नामांतर स्मारक समितीच्यावतीने उद्या अभिवादन सभेचे आयोजन -NNL
नांदेड| छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात शहिद झालेले जनार्दन मवाडे, पोचीराम कांबळे आणि गौतम वाघमारे यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी हुतात्मा स्मारक समितीच्यावतीने उद्या रविवारी दुपारी तीन वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील आयटीआय चौक जवळील हॉटेल ताज पाटील येथे उद्या रविवार दि.४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी दूरसंचार विभागाचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक आर. बी.मादले हे राहणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून के. एस. हरिदास आणि दिगंबर मोरे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी शामदादा गायकवाड, अॅड. गोपाळ भगत ( मुंबई ), पँथर चंद्रकांत ठाणेकर ( देगलूर ), डॉ. संजय अपरांती ( नाशिक), अरविंद सोनटक्के (आयआरएस ), भिमपुत्र टेक्सास गायकवाड ( पुणे ), माधवराव जमदाडे (नांदेड )...









