House burnt down and the loss : हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकघरी येथील भुमिहिन मातेचे घर जळुन अंदाजे दोन लाखाचे नुकसान
हिमायतनगर| हातावर पोट असणाऱ्या एका भुमिहिन मातेचे घर जळुन रोख रक्कम, अन्नधान्यासह दोन लाखांची नुकसान (House burnt down and the loss) झाल्याची घटना हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकघरी येथे घडली आहे. यामुळे महिला निराधार झाली असून, शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकघरी येथील हातावर पोट असणाऱ्या भुमिहिन माता श्नीमती कांताबाई पांडुरंग पोटे यांच्या घराला दिनांक १५ फेब्रुवारीच्या रात्रीला अचानक आग लागुन रोख रक्कम ७० हजार रुपये, २० तोळ्याचे चादिचे कडे, घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. अंगावरील कपडे तेवढे शिल्लक राहिले असून, यामुळे सादर माता हि निराधार झाली आहे. शेतात राब राब करुन प्रपंच चालविणाऱ्या श्नीमती कांताबाई पांडुरंग पोटे ह्या एका मुलांसह आपल्या छोट्याशा घरात राहतात.
याना गुंठाभर देखील जमीन नसुन, रोज मजुरी क...
