हिमायतनगर| हातावर पोट असणाऱ्या एका भुमिहिन मातेचे घर जळुन रोख रक्कम, अन्नधान्यासह दोन लाखांची नुकसान (House burnt down and the loss) झाल्याची घटना हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकघरी येथे घडली आहे. यामुळे महिला निराधार झाली असून, शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकघरी येथील हातावर पोट असणाऱ्या भुमिहिन माता श्नीमती कांताबाई पांडुरंग पोटे यांच्या घराला दिनांक १५ फेब्रुवारीच्या रात्रीला अचानक आग लागुन रोख रक्कम ७० हजार रुपये, २० तोळ्याचे चादिचे कडे, घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. अंगावरील कपडे तेवढे शिल्लक राहिले असून, यामुळे सादर माता हि निराधार झाली आहे. शेतात राब राब करुन प्रपंच चालविणाऱ्या श्नीमती कांताबाई पांडुरंग पोटे ह्या एका मुलांसह आपल्या छोट्याशा घरात राहतात.


याना गुंठाभर देखील जमीन नसुन, रोज मजुरी करुन कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवितात. सध्याच्या अवस्थेत मुलगा आपल्या परीवारासह तेलंगणात रोज मजुरी करण्यासाठी गेलेला आहे. श्नीमती पोटे ह्या आपल्या कच्च्या घरट्यात एकट्याच राहत होत्या. अचानक लागलेल्या आगीत काही वेळातच आगीने घरांची राखरांगोळी झाली आहे. गावातील युवकासह तरुणांच्या पुढाकाराने एका घराला लागलेली आग आटोक्यात आल्यामुळे शेजारची घरे आगीपासून बचावली आहेत. पोटे परीवार अतिशय कष्टाळू असल्यामुळे रोज मजुरीचे जमा केलेल्या पैश्यासह घरातील किडुक मिडुक जळुन दोन लाखांच्या वर नुकसान झाल्याचे सरपंच प्रतिनिधी सुनील शिरडे, भगवान मेंडके यांनी सांगितले.



