नांदेड l महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा 26 वा वर्धापन दिन व वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने वृत्तपत्र विक्रेता जिल्हा मेळावा 15 ऑक्टोंबर रोजी सिडको येथील विक्रेते बालाजी सुताडे यांच्या उत्कृष्ट वितरक म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ.जगदीश कदम , आमदार बालाजीराव कल्याणकर असून आ.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


पुरस्कार वितरण होणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नांदेड जिल्ह्यातील तीन उत्कृष्ट वितरक म्हणून निवड करण्यात आली,यात नवीन नांदेड सिडको परिसरातील उत्कृष्ट वितरक म्हणून बालाजी सुताडे यांची निवड करण्यात आली होती.



यावेळी मराठी पत्रकार संघाचे संतोष पांडागळे, पत्रकार संघाचे सल्लागार गोवर्धन बियाणी, सायन्स काॅलेजचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे,म.स.पाचे अध्यक्ष बालाजी इबितदार,काॅ.प्रदीप नागापूरकर, म.रा.वृतपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार, वाचक प्रतिनिधी ॲड.श्यामसुंदर वाकोडे, यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला, यावेळी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत घाटोळ, उपाध्यक्ष सतीश कदम, सचिव गणेश वडगांवकर,कोषाध्यक्ष बाबु जल्देवार, सल्लागार सरदारसिंह सुर्यवंशी (चौहान)भागवत गायकवाड, यांच्या सह नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर व छायाचित्रकार सारंग नेरलकर व सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेते यांनी अभिनंदन केले आहे.





