नांदेडसोशल वर्क

Dr. Babasaheb Ambedkar ; लोह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत भीम सागर उसळला

लोहा l भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त लोहा शहर निळेमय झाले असून जुन्या लोह्यात नियोजित बुद्ध विहार येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या हस्ते १४ एप्रिल राजी सकाळी ध्वजारोहण झाल्या नंतर तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्या नंतर भव्य मिरवणूकीस आरंभ झाला
हा जयंती सोहळा लाईव्ह होता

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंती निमित्ताने १४ एप्रिल सोमवारी लोहा शहरात विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार , तहसीलदार विठ्ठल परळीकर , पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यासह अनेक मान्यवरांनी पुतळ्यास अभिवादन केले

त्रिरत्न बुद्ध विहार येथे पंचशील व निळा ध्वजारोहण माजी आमदार रोहिदास चव्हाण ,प्रा मनोहर धोंडे यांच्या हस्ते झाला जायकवाडी कम्प येथे बी बी गायसमुद्रे याचा हस्ते तर ज्ञानदीप बुद्ध विहारात ज्ञानोबा हनवते, क्रांतिसूर्य बुद्ध विहारात माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, हृदयरोग तज्ञ डॉ मिलिंद धनसडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला छत्रपती धुतमल ,बालाजी खिल्लारे, .माजी नगरसेवक राहीबाई खिल्लारे, माजी नगराध्यक्षा त्रिशलाबाई कांबळे , गंगाधर महाबळे, पंचशील कंबळे, यासह मान्यवरांच्या हस्ते होणार आहे

सिध्दार्थ नगरात माजी नगरसेवक बबन निर्मले, माजी नगरसेवक भास्कर पवार यांच्याहस्ते तसेच कलाबाई सोनकांबळे , गंगाबाई कापुरे याच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण इंदिरानगर येथे सुभाष खाडे व सटवाजी गोडबोले याचा हस्ते ध्वजारोहण होईल

जुन्या शहरातील नियोजित बुद्ध विहारात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याचा हस्ते पंचशील तर शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे याच्या हस्ते ध्वजारोहण झाले हंसराज पाटील बोरगावकर , सचिन पाटील चिखलीकर छत्रपती धुतमल बालाजी खिल्लारे पंचशील कांबळे हरिहर यासह मान्यवर उपस्थित होते प्रस्ताविम हसर8हरिहर धुतमल यांनी केले. रत्नाकर महाबळे, बापूसाहेब कापुरे, धोंडिबा यानभुरे व्ही के कांबळे, इ जे बनसोडे, सिद्धार्थ महाबळे हे पूजा पाठ घेतला

पाठ .सार्वजनिक भीम जयंती सोहळा जे कार्यकर्ते गंगाधर महाबळे ,छत्रपती धुतमल, बालाजी खिल्लारे, पंचशील कांबळे, उत्तम महाबळे, सुरेश महाबळे , श्रीरंग महाबळे , हरिहर धुतमल डी एन कांबळे ज्ञानोबा हनवते ,याच्या मार्गदर्शनाखाली अनिल धुतमल, भारत महाबळे, बाळू थोरात, केतन खिल्लारे, आनंद धनसडे, सतीश निखाते, प्रवीण महाबळ, निखिल महाबळे, अर्जुन महाबळे, गौतम कापुरे, अशोक सोनकांबळे रवी वाघमारे, सुशील सावंत,दिलीप धुतमल हे सार्वजनिक भीमजयंती संयोजन समिती जयंतीसाठी परिश्रम घेतले
.आ चिखलीकर याच्या हस्ते जुन्या शहरातून मिरवणुकीस सुरुवात झाली.

ह.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन तसेच मुख्य रस्त्याने भव्यदिव्य मिरवणूक निघणार असून क्रांतिसूर्य बुद्ध विहार बसस्थानक येथेनिर्धारित वेळेत विसर्जित झाली प्रचंड भीमसागर उसळला होता जयंती सोहळा लाईव्ह असणार आहे

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button