देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील मौजे तमलुर येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पक्ष तमलुरच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर पार पाडले.


रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजू लोकांना जीवन जगण्याची बळ रक्तदानापासूनच मिळते. या शिबीरात तमलुर शहापूर खानापूर परिसरातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते शकती प्रमुख बुथ प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.



भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर, देगलूर बाजार समितीचे उपसभापती रवींद्र पाटील, अशोक डुकरे, मोहन पाटील, सजीव पांचाळ, तुकाराम कोकणे, संजय पोकरणे, श्रीकांत कोपले, विजय गूते, रामलिंग स्वामीयांची उपस्थिती होती. रक्तदान शिबिराचे उत्तम नियोजन भाजपाचे तालुका संयोजक व ग्रामपंचायत सदस्य शिवराज हाडे यांनी केले.




