हिमायतनगर (अनिल मादसवार) येथील आठशे 10 हून अधिक वर्षापूर्वीच्या पुरातन कालीन भगवान व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्रम्होत्सावाला सुरुवात झाली असून, सकाळी 4 वाजता अभिषेक महापुजेणे घटस्थापना करण्यात आली, यां निमित्ताने शेकडो भाविक भक्तांनी बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
शेकडो वर्षापूर्वीचे यादव कालीन भगवान व्यंकटेश बालाजीचे मंदिर हिमायतनगर (वाढोणा) शहरातील बजरंग चौकाच्या पश्चिम बाजूस आहे. त्यानंतरच्या काळात मंदिराची दुरुस्ती झाल्यामुळे सदर मंदिर पुरातन वाटत नसले तरी मंदिरातील मुर्त्या व बांधकामाच्या दगडावरून हेमाडपंती कलेची मांडणी दिसून येते. बालाजीचे मंदिर हे पूर्वाभिमुख असून, पूर्व – पश्चिम ३३ फुट ४ इंच लांबी, तर दक्षिण – उत्तर रुंदी २७ फुट ६ इंच आहे. मंदिराचे बांधकाम ४ फुट उंचीच्या जोत्यावर करण्यात आलेले असून, मंदिराच्या उभारणीत मोठ मोठ्या दगडांच्या शिळा लावलेल्या आहेत.
मंदिराचे सभामंडप ७ बाय १४ फुटाचे असून, गर्भग्रहाभोवती प्रदक्षिणा व अंतरालासाठी दोन्ही बाजूने एक एक प्रवेश द्वार ठेवण्यात आले आहे. मंदिराचे शिखर अर्धगोलाकार असून, त्यावर लहान शिखर आहे. मंदिराचे प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती कोरण्यात आलेली असून, परंपरेनुसार मंदिराची देखभाल दासागुरु वाळके यांच्या मार्गदर्शनखाली कांतागुरु वाळके आणि प्रवीण गुरु वाळके हे करत आहेत. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दसरा महोत्सव दहा दिवस साजरा करण्यात येणार असून, नित्यनेमाने सकाळ सायंकाळी महाआरती पूजा अर्चना आरती होणार आहे.
या मंदिरात भगवान व्यंकटेश बालाजी, विष्णू, ब्रम्हदेव, महिषासुर मर्दिनी, स्कंद कार्तिके, श्रीगणेश यासह अन्य देवी – देवतांच्या काळ्या पाषाणातील मोहक मुर्त्या स्थापित आहेत. विजयादशमी रोजी बालाजी मंदिरात हिमायतनगर येथील मानकरी सुभाष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. त्यानंतर संध्याकाळी शहरातून निघालेली विजया दशमीच्या मिरवणुकीतील हजारो भक्तांनी बालाजीचे दर्शनासाठी येणाऱ्यांना मंदिराचे पुरोहित कांतागुरु, प्रशांत वाळके यांच्या हस्ते बुंदीच्या स्वरूपात तीर्थ – प्रसाद वितरित करण्यात येणार आहे.


