Bhoomipujan | साहेबराव गायकवाड यांच्या पाठपुराव्याने विकास कामांचे भूमिपूजन -NNL

नांदेड| भाजपा महानगर जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांनी तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेत या निधीच्या माध्यमातून सहयोग नगर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन केले.

भाजपा महानगर जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांनी तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 30 लाख रुपये निधी मंजूर करून घेतला. या निधीच्या माध्यमातून सहयोग नगर येथील माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार परिसरात सुभेदार रामजी आंबेडकर अभ्यासिका तसेच सविधान प्रस्ताविकेच्या फलकाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या विकास कामांची भूमिपूजन भन्ते शिलरत्न थेरो तसेच डॉ. सुधीर कोकरे, भाजपाचे माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, मिलिंद देशमुख यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील सर्व नागरिक तसेच उपासक-उपासिकांची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button