नांदेडदेश विदेश

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर : बिलोली तालुक्यातील 11 युवक अडकले

नांदेड| उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून, बद्रीनाथ केदारनाथ दर्शनाला गेलेले नांदेडच्या बिलोली येथील 11युवक अडकले आहेत. हे सर्व युवक सुखरूप व भूसखलन झालेल्या ठिकाणापासून दिडशे किलोमीटर दुरवर आहेत.

दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे ढगफुटी झाली असून, ज्यामुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे, आणि काही ठिकाणी भूस्खलन देखील झाले आहे.

उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे भूस्खलन आणि पूर आले आहेत. उत्तरकाशी जिल्ह्यात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौ. डोणगाव येथील 11 जण केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी दि. 01 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड येथून निघाले होते त्यांचा संपर्क झाला असून ते सर्व सद्यस्थितीत घटनास्थळापासून 150 किमी दूर असून सर्व 11 जण सुखरूप असल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास श्री. सचिन पत्तेवार यांनी कळविले आहे. त्या अकरा जणांची नावे खालील प्रमाणे आहेत.

1. सचिन पत्तेवार वय 25
2. शिवचंद्र सुकाळे वय 30
3. शिवा कुरे वय 32
4. स्वप्निल पत्तेवार वय 25
5. शिवा ढोबळे वय 28
6. धनंजय ढोबळे वय 26
7. नागनाथ मुंके वय 28
8. देवानंद गौण्डगे वय 24
9. अमोल कुरे वय 28
10. सोमनाथ चंदापुरे वय 29
11. देवानंद चंदापुरे वय 27
उत्तर काशी येथे घडलेल्या परिस्थितीवर माननीय पालकमंत्री श्री अतुल सावे हे लक्ष ठेवून असून आवश्यकते नुसार कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी मा. जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील अजून कुणी उत्तराखंड येथे अडकून पडले असेल तर त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे किंवा जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!