नांदेड| इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, सहस्रकुंड (ता. किनवट, जि. नांदेड) येथे प्रवेशासाठी रविवार, १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.


ही परीक्षा अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या अधिनस्त प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगर पालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे.

इयत्ता ६ वी : सकाळी ११ ते दुपारी १ , इयत्ता ७ वी ते ९ वी : सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रियेची वेळ आहे. प्रकल्प कार्यालय, किनवट एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, सहस्रकुंड, सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक यांच्याकडे अर्ज विनामूल्य उपलब्ध आहे. सदर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ५ वी ते ८ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या eligible विद्यार्थ्यांचे पूर्ण भरलेले अर्ज ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट येथे सादर करावेत. असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट यांनी केले आहे.


सैनिकी मुलांचा वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती
सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णूपुरी नांदेड येथील वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने माजी सैनिक, माजी सैनिक अवलंबित मधुन सफाई कामगाराचे एक पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी माजी सैनिक/माजी सैनिक अवलंबित उपलब्ध नसल्यास हे पद नागरी (सिविलन) संवर्गातून भरण्यात येईल. यासाठी वयोमर्यादा 21 ते ४५ वर्षे असून कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवाराने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे सोमवार १० जानेवारी 2026 पर्यंत अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02462-359056 वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


