Tuesday, June 30

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
सागवानाची तस्करी करणारी कार किनवट वन विभागाच्या ताब्यात सागवान तस्कर मात्र फरार -NNL

सागवानाची तस्करी करणारी कार किनवट वन विभागाच्या ताब्यात सागवान तस्कर मात्र फरार -NNL

क्राईम, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। दिनांक 15 /06/ 2024 रोजी किनवट - गोकुंदा रोडवर किनवट वन विभागाची कर्मचारीगस्त करत असतांना पांढऱ्या रंगाची टाटा इंडिका कार मध्ये सागवानाची तस्करी होत असल्याची माहिती गुप्त खबऱ्याच्या माध्यमातून वन विभागाच्या कर्मचाऱ्याला मिळाल्याने वाहनाचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. पण सागवान तस्कर नेहमीप्रमाणे अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले व वाहन सोडून आरोपी पळून गेले . सदरील सागवान तस्करी प्रकरणी टाटा इंडिका कार जवळ जाऊन तपासणी केली असता त्यामध्ये अवैधसागी कटसाईज नग -21 आढळून आले. आज्ञात आरोपी विरुद्ध वन कायद्याअंतर्गत किनवट वन विभागाने गुन्हा दाखल केला . या कार्यवाहीत उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक जी. डी.गिरी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा.किनवट पी. एल.राठोड यांच्या मार्गद्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी चिखली एम.एन.कतुलवार , एस. एम. कोम्पलवार ...
अप्पारावपेठ वन विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना रोपे देऊन केले स्वागत -NNL

अप्पारावपेठ वन विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना रोपे देऊन केले स्वागत -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या तल्लारी,सेवादास नगर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वन विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी वृक्षाची रोपे विद्यार्थ्यांना देऊन एक आगळावेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. व पहिली ते पाचवीच्या लहान बालकाच्या हस्ते वृक्षारोपण करून घेतले. हा उपक्रम राबवत असताना अप्पारावपेठ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षाची जोपासना कशी करावी वृक्षाची जोपासना केल्यानंतर पर्यावरणाची संतुलन बिघडणार नाही. जमिनीची धूप होणार नाही. व निसर्गाचा समतोल कायम राहील. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसह पालकांनी पुढाकार घ्यावा. व पर्यावरण अबाधित ठेवावे अशा सूचना दिल्या व झाडे जोपासण्यासंदर्भात मार्गदर्शन केले व प्रत्येक व्यक्तीने प्रत्येकाच्या घरासमोर एक झाड किमान लावून पर्यावरणाचे संतुलन राखावे असे या प्रसंगी आवह...
कै. शांताराम संगणे जलतरणिका नांदेड येथे रविवारी २९ व्या भव्य जलतरण स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन -NNL

कै. शांताराम संगणे जलतरणिका नांदेड येथे रविवारी २९ व्या भव्य जलतरण स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन -NNL

स्पोर्ट्स, नांदेड
नांदेड। एन्जॉय स्विमिंग ग्रुप नांदेडच्या वतीने कै. शांताराम संगणे जलतरणिका नांदेड येथे रविवारी दि. १६ जून रोजी सकाळी ७ ते १० पर्यंत २९ व्या भव्य जलतरण स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष ॲड. चिरंजीलाल दागडिया व सचिव धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. मागील २८ वर्षांपासून जलतरण क्षेत्रातील एन्जॉय स्विमिंग ग्रुप ही संस्था अशा स्पर्धांचे व रक्तदान शिबिरांचे आयोजन दरवर्षी करीत असते. स्पर्धा यशस्वी व्हावे यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. स्वागत समिती: जयप्रकाश मूंदड़ा, द्वारका साबु, केशव मालेवार, व्यंकटेश जिंदम, प्रसिद्धी समिती:शैलेष तोष्णीवाल,मुरलीधर अट्टल, दीपक बोधने ,अर्थ समिती: गंगाधर बड़वणे, लक्ष्मीकांत माळवतकर, भास्कर स्वामी, अल्पोहार समिती:रमेश डागा ,सुभाष गादेवार, शिरीष गीते, बालाजी यलगंटवार, प्रथमोपचार समिती: डॉ. पी. सुदर्शन, डॉ. सं...
कापूस, सोयाबीन, इतर तेलबिया उत्पादकता वाढ, मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन -NNL

कापूस, सोयाबीन, इतर तेलबिया उत्पादकता वाढ, मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड
नांदेड| कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळी चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सन 2024-25 मध्ये योजनेंतर्गत चालू खरिप हंगामामध्ये पुढील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत . नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस साठी अर्ज करण्याचा कालावधी 12 ते 30 जून पर्यंत असेल तर मेटाल्डीहाइड सोयाबीनसाठी अर्ज करण्याचा कालावधी 12 ते 23 जून 2024 पर्यंत असेल. या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्...
पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात -उपमुख्यमंत्री अजित पवार – NNL

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात -उपमुख्यमंत्री अजित पवार – NNL

Blog
पुणे| आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, असेही सांगितले. विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२४ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार सर्वश्री दिलीप मोहिते पाटील, संजय जगताप, दत्तात्रय भरणे, समाधान अवताडे, बबन शिंदे, संजय शिंदे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह...
शालेय विद्यार्थ्यांना लवकरच दर्जेदार एकसमान गणवेश देणार; शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण – NNL

