धार्मिकनांदेड

Grand nagarkirtan yatra ; मातासाहेब देवाजी जन्मोत्सव कार्यक्रमाचे समारोपात हजारों भाविक; मातासाहेब ते नांदेड भव्य नगरकीर्तन यात्रा -NNL

नांदेड। ऐतिहासिक गुरुद्वारा मातासाहेब मुगट येथे मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या मातासाहेब देवाजी यांच्या 343 व्या जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता भव्य नगरकीर्तन कार्यक्रमाने झाली.

बुधवार, दि. 16 रोजी सकाळी 9 वाजता कीर्तन दरबार व दिवान कार्यक्रमास सुरुवात झाली. समापन कार्यक्रमात तख्त सचखंड श्री हजुरसाहेबचे मित जत्थेदार संतबाबा ज्योतिंदर सिंघजी, हेड ग्रंथी भाई कश्मीरसिंघजी, मित ग्रंथी भाई गुरमीत सिंघजी, संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा तेजासिंघजी जत्थेदार मातासाहेब यांची प्रमुख उपस्थितीती होती.

आज कीर्तन दरबार मध्ये भाई बलविंदरसिंघ रंगीला, भाई पिंदरसिंघजी रागी जत्था यांचे शबदगायन झाले. श्री आनंदसाहेबचे पाठ आणी श्री गुरु ग्रन्थसाहेब यांचा हुकुमनामा वाचण्यात आला. तसेच कार्यक्रम समापन अरदास करण्यात आली. यावेळी शिरोमणि अकाली बुड्ढा दल 96 करोडी तसेच निहंग सिंघ दलांचे स्थानीक प्रमुख आणी निहंगसिंघ जत्थेबंदी उपस्थित होते.

IMG 20241016 WA0045 Grand nagarkirtan yatra ; मातासाहेब देवाजी जन्मोत्सव कार्यक्रमाचे समारोपात हजारों भाविक; मातासाहेब ते नांदेड भव्य नगरकीर्तन यात्रा -NNL

दुपारी 3 वाजता सुमारास गुरुद्वारा मातासाहेब येथून भव्य नगरकीर्तन यात्रेस प्रारंभ झाली. नगरकीर्तन यात्रेत निशानसाहेब, घोडे, कीर्तन जत्थे, गतका जत्थे, निहंगसिंघ दल आणी भाविकांची उपस्थिती होती. नगरकीर्तन यात्रा माता साहेब मुगट येथून, हीराघाट ब्राह्मणवाडा, त्रिकूट, गडेगाव, मालटेकडी, नमस्कार चौक, नंदिग्राम सोसायटी, बाफना, भगतसिंघ रोड येथून गेट नंबर एक गुरुद्वारा येथे पोहचली. रस्त्यात भाविकांनी जागोजागी नगरकीर्तन यात्रेची आरती ओवाळळीे.

ठिकठिकाणी शरबत, चने आणी प्रसाद वाटप करण्यात आले. तखत सचखंड येथे पोहचून रात्री उशिरा यात्रेचा समारोप झाला. गुरुद्वारा मातासाहेब देवाजी येथील जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरमीतसिंघ बेदी, राजसिंघ रामगडिया, गुलाबसिंघ असर्जनवाले, अडवोकेट सुरेंदरसिंघ लोनीवाले व सेवकांनी प्रयत्न केले. तीन दिवसीय आयोजनात पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, मुदखेड नगर परिषद, पंचायत समेती यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button