उस्माननगर, माणिक भिसे l समाजामध्ये वावरत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे दान करीत असतो. दानशुरांची संख्याही समाजात काही कमी नाही. पण रक्तदान देऊन आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो, तेव्हा तरूणांनी रक्तदान करून एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवावेत ,. कारण रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरात कलंबर बुद्रुक ता. लोहा येथील सरपंच प्रतिनिधी तथा माजी पंचायत समिती सदस्य उमाकांत सोरगे यांनी केले.
कलंबर बुद्रुक ता. लोहा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्रिकेट स्पर्धा , अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे परिसर भक्तीमय वातावरणात तल्लीन रमला होता.


दि २४ रोजी श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीचे सोळावे वर्ष होते. रक्तदान शिबिरासाठी गुरू गोविंदसिंग रक्तपेढी दवाखाना नांदेडचे डॉ. माया बोरूळकर , दिलीप सोनटक्के आष्टीकर ( व्यवस्थापक संचालक) , प्रवीण देडे , गणेश नागरे , किरण राठोड , कपिल वाढवे , मेनका महाजन , अक्षता शिंदे , यांनी रक्तसंकलनस सहकार्य केले.
यावेळी गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी परदेशी , सामाजिक कार्यकर्ते, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक डी. के. कांबळे , माजी सरपंच प्रतिनिधी मनुसिंह ठाकूर, केदार मुक्कनवार , संजय गोरे , संतोष कंकरे , दिनेश चव्हाण , किरण गुंडाळे , मोहन अप्पा गाजेवार , रूपेश सिंह ठाकुर , राजू गाजेवार , सुशिलकुमार मुक्कनवार , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण कच्छवा , बालाजी पाटील सवराते , बापूराव मुक्कनवार, कृष्णा सोरगे ,शंकर भुत्तेवाड अदी कार्यकर्ते व मित्र मंडळ उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पहार देऊन स्वागत केले. या शिबिरात परिसरातील रक्तदान इच्छुकांनी भरभरून प्रतिसाद दर्शविला.


यावेळी सामाजिक कार्यकर्ते डी. के. कांबळे म्हणाले की , आजच्या तरुणांनी सामाजिक हित लक्षात घेऊन राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा. , भारतीय संस्कृती मध्ये भुदान , अन्नदान , विद्यादान आणि रक्तदान यांना फार मोठं महत्त्व असले तरी , रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे आपण रक्तदान देऊन एखाद्याचे प्राण वाचवू शकता. तेव्हा तरूणांनी वर्षातुन एकदा तरी अवश्य रक्तदान करावे., रक्तदान केल्याने मानसाच्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही. मानसाच्या शरीरात रक्त आपोआप निर्माण होते. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो.


या सामाजिक भावनेतून आपण अशा उपक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान शिबिरात रक्तदान देऊन समाजाप्रती ऋण व्यक्त करावेत. या शिबिरात रक्तदान दिलेल्या तरुणांचे उपस्थित मान्यवरांनी प्रमाण पत्र देऊन अभिनंदन केले. यावेळी अनेकांची उपस्थितीती होती. दि.२५ ऑक्टोबर रोजी श्री संत अगडंमबुवा यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुपारी महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला.