शालेय विद्यार्थ्यांना लवकरच दर्जेदार एकसमान गणवेश देणार; शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण – NNL

Blog
मुंबई| ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेची अंमलबजावणी सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापैकी एक गणवेश नियमित स्वरूपाचा तर दुसरा गणवेश स्काऊट व गाईड या विषयाकरिता निर्धारित करण्यात आलेला आहे. याकरिता प्रती गणवेश 300 रुपये आर्थिक तरतूद उपलब्ध असून त्यातील 190 रुपये कापड खरेदीकरिता तर 110 रुपये शिलाई, अनुषंगिक खरेदी व वाहतुकीकरिता निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेशाच्या शिलाईचे काम जोमाने सुरू असून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 44 लाख 60 हजार 004 विद्यार्थ्य...
वृक्ष लागवड, लेक लाडकी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश – NNL

वृक्ष लागवड, लेक लाडकी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश – NNL

Blog
नांदेड| जूनमध्ये होणारी वृक्ष लागवड, लेक लाडकी योजनेतील लाभार्थ्यांची वृद्धी, शासनाच्या बांबू मिशनची अंमलबजावणी आणि लोकशाही दिनानिमित्त दाखल झालेल्या प्रलंबित तक्रारींचा तसेच जिल्हा व राज्यस्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील उच्चस्तरीय बैठकीमध्ये घेण्यात आला. निवडणुका झाल्यानंतर शासन जोमाने कामाला लागले असून खरीपाच्या संदर्भातील कृषी विभागाच्या अनेक बैठका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्या आहेत. यासोबतच जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बी -बियाणे, खते कीटकनाशके यांची उपलब्धता व त्या संदर्भातील आढावा तालुका स्तरावर जाऊन घेण्यात आला आहे. त्यानंतर शासन स्तरावरील काही महत्त्वाच्या योजनांचा आढावा आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. आजच्या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळ...
जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांनी सेतू केंद्रात अर्ज करून मिळवावी विनामूल्य रेती NNL

जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांनी सेतू केंद्रात अर्ज करून मिळवावी विनामूल्य रेती NNL

नांदेड
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून ज्यांना घरकुल मिळाले आहेत अशा लाभार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने मोफत रेतीसाठा उपलब्ध केला आहे. शासन निर्णयानुसार सेतू केंद्रात अर्ज करून घरकुल लाभार्थी मोफत रेतीसाठा घरासाठी मिळवू शकणार आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यात घरकुलाच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात 3 हजार ६६२ लाभार्थ्यांसाठी एकूण १७ हजार ३७२ ब्रास रेतीसाठा वितरित करण्यात आला आहे. अशा विनामुल्य् वाळु उपलब्धथ करुन दिलेल्याय घरकुलाच्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने www.nanded.nic.in डब्ल्यू डब्ल्यू डॉट नांदेड डॉट एनआयसी डॉट इन या वेबसाईटवर जाहीर केली आहे. घरकुलाच्या विविध योजनातून ज्यांना शासकीय घर मंजूर करण्यात आले आहे. अशा मंजुर घरकुल लाभार्थीची माहिती महाखनिज प्रणाली या वेबसाईटवर नोंदविण्यात आली आहे. या...
हिमायतनगर येथे जुन्या आठवणींना उजाळा देत रंगला विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा -NNL

हिमायतनगर येथे जुन्या आठवणींना उजाळा देत रंगला विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा -NNL

नांदेड
हिमायतनगर। येथे १९९४ ची बॅच इयत्ता बारावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यानी तब्बल ३० वर्षानंतर एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत एक मेकांच्ची ख्याली, खुशाली जाणून घेतली. परमेश्वर मंदिर सभागृहात हा जुन्या विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. १९ ९४ मध्ये हुतात्मा जयवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यानी गेट टुगेदरची संकल्पना मांडली. तिस वर्षाचा प्रदीर्घ प्रवास करून एकत्र आलेल्या विद्यार्थाचा स्नेह मेळावा अगदी खेळी मेळीच्या वातावरणात पार पडला. तेव्हाची विद्यालयाची परिस्थिती व विद्यार्थ्याची गुणवत्ता व तेव्हाचे शिक्षण या वर दिलखुलास चर्चा करून या भव्य दिव्य स्नेह मेळाव्याचा आनंद माजी विद्यार्थ्यानी घेतला. व तसेच काही विद्यार्थ्यानी आपल्या अंगभूत कलेचा अविष्कार उपस्थितांना दाखविला. आपल्या पाल्यांच्या शिक्षणाविषयी एकमेकास माहीती देवून सा...
शैक्षणिक वर्षारंभ प्रसंगी सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करावा -NNL

शैक्षणिक वर्षारंभ प्रसंगी सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करावा -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात शनिवारी (दि.१५ जून) व विदर्भातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक ०१/०७/२०२४ रोजी प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सत्र २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करावे, असे राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) नंदकुमार बेडसे यांनी पत्राद्वारे कळविले असल्याचे गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी सांगितले. त्याअनुषंगाने पुढील प्रमाणे मुख्याध्यापकांनी कार्यवाही करावी : शाळेच्या परिसरातील (वयोगट ६ ते १४ वर्ष) वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात ...
error: Content is protected !!