HomeनांदेडLokshahi Din cancelled : निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

Lokshahi Din cancelled : निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

नांदेड| राज्य  निवडणूक आयोगाचे पत्र 15 डिसेंबर 2025 अन्वये राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 2025-26 जाहिर झाला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात 15 डिसेंबर 2025 पासून महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजेच 16 जानेवारी   2026 पर्यत आचारसंहिता अंमलात राहील. त्यामुळे माहे जानेवारी 2026 या महिन्यात पहिल्या सोमवारी म्हणजेच 5 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

मानसिक आरोग्य कायद्याचा लाभ रुग्णांना द्या : न्या. जाधव – मानसिक आजार ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे. ‘मानसिक आरोग्य कायदा-2017’ चा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवून त्यांचे हक्क जपले पाहिजेत,’ असे आवाहन जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. जाधव यांनी केले.

लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित ‘मानसिक आरोग्य आढावा मंडळाच्या’ बैठकीत ते बोलत होते. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शीतल तळीखेडकर, अशासकीय सदस्य आर. बी. जोशी, आर. एम. क्षीरसागर आणि डॉ. सुधीर बनशेळकीकर उपस्थित होते. न्या. जाधव म्हणाले, समाजात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. मंडळाने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून रुग्णांना न्याय मिळवून द्यावा. यावेळी सदस्य सचिव डॉ. एस. व्ही. ढगे यांनी मंडळाच्या जबाबदाऱ्यांची माहिती दिली.

 स्वतंत्र कक्षाची स्थापना – आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयात या मंडळासाठी आता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments