Wednesday, May 13

देश विदेश

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Punjab Chief Minister : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नांदेडमध्ये आगमन

Punjab Chief Minister : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नांदेडमध्ये आगमन

नांदेड, देश विदेश
नांदेड | पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आज नांदेड येथील गुरु गोविंदसिंघ जी विमानतळावर आगमन झाले. आगमनावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले. विमानतळावरून मुख्यमंत्री भगवंत मान हे थेट गुरुद्वारा तसेच मोदी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या “हिंद दी चादर” या विशेष धार्मिक कार्यक्रमासाठी रवाना झाले. हा कार्यक्रम श्री. गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या त्याग, बलिदान आणि धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात येणार आहे. देशाच्या विविध भागांतून भाविक आणि मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून, नांदेड शहरात विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे....
Bharat Parv : लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व 2026’ महोत्सव 26 ते 31 जानेवारी या कालावधीत

Bharat Parv : लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व 2026’ महोत्सव 26 ते 31 जानेवारी या कालावधीत

नांदेड, देश विदेश, मुंबई
नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा उत्साह द्विगुणित करणारा ‘भारत पर्व 2026’ हा भव्य पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव 26 ते 31 जानेवारी या कालावधीत दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या पुढाकारातून होणाऱ्या या महोत्सवासाठी नागरिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात आला आहे. 26 जानेवारी रोजी हा महोत्सव सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत तर 27 ते 31 जानेवारी दरम्यान दररोज दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत खुला राहणार आहे. देशभरातील विविध राज्यांच्या पर्यटन, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन या महोत्सवातून घडणार आहे. या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) भव्य आणि आकर्षक दालन उभारण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध पर्यटन वारशाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-कि...
National Flag : कंधार तालुक्यातील तांड्यावरील चार भटक्या महिला करणार दिल्ली येथील लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वजास वंदन !

National Flag : कंधार तालुक्यातील तांड्यावरील चार भटक्या महिला करणार दिल्ली येथील लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वजास वंदन !

नांदेड, देश विदेश, महाराष्ट्र
कंधार, सचिन मोरे| देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२६ रोजी राजधानी नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील तांड्यावरील ४ भटक्या महिलांना सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.ही बाब निश्चितच भटक्या व विमुक्त जाती-जमातीतील महिलांसाठी अभिमानास्पद असल्याची चर्चा कंधार तालुक्यातील अनेक वाडी तांड्यामधून ऐकावायास मिळत आहे.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य या भटक्या महिलांना केवळ धान फाउंडेशनच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल तालुक्यातील समस्त बंजारा समाजाने धान फाउंडेशनचे आभार व्यक्त केले आहे. नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनबीसीएफडिसी) आणि एसइइडी प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील धान फाउंडेशनच्या सहकार्याने या महिलांना राजधानी द...
Special Trains : गुरु तेगबहादूर साहिब जींच्या ३५० व्या शहिदी समागमासाठी नांदेडला विशेष रेल्वे सेवा

Special Trains : गुरु तेगबहादूर साहिब जींच्या ३५० व्या शहिदी समागमासाठी नांदेडला विशेष रेल्वे सेवा

नांदेड, देश विदेश, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड, अनिल मादसवार| हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडमध्ये २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या भव्य शहिदी समागमासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ‘ट्रेन ऑन डिमांड (TOD)’ अंतर्गत दिल्ली (हजरत निजामुद्दीन), चंदीगड आणि मुंबई येथून थेट नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. 🚆 दिल्ली–नांदेड विशेष रेल्वे - उत्तर भारतातील भाविकांसाठी हजरत निजामुद्दीन–नांदेड (गाडी क्र. ०४४९४/०४४९३) ही राखीव सुपरफास्ट विशेष गाडी दिनांक २३ व २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता दिल्लीहून सुटणार पानिपत, आग्रा कॅन्ट, झाशी, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी ४:२० वाजत...
Pradhan Mantri Mudra Yojana : प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) महिलांसह लघुउद्योजकांसाठी कोलॅटरल-फ्री कर्जाची सुवर्णसंधी

Pradhan Mantri Mudra Yojana : प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) महिलांसह लघुउद्योजकांसाठी कोलॅटरल-फ्री कर्जाची सुवर्णसंधी

देश विदेश, नांदेड
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी| लघु व सूक्ष्म उद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri MUDRA Yojana – PMMY) ही देशातील सर्वात प्रभावी स्वरोजगार योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत जमीन किंवा कोणतीही मालमत्ता तारण न ठेवता कर्ज उपलब्ध करून दिले जाते. विशेषतः महिला उद्योजक, छोटे दुकानदार, सेवा व्यवसाय करणारे, कारागीर यांना या योजनेचा मोठा लाभ होत आहे. 🔹 योजना काय आहे? PMMY ही गैर-कृषी (Non-Agriculture) क्षेत्रातील नॉन-कॉर्पोरेट लघुउद्योजकांसाठी आहे. व्यवसाय सुरू करणे, वाढवणे किंवा आधुनिक करणे यासाठी ही योजना उपयुक्त ठरते. 🔹 कर्जाच्या श्रेण्या श्रेणी कर्ज रक्कम शिशु ₹50,000 पर्यंत किशोर ₹50,000 ते ₹5 लाख तरुण ₹5 लाख ते ₹10 लाख तरुण प्लस ₹10 लाख ते ₹20 लाख (पूर्वी यशस्वी परतफेड करणाऱ्यांसाठी) ...
Amit Zawar : नांदेडचा अमित झंवर अंटार्क्टिकावर मॅरेथॉन पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय

Amit Zawar : नांदेडचा अमित झंवर अंटार्क्टिकावर मॅरेथॉन पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय

