नांदेड| भाग्यनगर पोलीसांनि पेट्रोलींग दरम्यान दोन वर्षापासुन फरार असलेल्या निहाल विनायक पाईकराव वय 30 वर्षे रा. जयभिमनगर नांदेड या आरोपीस अटक केली आहे.


पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी फरारी व पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेणेबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्यावरून दिनांक 23/07/2025 रोजी भाग्यनगर हद्दीतील गुन्हे शोध पथकाचे पोउपनो विनोद देशमुख, पोहेको प्रदिप गर्दनमारे, पोकों/ विष्णुकांत मुंडे, पोकों/ राहुल लाठकर, पोकों नागनाथ चापके, पोकों/अंकुश कांबळे पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड असे भाग्यनगर हद्दित होत असलेल्या चेन स्नॅचिंग व घर फोडीतील आरोपीचा शोध घेणेसाठी बुधवार बाजारात पेट्रोलींग करीत होते.

दरम्यान पोउपनी विनोद देशमुख यांना गुप्त बातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की मागील गुन्ह्यातील आरोपी निहाल विनायक पाईकराव वय 30 वर्ष व्यवसाय मजुरी रा. जयभिमनगर नांदेड हा जयभिमनगर येथील बुध्दविहाराजवळ संशयीतरित्या फिरत आहे. पोलिसांनी सदर ठिकाणी जावुन ताब्यात घेऊन विचारपूस केली मागील गुन्ह्यातील फरारी आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्या आरोपीस अटक करुन मा. न्यायालयात हजर केले आहे. सदरची उत्कृष्ट कामगीरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक साहेब यांनी कौतुक केले आहे.



