हिमायतनगर| तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असुन, यामुळे पैनगंगा नदी पात्रातील पाणी पातळी वाढली आहे. मंगळवारी पैनगंगा नदी काठी एका शेतकऱ्याची म्हैस चरत असतांना वाहत्या पाण्यात बुडाल्याने इच्छा मृत्यू झाल्याची घटना घडली. ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांची दुभती म्हैस दगावल्याने पळसपुर येथील शेतकऱ्यांच मोठे नुकसान झाले आहे.


हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर शिवार पैनगंगेच्या नदी काठी असल्याने दररोज या नदी कठावर जनावरांना चरण्यासाठी शेतकरी घेऊन जात असतात. मंगळवारी शेतकरी प्रदीप शिरफुले रोजच्या प्रमाणे म्हैस चारण्यासाठी नदीकाठावर घेऊन गेले होते. पाणी पिण्यासाठी म्हैस गेली असता अचानक पुराच्या पाण्यात वाहून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.


जिल्हाधीकारी यांनी पैनगंगा नदी काठच्या शेतकऱ्यांना पावसाचा इशारा दिला असुन, शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परंतू पैनगंगा नदी काठी शेतकऱ्यांची शेती असल्याने शेतकऱ्यांना जनावरे चरण्यासाठी जावावे लागले आहे. त्यामुळे पैनगंगा नदी पात्रात एक लाख रुपये किंमतीची दुभती म्हैस दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.




