Eklavya Residential Public School : एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन; १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा
नांदेड| इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, सहस्रकुंड (ता. किनवट, जि. नांदेड) येथे प्रवेशासाठी रविवार, १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
ही परीक्षा अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या अधिनस्त प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगर पालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे.
इयत्ता ६ वी : सकाळी ११ ते दुपारी १ , इयत्ता ७ वी ते ९ वी : सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रियेची वेळ आहे. प्रकल्प कार्यालय, किनवट एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, सहस्रकुंड, सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक यांच्याकडे अर्ज विनामूल्य उपलब्ध आहे. सदर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ५ वी ते...
