Punjab Chief Minister : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नांदेडमध्ये आगमन

bhagvant Punjab Chief Minister : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नांदेडमध्ये आगमन

नांदेड | पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आज नांदेड येथील गुरु गोविंदसिंघ जी विमानतळावर आगमन झाले. आगमनावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले.

विमानतळावरून मुख्यमंत्री भगवंत मान हे थेट गुरुद्वारा तसेच मोदी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या “हिंद दी चादर” या विशेष धार्मिक कार्यक्रमासाठी रवाना झाले. हा कार्यक्रम श्री. गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला आहे.

bhag Punjab Chief Minister : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नांदेडमध्ये आगमन

या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या त्याग, बलिदान आणि धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात येणार आहे. देशाच्या विविध भागांतून भाविक आणि मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून, नांदेड शहरात विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top