Monday, May 18

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Vasantrao Naik College : वसंतराव नाईक महाविद्यालयात ‘वसंत दर्पण’ भित्तीपत्रकाचे प्रकाशन -NNL

Vasantrao Naik College : वसंतराव नाईक महाविद्यालयात ‘वसंत दर्पण’ भित्तीपत्रकाचे प्रकाशन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी विभागाच्या वतीने 'वसंतदर्पण' या भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. 'भारतीय महिलांचे समाज सुधारणेतील योगदान' या विषयावर सदर विशेषांकाची मांडणी करण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसियोद्दीन मुजावर सर यांच्या पार पडलेल्या प्रकाशन समारंभाला वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार, उपप्राचार्य डॉ.व्ही.आर. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. साहेबराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले, भित्तीपत्रकाच्या संपादक मंडळाचे सदस्य कु. सोनाली पुयड,पोर्णिमा करे, कु. सृष्टी पुयड, कु. शिवाणी उरूडवाडे, करण पंचलिंगे आणि विश्वनाथ पवार यांनी भित्ती पत्रका विषयी सविस्तर माहिती दिली. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. व्यंकटेश देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावे...
कै. नाना पालकर प्रा विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

कै. नाना पालकर प्रा विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

नांदेड, करियर
नांदेड। येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित कै.नाना पालकर प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी भारतमाता व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाशिप्र.संस्था शाखा नांदेडचे अध्यक्ष डॉ अर्जुन मापारे तसेच लाँयन्स क्लब नांदेडचे शिवाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमधून प्रातिनिधिक भाषणे झाली. विद्यालयाच्या सृजनपंख लेझीम पथकाने देशभक्तीपर गीतावर लेझीमचे देखणे प्रात्यक्षिक सादर केले. लाँयन्स क्लब नांदेड यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकाचे योगदान या विषयावर निबंध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या कु. अभिज्ञा अंबादास देशमुख, श्रद्धा उत्तमराव लांडगे, संध्या आबाराव धसाडे, कु. पद्माक्षी यज्ञेश्वर लाठकर यांन...
बुद्धिमत्ता विकत घेता येते, प्रामाणिकता कशी विकत घेणार – गोविंद मुंडकर -NNL

बुद्धिमत्ता विकत घेता येते, प्रामाणिकता कशी विकत घेणार – गोविंद मुंडकर -NNL

नांदेड, करियर
धर्माबाद। कुशाग्र बुद्धिमत्ता पैशाने विकत घेता येऊ शकते पण प्रामाणिकता कशी विकत घेणार? असे प्रतिपादन सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार श्री गोविंद मुंडकर यांनी केले. ते लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात आयोजित आदर्श प्राचार्य पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नागनाथ नोमुलवार हे होते तर म्हणून प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे,साहेबराव जाधव, जी.पी. मिसाळे उपप्राचार्य जोशी,पांडुरंग कोटूरवार, विजया काचावार,डॉ. जाधव यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. मुंडकर पुढे म्हणाले की, महाविद्यालयाच्या, प्राध्यापकांच्या आणि शैक्षणिक सुविधेच्या बळावर कुशाग्र बुद्धिमत्ता निर्माण करता येऊ शकते,बौद्धिक कौशल्य विकसित करता येऊ शकतात. कुशाग्र बुद्धिमत्ता गरजेनुसार पैशाच्या बळावर विकत घेता येऊ शकते, मा...
माजी सैनिक सु. ऑनररी कॅप्टन विठ्ठल कदम(निवृत्त) यांची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कल्याण संघटक म्हणून नियुक्त -NNL

माजी सैनिक सु. ऑनररी कॅप्टन विठ्ठल कदम(निवृत्त) यांची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कल्याण संघटक म्हणून नियुक्त -NNL

करियर, नांदेड
नांदेड। माजी सैनिक सु.ऑनररी कॅप्टन विठ्ठल बालाजी कदम(निवृत्त) यांची जिल्हा सैनिकी कल्याण कार्यालय, नांदेड- परभणी (संयुक्त कार्यालय) कल्याण संघटकपदी नियुक्त करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा सैनिक कार्यालय, परभणी-नांदेड संयुक्त कार्यालय कल्याण संघटक या पदावर ९ आगस्ट रोजी नियुक्ती केली असून पदभार स्विकाराला आहे. सदरील नियुक्ती जिल्हा सैनिक अधिकारी परभणी यांनी केली आहे. या नियुक्ती बदल नांदेड निवासी उपविभागीय अधिकारी महेश वडदकर,व मंडळ अधिकारी हायुम पठाण, *नावामनपाचा* सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, सिडको क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी व माजी सेवानिवृत्त सैनिक यांनी सत्कार करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या....
Dr. Mahesh Kumar Doifode : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार -NNL

Dr. Mahesh Kumar Doifode : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार -NNL

करियर, नांदेड
नांदेड़| भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना Officer of the month व Employee of the month हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात आजच्या दिवशी एका वर्षापूर्वी करण्यात आली होती. Employee of the month साठी माहे जुलै मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मालमत्ता विभागाचे लिपिक ओंकारेश्वर अरविंद स्वामी यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारास पात्र ठरलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याने महापालिकेची सेवा तत्परतेने बजावल्याबद्दल आज स्वातंत्र्यदिनी मनपा आयुक्त त...
Shivajirao Jogdand : जिल्हाधिकारी यांनी केला शिवाजीराव जोगदंड यांचा सन्मान -NNL

