Kandhar Women Dies : महावितरणचा मृत्यूचा करंट! लोंबकळत्या 33 के.व्ही. तारेचा धक्का; कंधारात महिलेचा जागीच मृत्यू
कंधार, सचीन मोरे| महावितरणच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा आणखी एक बळी कंधार तालुक्यात गेला असून, लोंबकळत्या 33 के.व्ही. उच्चदाब विद्युत तारेचा धक्का लागून गयाबाई विठ्ठल माडगे (रा. स्वप्नभूमीनगर, कंधार) या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 27 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे कंधार तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
चार महिने तसाच पडून होता खांब!
शेकापूर शिवारात महावितरणचा 33 के.व्ही.चा विद्युत खांब ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे कोसळला होता. परिणामी विद्युत तार जमिनीपासून अवघ्या पाच फूट उंचीवर लोंबकळत होती. आश्चर्याची बाब म्हणजे, चार महिने उलटूनही महावितरणने ना खांब उभारला, ना तार उंच केली!
चारा आणायला गेलेली महिला मृत्यूच्या जाळ्यात
गयाबाई माडगे या गाई-म्हशीसाठी चारा आणण्यासाठी शेकापूर शिवारात गेल्या होत्या. चारा कापून डोक्यावर भारा घेऊन परत येताना, लोंबकळणारी विद्युत...








