नांदेड| येथील ड्रायक्लिनींग उद्योगपती विनोद बाहेती यांच्या धर्मपत्नी सौ. कोकिळा बाहेती यांच्या वाढदिवसानिमित्त येथील शासकीय रुग्णालयातील कॅन्सर रुग्णांसाठी ५१ केमो थेरेपीच्या बाटल्या दान देण्याचा संकल्प केला आहे.
भारतातील कॅन्सर रुग्णांचे ‘कॅन्सर देव’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी कॅन्सर रुग्णालयात काही काळ उपचार घेतले होते. तेथील उत्कृष्ट सेवेची प्रेरणा घेऊन ‘नर सेवा ही नारायण सेवा’ हा उद्देश घेऊन उभारलेल्या रतन टाटा कॅन्सर हाॅस्पिटलला सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही या निमित्ताने अक्षय ड्रायक्लिनर्सचे विनोद बाहेती, उत्तराधिकारी राजू चौडेकर, वैष्णवी व निमिता बाहेती यांनी केले आहे.
‘सेवा हाच सर्वोत्तम धर्म आहे’ हे ब्रीद घेऊन कॅन्सर रुग्णांच्या अविरत सेवेत असलेले मुंबई येथील रतन टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्या उत्कृष्ट सेवेमुळेच नांदेड येथील सौ. कोकिला बाहेती यांना पुर्वजीवन मिळाले आहे. त्यांच्या या सेवेची प्रेरणा घेऊन रतन टाटा यांच्या स्मरणार्थ सौ.कोकिळा बाहेती यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडच्या सरकारी हॉस्पिटलला केमो थेरेपीच्या ५१ बाटल्या दान करण्याचा मनोदय ड्रायक्लिनींग उद्योगाचे विनोद बाहेती यांनी केला आहे.