Homeनांदेडself Vasantrao Naik | स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त गोरसिकवाडी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा...

self Vasantrao Naik | स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त गोरसिकवाडी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार -NNL

हदगांव| दरवर्षीप्रमाणे वर्षी स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील संत रोहिदास महाराज सभागृह येथे गोर बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गोरसिकवाडी पुरस्कृत रायसीना फौंडेशनच्या माध्यमातून सोहळा पार पडला.

सन २०२३-२४ या वर्षात 75% पेक्षा जास्त टक्केवारी घेऊन उत्तीर्ण झालेल्या दहावी व बारावी तसेच अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या आई वडिलांचा देखील सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व विविध पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शाल, सन्मानपत्र व पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ता. संयोजक अजय चव्हाण, प्रस्तावना ता. अध्यक्ष रविकुमार चव्हाण आणि मुख्य प्रवक्ता म्हणून मा.सुभाष चव्हाण ता. संयोजक लोहा यांनी विध्यार्थी व पालक वर्गाला मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गोर सेना कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments