नांदेड| महाराष्ट्र राज्य शासनाकडून 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत “दक्षता जनजागृती 2025″ दक्षता आपली सामायिक जबाबदारी” आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड टायगर ग्रुप अँटो संघटनेच्या रिक्षावर जनजागृती सप्ताह 2025 चे फलक लावून सर्व रिक्षांना जनजागृतीसाठी नांदेड शहरात रवाना करण्यात आले.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्रचे अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम यांनी आयोजन केले. या कार्यक्रमासाठी अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम, पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार, पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे, पोलीस निरीक्षक करिम खान पठाण, साईप्रकाश चन्ना, श्रीमती अनिता दिनकर, श्रीमती अर्चना करपुडे व ला.प्र.वि. चे सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होते.


दक्षता जनजागृती सप्ताह 2025 च्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्रीमती दिनकर, सपोउपनि शेख रसुल, पोकॉ/शाम गोरपल्ले, चापोह/ नामपल्ले यांना अर्धापुर, बारड, मुदखेड येथे पाठवून ग्रामसभा जनजागृती मेळावे व जनजागृती संबधाने प्रचार साहित्य वाटप व वॅनर, पोस्टर्स, स्टिकर लावून भ्रष्टाचाराबाबत काही तक्रार असल्यास, तक्रार कशी करावी याबाबत ला.प्र.वि. चे संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात आली.


शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटूंबासाठी भ्रष्टाचार निर्मूलनासंदर्भात स्नेहनगर, पोलीस वसाहतीमधील लॉनमध्ये विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून भ्रष्टचार निमूर्लनाबाबतची माहिती देण्यात आली आहे. हा कार्यक्रम पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चन करपुडे, मपोह/ मेनका पवार, पोह/ किरण कणसे, अरशद अहेमद खान, गजानन राउत व पोकॉ / स. खदीर यांनी पार पाडली.


संपूर्ण नांदेड जिल्हयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून नागरिकांच्या भेटी घेवून सर्व शासकीय ईमारतीमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी दर्शनीय भागावर भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीबाबत तयार करण्यात आलेले पोस्टर, बॅनर व स्टिकर लावून जनजागृती मोहिम राबविली जात आहे. शासकीय अधिकारी-कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणी संदर्भात पुढील क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.


