पहिल्या सत्रातील अध्यक्षीय भाषणात मांडले, ग्रंथोत्सव सरकारी कार्यक्रम होवु नये, तो अभिवचनाचा भाग व्हावा, स्वत:च्या मनाला खुणगाठ बांधुन, मनाच्या वाढीकरीता पुस्तक वाचन महत्वाच आहे, ग्रंथालयात रंगनाथन यांचा पंचसुत्रीचा उल्लेख होतो. त्याच पालन व्हाव अशी माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

इजिप्त मधिल इ.स पुर्व १६ व्या शतकातील मंदिरात लिहीलेल वाक्य सांगतांना ते म्हणाले वाचनालयात सेवा देणारा ग्रंथपाल नाही तर आत्मरूग्णालय चालक आहेत, अस सांगत ग्रंथ, वाचक, ग्रंथालय सेवा पटवुन देण्याच काम त्यांनी केल.

IMG 20260314 WA0035 scaled Mayor Kavita mule : गुरू नंतर ग्रंथ मार्ग दाखवतात - महापौर कविता मुळे

स्वत: १० ते १२ तास वाचन करतो, वाचनाच व्यसन आहे, म्हणुन टिकुन आहे, वाचनामुळे कोणी वेड होत नाही, मात्र वाचन चांगल असाव, चांगल वाचन इतिहासाचा मागोवा भविष्याचा कानोसा घ्यायला लावत. ६४ कला तील वाचन हि कला आहे. मेहनत, परिश्रम घ्यावेच लागतात. एकदा वाचनाच वळण लागल की मग पहायच काम नाही. घरात एक कोपरा, कपाट ग्रंथांसाठी असाव, घरात चांगले ग्रंथ असावेत,
पुस्तका विना घर म्हणजे स्मशान अशा शब्दात सावंत यांनी प्रखड मत मांडले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधनियम व सार्वजनिक ग्रंथालया समोरील आवाहने, या विषय स.धर्मादाय उपायुक्त ममता बो राखडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केल, या सत्रात उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलखुलासपणे दिली.

IMG 20260314 WA0032 Mayor Kavita mule : गुरू नंतर ग्रंथ मार्ग दाखवतात - महापौर कविता मुळे

यावेळी ग्रंथालय निरीक्षक अजय वट्टमवार, जि. ग्रंथालय संघाचे कार्यवाह संजय पाटिल, कुबेर राठोड, ज्ञानेश्वर वडगावकर, ग्रंथपाल शिवाजी सुर्यवंशी, राणा मेटकर, सतिष बिजमवार, ग्रंथपाल गेविंद गोडसेलवार, गोविंद फाजगे, गजानन कळके, यशवंत राजेगोरे, कुमार देशमुख, माधवराव जाधव, संजय यमेकर, स्वप्नाली पाठक, कपाटे ताई, कांता सुर्यवंशी, बबिता कौर, रामराव कोरे, ललीता कुंभार, शंकर कंगारे, सुर्यकांत माली पाटिल, यांच्यासह ग्रंथाल्यीन कर्मचारी, वाचक, ग्रंथप्रेमींची उपस्थिती होती.

पहिल्या सत्रातील कार्यक्रमाच सुत्रसंचालन जाधव सर यांनी केले तर आभार राज्य ग्रंथालय निरीक्षक प्रताप सुर्यवंशी यांनी मानले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button