Tuesday, June 30

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
NEET परीक्षेतील घोट्याळ्या विरोधात नांदेडात युवक काँग्रेसतर्फे विद्यार्थी एल्गार मोर्चा – NNL

NEET परीक्षेतील घोट्याळ्या विरोधात नांदेडात युवक काँग्रेसतर्फे विद्यार्थी एल्गार मोर्चा – NNL

नांदेड
नांदेड| NEET 2024 घोटाळ्याच्या विरोधात परीक्षा पुन्हा घ्यावी या प्रमुख मागणीसह युवक काँग्रेस, PTA संघटना व CCTF संघटना यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांच्या नेतृत्वात हा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मोर्चा संपन्न झाला. NEET 2024 या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत देशभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. विद्यार्थ्यांना 180 मार्कांपर्यंत जास्‍त प्रमाणात ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत. तसेच या वर्षी सर्वोच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपैकी 75% विद्यार्थी हे अशा प्रकारे ग्रेस मार्क देऊन गुणांचा फुगवटा करुन देण्यात आलेले गुणवत्ताधारक आहेत. सर्वप्रथम बिहार येथील पाटणा शहरात तेथील परीक्षेशी संबंधित काही लोकांना पेपरफुटी संबंधी अटक करण्यात आली होती. परंतु आता NTA म्हणते आहे की पेपरफुटी झालेलीच नाही. तर मग या लोकांना कशाच्या आधारावर अटक केली याचा काहीही खुलासा NTA ने के...
पावसाळ्याच्या तोंडावर पालीका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे जनतेचे होताहेत पाण्यासाठी बेहाल – NNL

पावसाळ्याच्या तोंडावर पालीका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे जनतेचे होताहेत पाण्यासाठी बेहाल – NNL

नांदेड
कंधार, सचिन मोरे| गेल्या अनेक दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. परिणामी महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगर पालीकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील नागरीकांचे पाण्यासाठी बेहाल होत असुन, याविरोधात भारतीय जनता पार्टी कंधार शाखेच्या वतीने कंधार नगरपालिकेवर घागर मोर्चा काढून निवेदन दिले आहे. पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करत ऐड. गंगाप्रसाद यन्नावार यांनी प्रतिकात्मक आंघोळ करत नगरपालिकेचा जाहीर निषेध केला आहे. कंधार तालुक्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून, एका बाजूस जगतुंग समुद्र व दुसऱ्या बाजूस मन्याड नदी आहे. शहरासाठी पाणीपुरवठा करन्या करिता २६ कोटी रुपयाची नळयोजना लिंबोटी धरणातून कायम स्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आली होती, त्याचे काम अपूर्ण आहे. नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील नागरीकानी पाणी पट्टी भरुन देखील वे...
सोमवारी बासर येथे सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळा; परमपूज्य गुरुमाऊली यांची उपस्थिती -NNL

सोमवारी बासर येथे सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळा; परमपूज्य गुरुमाऊली यांची उपस्थिती -NNL

नांदेड
नांदेड| दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने दिनांक 16 व 17 जून रोजी श्रीक्षेत्र बासर येथे सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुखेड सह जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून हजारो भाविक जाणार असल्याची माहिती मुखेड केंद्राच्या वतीने देण्यात आली. भारतीय संस्कृतीमध्ये विद्येची देवता व बुद्धीची देवता म्हणून श्री सरस्वती मातेस प्रथम स्थान दिले आहे. या सामूहिक सरस्वती पूजन सोहळ्यातून मुलांमध्ये भक्ती व मूल्य संस्काराची शिकवण रुजवण्याचा विधायक हेतू या उपक्रमातून साध्य करण्यात येणार आहे. या उपक्रमात शालेय मुले, युवा-युती आणि पालक एकत्रितपणे सामूहिक पद्धतीने सरस्वती मातेचे पूजन करणार आहेत. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने नेहमी समाज उप...
लोकसभा निवडणूक संपताच हदगाव नगरपरिषदेचा ०.८५ कोटीच निधी हिगोली न.पा. ला वळविला – NNL

लोकसभा निवडणूक संपताच हदगाव नगरपरिषदेचा ०.८५ कोटीच निधी हिगोली न.पा. ला वळविला – NNL

