भोकर| तालुक्यात बैल पोळा सण मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. दोन दिवसापासून अतिवृष्टी झाल्याने नदी नाले तुडुंब भरले असून देखील बैल पोळ्यासाठी बाजारपेठ साजल्या होत्या.


आजही पावसाने दिवसभर हजेरी लावल्याने बैल पोळा सणाच्या उत्साहात तसूभरही कमी झाला नाही तर उलट शेतकरी आपल्या मित्राला म्हणजेच सर्जा राजाला स्वच्छ अंघोळ घालून त्यांच्या अंगावर रंगीं बेरंगी झुल टाकून लग्नासाठी मंदिर परिसरात आणून लग्न लावण्या आले.


त्यानंतर आपापल्या घरासमोर त्यांची विधिवत पूजा आरती करून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली यात भोकर येथील सधन शेतकरी तथा उदयोजक वसंतराव पाटील आष्टीकर यांनी सहकुटुंब आपल्या सर्जा राजा ची आपल्या घरी पूजा, अर्चा करून त्यांना पुरणपोळी चा नैवेद्य भरवला.