नांदेड, करियर, देश विदेश
नांदेड | सन 2024 मध्ये प्रतिष्ठित आयर्नमॅन 70.3 आणि एप्रिल 2025 मध्ये जागतिक मॅरेथॉन मेजर्स चॅलेंज यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर, नांदेडचे सुपुत्र अमित गोपाल झंवर यांनी आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करत अंटार्क्टिका या सातव्या खंडावर पूर्ण मॅरेथॉन पूर्ण करणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत. विशेष म्हणजे, या अत्यंत दुर्मिळ आणि खडतर मोहिमेत भारतामधून केवळ तीन जणांनी सहभाग घेतला होता. खेळाची आवड आणि साहसाची ओढ जपत अमित गोपाल झंवर यांनी एप्रिल 2025 मध्ये जागतिक मॅरेथॉन मेजर पूर्ण केल्यानंतर, आपले पुढील आव्हान म्हणून पृथ्वीवरील सर्वात दुर्गम आणि प्रतिकूल ठिकाण असलेल्या अंटार्क्टिकाचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. अंटार्क्टिकातील कठीण परिस्थिती या महिन्यात अमित झंवर यांनी अंटार्क्टिकामध्ये पाच दिवसांचा मुक्काम केला. या काळात तापमान -20 अंश सेल्सियसपर्यंत घसरले, तर ध्रुवीय वाऱ्यांमुळे -30 अंश ...
Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेकडून बुधवारी धरणे आंदोलन ; बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराविरोधात संताप

Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेकडून बुधवारी धरणे आंदोलन ; बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराविरोधात संताप

नांदेड, देश विदेश
नांदेड| बांगलादेशमध्ये सत्तांतरानंतर अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंना टार्गेट करून हत्या, अपहरण, बलात्कार, मंदिरे उद्ध्वस्त करणे तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनांमुळे तेथील अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मानवी हक्कांवर गंभीर आघात झाला असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. बांगलादेश निर्मितीसाठी हिंदूंनी मोठे बलिदान दिले असताना, आज त्याच समुदायावर अमानवी अत्याचार होत आहेत. घरात राहिले तर उपासमारीची वेळ येते आणि बाहेर पडले तर मॉब लिंचिंगचा धोका निर्माण होतो, अशी भयावह परिस्थिती असल्याचा दावा करण्यात आला आहे. अंतरिम सरकार स्थापनेनंतर कट्टरपंथीयांचे मनोबल वाढल्याने हिंसक...
‘National Empowerment Award : राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार-2025’ प्रदान

‘National Empowerment Award : राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार-2025’ प्रदान

देश विदेश, नांदेड
नवी दिल्ली| महाराष्ट्रातील दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्थां आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे दिव्यांग व्यक्ती यांना आज राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार-2025’ प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि दिव्यांगजन सशक्तिकरण विभागाच्या सचिव श्रीमती बी. विद्यावती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सन्मानाने महाराष्ट्रातील कर्तृत्वाचा गौरव महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती आणि संस्थांनी विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय स्तरावर हा सन्मान प्राप्त केला आहे. नागपूरच्या सुश्री अबोली विजय जितना यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती जितना या नागपूरच्या पहिल...
supermoon ; येत्या गुरुवारी रात्री सुपरमून दर्शन होणार !

supermoon ; येत्या गुरुवारी रात्री सुपरमून दर्शन होणार !

देश विदेश, नांदेड
ठाणे| येत्या गुरुवार, 4 डिसेंबर रोजी श्रीदत्तजयंतीच्या दिवशी, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात रात्रभर सुपरमूनचे दर्शन होणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना श्री.दा.कृ.सोमण म्हणाले की, चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष 84 हजार कि.मीटर अंतरावर असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या 3 लक्ष56 हजार 962 कि.मीटर अंतरावर येणार आहे. त्यामुळे त्या रात्री चंद्रबिंब 14 टक्के मोठे आणि 30 टक्के जास्त तेजस्वी दिसेल. संपूर्ण भारतातून साध्या डोळ्यांनी आपणासर्वांस सुपरमूनचे दर्शन घेता येईल. गुरूवार 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी पूर्वेस सुपरमून उगवेल आणि रात्रभर आपणास दर्शन देऊन. सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी पश्चिमेस मावळेल. यानंतर पुन्हा सुपरमून दर्शनाचा योग पुढल्यावर्षी 24 डिसेंबर 2026 रोजी येणार असल्याचे श्री.दा.कृ.सोमण यांनी सांगि...
A unique gift : मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट !

A unique gift : मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट !

महाराष्ट्र, देश विदेश
नवी दिल्ली| येथील महाराष्ट्र सदनातील आजची संध्याकाळ एका वेगळ्याच आनंदाने पुलकीत झाली. सदनात रंगलेल्या छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठा भावनिक संदर्भ होता, तो अहिल्यानगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या सावली या संस्थेतील 26 मुलांनी पाहिलेल्या एका अनोख्या स्वप्नाच्या पूर्ततेचा. या संस्थेतील मायेची ऊब हरवलेल्या मुलांनी दिल्लीच्या सहलीचे पाहिलेले स्वप्न सहद्य अधिकारी आणि इतर दात्यांनी केलेल्या मदतीमुळे प्रत्यक्षात साकारले ! अहिल्यानगर येथील संकल्प प्रतिष्ठानची सावली ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. या संस्थेत आई-वडील नसलेली , विभक्त कुटुंबातील , ऊसतोडणी कामगारांची तसेच एकलपालक असलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी संस्थेला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी मुलांशी हद्य संवाद साधला. श्रीमती विमला यांच्या...
error: Content is protected !!