उस्माननगर, माणिक भिसे| सुजान व्यापारी, शेतकरी व नागरिकांनी संभाव्य होणाऱ्या दुकान घरफोडी व जनावरे चोरीच्या घटना टाळण्यासाठी थोडी सजगता समाजदारी बाळगावी. आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावतांना त्या कॅमेऱ्याची नजर आपल्या दुकानापासून शेजारच्या दुकानापर्यंत ठेवत कॅमेराचा डिव्हिआर चोरीला जाणार नाही यांची काळजी घ्यावि असा सल्ला उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी आयोजित बैठकीत बोलताना दिला.


लोहा तालुक्यातील कलंबर बु. येथे नूतन स.पो.नि. यांनी सायंकाळी ग्रामपंचायत प्रांगणात व्यापारी, शेतकरी व नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते. शेतकरी दिवसभर बैल औताने शेती मशागतीची कामे करतात व सायंकाळी जेवनासाठी घरी जातात. याच संधीचा फायदा जनावर चोर घेतात. तेव्हा शेतकऱ्यांनी ठराविक वेळीच घरी न जाता वेळेत बदल करावा.

तसेच अनोळखी व संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवून, वेळीच पोलिसांना कळवावे, गावात ग्रामपंचायतीने चौकात, मंदिर परिसर व मुख्य ये जा करणा-या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. जेणेकरून पोलीस तपासासाठी कॅमेरा फुटेज शोधकामी पोलिसांना मदत होईल. नागरिकांनी आपल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी कष्ट घ्यावे , मुलीच्या आयुष्यासाठी पोलिस भरती साठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे यासाठी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.


यावेळी मन्नुसिह सरदार सिंह ठाकुर (सरपंच ), महेश मारोती करंडे ( पोलिस पाटील) , बळी पाटील भोकरे ( मा.म. गां. तंटामुक्त अध्यक्ष , शिवाजी पा.भोकर , भैयालाल मंडले , धनंजय रोत्रे , शेख शकील , सुरेश मोर , श्याम नागठाण , बुध्दभुषण गायकवा , साई चंदेल , दिलीप देबडवार , अतुल देबडवार , पत्रकार नामदेव तारू, पिंटु मरमठ, अनिल सोरगे, तरटे, अरूण जोशी, युसूफ मामू शे , गणेश महाराज , विनोद ठाकुर , बापुराव मुक्कनवार , यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