नांदेड, हिंगोली
हदगाव, शे.चांदपाशा| हिगोली लोकसभाची निवडणूक संपताच हदगाव नगरपरिषदेला शासनाच्या एका पञाद्वरे जाहीर झालेला ८५ लाखाचा निधी लोकसभेच निवडणूकीचा निकाल लागताच काही आठवड्यातच हिगोली नगरपराषदेला वर्ग करण्यात आल्याचा पञ शासनाच्या उपसचिव कडुन हदगाव नगरपरिषद कार्यालयाला प्राप्त झाल्याची विश्वासनिय माहीती मिळालेली आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार राज्याच्या नगरविकास विभाग कडून दि ११ जुन २०२४ ला शासनाने जारि केलेल्या शुद्ध पञकात म्हटले आहे की, हदगाव नगरपराषदे करिता 'वैशिष्टयपुर्ण योजने अतर्गत ०.८५ कोटी विशेष अनुदान देण्यात आलेले होते परंतु ह्या कामाकरिता कार्यारंभ आदेश दिला नसल्याने सदर कामे रद्द करुन सदर कामाचा निधी हिगोली नगरपरिषदेच्या विविध कामाकरिता या निधीला मान्यता देण्यात येत असल्याच उपसचिव श्रिकांन्त आंडगे (उपसचिव महाराष्ट्र शासन) याच्या सहीनिशी पञ हदगाव नगरपरिषदेला देण्यात आलेल आहे. ल...
दिवंगत पत्रकार गौतम गळेगावकर यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाच्या वतीने तीन लाखांची मदत -NNL

दिवंगत पत्रकार गौतम गळेगावकर यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाच्या वतीने तीन लाखांची मदत -NNL

नांदेड
नांदेड। येथील दिवंगत पत्रकार गौतम गळेगावकर यांच्या कुटुंबीयांना नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ , व्हाईस ऑफ मीडिया , डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आणि नांदेड पोलिसांच्या वतीने तीन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे . या मदतीतून दिवंगत पत्रकार गौतम कांबळे यांची पत्नी सुप्रिया कांबळे हिच्या नावे तीन लाख रुपयांचे किसान विकास पत्र तयार करण्यात आले असून हे किसान विकास पत्र पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते सुप्रियाला देण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषद मुंबईचे कोष्याध्यक्ष विजय जोशी, विभागीय संघटक प्रकाश कांबळे , नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी , डिजिटल मीडिया संपादक पत्रकार मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खंदारे ,व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले,योगेश लाटकर , पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक रवींद्र स...
शेतकऱ्याची बाजू न ऐकताच महसुलची धडक कार्यवाही; महसुलचा अजब कारभार माफियांना अभय शेतकऱ्यांना दिला जातोय त्रास -NNL

शेतकऱ्याची बाजू न ऐकताच महसुलची धडक कार्यवाही; महसुलचा अजब कारभार माफियांना अभय शेतकऱ्यांना दिला जातोय त्रास -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। बेंदीतांड्यातील अल्पभूधारक शेतकर्‍याने त्यांच्याच शेतातील विहिरीचा मुरुम त्याच शेती सुधारण्याच्या कामावर वापरत असतांना महसूलच्या पथकाने मुरुमासह दोन ट्रॅक्टर्स ७ जून रोजी पकडून किनवट तहसिल कार्यालयात लावले आहेत. मुरुमाचे अवैध उत्खनन आणि विनापरवाना वाहतूक करणार्‍यांना अभय दिल्या जाते. तर शेतकर्‍यांच्या शेती सुधार कामावरच्या वैध मुरुमाचे ट्रॅक्टर्स धरले जातात. तहसिलदारांनी दिलेल्या उद्दीष्ठ्य पूर्ण करण्याच्या नादात शेतकर्‍याची बाजू ऐकून न घेता महसूल पथकाने कारवाई केली. मुरुमच अवैध होता तर या अवैध कारवाईचा महसुल प्रशासनाला जबाब तर द्यावाच लागणार असल्याचे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. तहसिलदार शारदा चौंडेकरांनी महसूल यंत्रणेला गौण, खनिज, रेती, मुरुमाच्या अवैध व्यवसायिकांकडून वार्षिक उद्दीष्ठ्य निश्चीत करुन दिल्याची सबब या कारवाई दरम्यान कर्मचार्‍यांनी बोलून...
इस्लापूर येथे नवचेतना संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

इस्लापूर येथे नवचेतना संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे। मराठवाड्यात महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेस प्रारंभ झाला असुन या यात्रेच्या निमित्ताने इस्लापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये सामाजिक सुरक्षा, शेतकरी के.सी.सी नुतनीकरण, बचतगट महीला मेळावा, डिजिटल व वित्तीय साक्षरता मेळावा, वृक्षारोपण यावर महत्व पटवून सांगितले. इस्लापुर येथे गुरूवारी सायंकाळी महाराष्ट्र ग्रामीण बॅक समोर पिक कर्ज नुतनीकरण केलेल्या शेतकरी विनायकराव देशमुख, दिंगाबर जाधव, नंदकुमार गादेवार, सुनिल आडे, गणेश जयस्वाल यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र ग्रामीण बॅक चे छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक सर व्यवस्थापक संगमकर, सर व्यवस्थापक षण्मुख वानखेडे, विभागीय व्यवस्थापक संतोष प्रभावती याच्या हस्ते गौरविण्यात आले. तर नारी सक्ती, साईबाबा महीला, वैष्णवी महीला, भिमा माता, प्रगती महीला, लक्ष्मी स्वयसहायत्ता, दुर्गा माता...
हिमायतनगरसह हदगाव न.पं. चा १ कोटी ८० लाखाचा निधी हिंगोलीला वळविला…? -NNL