Shivajirao Jogdand : जिल्हाधिकारी यांनी केला शिवाजीराव जोगदंड यांचा सन्मान -NNL

नांदेड, करियर
अर्धापूर| येथील नायब तहसीलदार शिवाजी बाळाजी जोगदंड यांचा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सन्मान केला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियतकालमर्यादेच्या आत लोकसेवा दिल्याबद्दल अर्धापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार शिवाजीराव जोगदंड यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि प्रशसंनिय कार्याबद्दल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित्य सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची यावेळी उपस्थिती होती. अर्धापूर येथील तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी नायब तहसीलदार शिवाजीराव जोगदंड यांचे अभिनंदन...
journalism award announced : महेंद्र गायकवाड यांना “तुफानातले दिवे” पत्रकारिता पुरस्कार जाहीर -NNL

journalism award announced : महेंद्र गायकवाड यांना “तुफानातले दिवे” पत्रकारिता पुरस्कार जाहीर -NNL

करियर, नांदेड
नांदेड| युगकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून तुफानातले दिवे हा पत्रकारितेतील पुरस्कार पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष, पत्रकार महेंद्र गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. गेल्या एकवीस वर्षांपासून महेंद्र गायकवाड यांचे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. दिनांक 24 ऑगस्ट रोजी नांदेड येथील कुसुम सभागृहात होणाऱ्या एका भव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आयोजक संजय निवडंगे यांनी दिली आहे. बिलोली सारख्या ग्रामीण भागातून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महेंद्र गायकवाड यांनी गेल्या एकवीस वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी त्यांचा लढा नेहमीच असतो.यापूर्वी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मान...
Dr. Manohar Chaskar ; विद्यार्थ्यांचे यश हेच पालकांच्या कष्टाचे फलित -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

Dr. Manohar Chaskar ; विद्यार्थ्यांचे यश हेच पालकांच्या कष्टाचे फलित -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

करियर, नांदेड
नांदेड| जगातल्या प्रत्येक आई-बाबांची इच्छा असते ती आपल्या पाल्यांचा सत्कार आपल्या डोळ्यांनी बघण्याची. तो सत्कार बघातांना आपल्या जीवनात केलेल्या कष्टाचे फलित मिळाल्यासारखे प्रत्येक मुला-मुलींच्या आई-वडिलांना वाटत असते. आई-वडील दिवसरात्र कष्ट घेवून मुला-मुलींना शिकवतात पण त्या कष्टाचे खरे फलित हे आपले पाल्य यशस्वी झाल्यावरच होते. म्हणून विद्यार्थ्यांचे किंवा मुला-मुलींचे यश हेच पालकांच्या कष्टांचे फलित असते. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी वक्त केले. ते आज दि. १४ ऑगस्ट रोजी विद्यापीठ प्रशासनाद्वारे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठ परिसरातील संकुलामधून जे विद्यार्थी ‘नेट’, ‘सेट’, ‘गेट’, जि-पॅट’, ‘यूपीएससी’, ‘एमपीएससी’ इत्यादी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा पालकासह कुलगुरू महोदयां...
Anita Rathod ; अनिता राठोड यांची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड – NNL

Anita Rathod ; अनिता राठोड यांची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड – NNL

Blog, करियर, नांदेड
नांदेड | अर्धापूर येथील डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालयात परिचर या पदावर कार्यरत असलेले बाबुराव तुकाराम राठोड यांची कन्या अनिता बाबुराव राठोड यांची आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे पोलिस उपनिरिक्षक पदी निवड झाली आहे. मुखेड तालुक्यातील वसंत नगर तांडा या दुर्गम भागात असलेल्या लहान गावात जन्मलेल्या अनिता यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण वसंत नगर येथील शाळेत पूर्ण झाले अनिता राठोड या शालेय जीवनापासूनच अतिशय हुशार आणि मेहनती मेहनती विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण विद्युत अभियांत्रिकी मधून पूर्ण केल्यानंतर त्या स्पर्धा परिक्षाकडे वळाल्या व त्या ठिकाणी चिकाटीने मेहनत करत पहिल्या प्रयत्नात त्या पूर्व परिक्षा उत्तीर्ण झाल्या आणि मुख्य परीक्षेसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत त्यांनी यश संपादन केले आणि आयोगा द्वारे पोलीस उपनिरीक्षक पदी त्यांची निवड झाली त्यांनी आपल्या ...
Venkatesh Chaudhary : प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक राहून काम करावे – व्यंकटेश चौधरी -NNL

Venkatesh Chaudhary : प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक राहून काम करावे – व्यंकटेश चौधरी -NNL

करियर, नांदेड
नांदेड। प्रतिकूल वातावरणातसुद्धा सकारात्मक राहून अनुकूलता निर्माण करून भविष्यवेधी शिक्षण देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले. वाजेगाव (ता. नांदेड)ची ऑगस्ट महिन्याची पहिली केंद्रीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे दि. १४ ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. विविध उपक्रम आणि गुणवत्ता वर्धन यांत अग्रेसर असणाऱ्या अक्षर परिवारात सामाजिक बांधिलकी जपून संपूर्ण जगासमोर वेगळा आदर्श निर्माण करणारे आदर्श कुटुंब म्हणजे ढोके कुटुंब असेही व्यंकटेश चौधरी यांनी मत व्यक्त केले. संवेदनशील अक्षर परिवाराने स्वर्गीय अभिजीत ढोके असिस्टंट मॅनेजर महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माळाकोळी यांच्या दुर्दैवी अपघातानंतर ब्रेन डेड अवस्थेत असतांना अवयवदान करण्याचा संकल्प करून हृदय, फुफुस, किडनी, यकृत, डोळे या अवयवांचे दान कर...
error: Content is protected !!