नांदेडधार्मिकव्हिडीओहिंगोली

darshan of Shri Parmeshwar : उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतलं श्री परमेश्वर दर्शन; केली सुख सम्रुद्धीची कामना

हिमायतनगर,अनिल मादसवार| राज्याचे मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी हिमायतनगर येथील इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन श्रीचे दर्शन घेत महाराष्ट्रातील जणतेसह शेतकऱ्यांच्या सुख समृद्धीची कामना केली. तसेच मंदिराच्या व्यवस्थापन व नियोजन बद्दल समाधान व्यक्त केले.

सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याचा भुमिपूजन कार्यक्रम व नागरी सत्कार समारंभास जाताना सकाळी 12 वा. राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरास भेट दिली. प्रथम त्यांनी श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यासह परिसराची पाहणी केली.

श्री परमेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते श्रीची प्रतिमा, शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंदिर कमेटीचे सेक्रेटरी अनंतराव देवकते, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, डॉ.मनोहर राठोड, गजानन चायल, रामभाऊ सूर्यवंशी, शुद्धोधन हनवते, ज्ञानेश्वर पंदलवाड, रवी राठोड, बालाजी पाटील, आदींसह असंख्य नागरिक, भाविक भक्तव मंदिर कमेटीचे सदस्य उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button