हिमायतनगरसह हदगाव न.पं. चा १ कोटी ८० लाखाचा निधी हिंगोलीला वळविला…? -NNL

नांदेड, हिंगोली
हिमायतनगर। लोकसभा निवडणूक होताच हिमायतनगर येथील स्मशानभूसाठी मंजूर करण्यात आलेला तब्बल 0.95 कोटी रुपये तर हदगाव नगरपरिषदेला 0.85 कोटी रुपये, किनवट नगरपरिषद 0.30 कोटी, माहूर नगरपंचायत 0.20 कोटी असा एकूण 2 कोटी 40 लाख रुपयाचा निधी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात हिंगोली नगरपरिषदेला 11 जून रोजी दिल्याचे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव श्रीकांत आडगे यांनी संबंधित नगरपंचायत, नगरपरीषदेला पत्र पाठवून कळविले आहे. हिंगोली लोकसभा महायुतीच्या पराभूत उमेदवारांना महायुतीच्या शासनाने तत्कालीन खा. हेमंत पाटील यांनी दिलेला निधी जैसे थे ठेवण्यात यश येईल का? याकडे हदगाव किनवट विधानसभा क्षेत्रातील जनतेचे लक्ष लागून आहे. हिमायतनगरसह नांदेड जिल्ह्यातील उपरोक्त नगरपंचायत नगरपरिषदेला तत्कालीन खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून वैशिष्ट्य पूर्ण योजनेअंतर्गत हिमायतनगर येथील स्मशानभूसाठ...
डाॅ.आकाश देशमुख यांच्या सामाजिक कार्याची खास आठवण -NNL

डाॅ.आकाश देशमुख यांच्या सामाजिक कार्याची खास आठवण -NNL

लेख
करोनाचा काळ म्हणजे साऱ्या जगाला भयभीत करणारा काळ होता.संकटाचा महा डोंगरच अल्पकाळात तयार झालेला होता.आपलाच माणुस आपल्या माणसाला समोर आला की,सैरावैरा भित पळत एकांतात पळत होता.माणूस माणसा पासून हात -दोन हात लांबच हात होता.अशा परिस्थिती एक एक दिवस कसा तरी कटत होता.सर्व काळ इथे थांबल्या सारखा वाटत होता.या काळात वेगाने धावणारे वस्तु,यंत्रा पासून माणसा पर्यत अनिश्चीत काळासाठी थांबलेली होती.अशा कठिण दिवस चालेल्या काळातल्या एका भर दुपारी गावाकडून नातेवाईकाचा फोन आला की,पेंशटची बीपी खूप वाढली आणी त्यात उलटी होवून एका साईडचे हात पाय थोडे थरथरत आहेत.हदगावच्या डाॅक्टर दवाखान्यात घेत नाही.नांदेडला दवाखान्यात येतोय. कुठल्या दवाखान्यात जावे ? या प्रश्नामुळे सध्याचा कारोनाचा वातावरणामुळे काळजी तर वाढलीच पण माझी तळमळ वाढलेली पेंशटची...त्यात मी कार्यालयात ... साहेब समोर... हातात अत्यंत महत्वाचे कामही असल...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत; 1 कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त -NNL

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत; 1 कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त -NNL

क्राईम
मुंबई| उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पनवेल मुंब्रा महामार्गाच्या डाव्या बाजुस, स्टार वेल्डींग वर्क्सच्या समोर, तळोजे पाचनंद, तळोजे नवी मुंबई येथे कारवाई करीत 1 कोटी रूपये किंमतीचा अंमली पदार्थ गांजा जप्त केला. या कारवाईमध्ये आरिफ जाकीर शेख (वय 25 वर्ष) व परवेझ बाबुअली शेख (वय 29) दोन्ही रा. सायन कोळीवाडा मुंबई यांच्याविरूद्ध एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये आंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता आहे. या गुन्ह्यातील आरोपींकडून पांढऱ्या रंगाच्या नॉयलॉन गोण्यामध्ये 414 किलो 1 कोटी 13 लाख 90 हजार रूपये किंमतीचा गांजा मिळून आला आहे. त्याचबरोबर वाहन व मोबाईल असा मुद्देमाल एनडीपीएस (नॉर्कोटीक्स ड्रग अँड सायकोट्रॉपीक सबस्टान्सेस ॲक्ट ) कायद्यान्वये जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंश...
error: Content is protected !!