Blood donation ; रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान – माजी पंचायत समिती सदस्य उमाकांत सोरगे
उस्माननगर, माणिक भिसे l समाजामध्ये वावरत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे दान करीत असतो. दानशुरांची संख्याही समाजात काही कमी नाही. पण रक्तदान देऊन आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो, तेव्हा तरूणांनी रक्तदान करून एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवावेत ,. कारण रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरात कलंबर बुद्रुक ता. लोहा येथील सरपंच प्रतिनिधी तथा माजी पंचायत समिती सदस्य उमाकांत सोरगे यांनी केले.
कलंबर बुद्रुक ता. लोहा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्रिकेट स्पर्धा , अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे परिसर भक्तीमय वातावरणात तल्लीन रमला होता.
दि २४ रोजी श्री संत अगडंमबुवा यात्र...
