Thursday, July 2

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
कृषी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचे निर्देश – NNL

कृषी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचे निर्देश – NNL

नांदेड
नांदेड| माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै हा दिवस त्यांचा वाढदिवस राज्यात कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 1 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत कृषिदिन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत साजरा करण्यात येणार आहे. कृषिदिनाच्या दिवशी शेती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा वृक्ष देवून गौरव करण्यात येणार आहे. या कायर्क्रमात शेतकऱ्यांना किटनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, गुलाबी बोंडअळी नियंत्रण, नॅनो फर्टीलायझरचा वापर, एकात्मीक किड व रोग व्यवस्थापन विविध पिके लागवड तंत्रज्ञान, एकात्मीक खत व्यवस्थापनाबाबत शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी किटकना...
सिकलसेल तपासणी करा व सिकल आजाराची साखळी खंडीत करा – NNL

सिकलसेल तपासणी करा व सिकल आजाराची साखळी खंडीत करा – NNL

नांदेड
नांदेड| “सिकल आजाराची साखळी खंडित करणे अत्यंत आवश्यक आहे. “ सिकलसेल आजाराविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी राज्याने निवडक जिल्ह्यामध्ये 19 जून रोजी सिकलसेल नियंत्रण दिन साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सिकलसेल रोग हा लाल रक्तपेशीसी संबंधित विकार आहे. हा विकार सामान्यतः लाल रक्तपेशींच्या आकारावर आणि कार्यावर परिणाम करतो. ही एक गंभीर समस्या आहे. लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 19 जून रोजी जागतिक सिकलसेल जागरुकता दिवस साजरा केला जातो. त्यानुषंगाने जन-जाती कार्य मंत्रालय भारत सरकार आणि जिल्हा प्रशासन नांदेड यांच्यावतीने 19 जून ते 3 जुलै 2024 सिकलसेल पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी प्रत्येक 1 ते 40 वयोगटातील व्यक्तीने जबाबदारीने स्वताहून पुढे येऊन सिकलसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्...
हिंगोलीचे नवनिर्वाचित खा.नागेश पाटील आष्टीकरांना घ्यावी लागली दुसऱ्यांदा संसदेत शपथ – NNL

हिंगोलीचे नवनिर्वाचित खा.नागेश पाटील आष्टीकरांना घ्यावी लागली दुसऱ्यांदा संसदेत शपथ – NNL

नांदेड, हिंगोली
नवी दिल्ली| उद्धव ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभेचे नवनिर्वाचीत शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी संसदेत शपथ घेताना यांचा शपथविधी ड़रहावर थांबविण्यात आला असून, अध्यक्षांच्या सूचनेवरून दुसऱ्यांदा लिहून दिलेल्या नुसार शपथ घ्यावी लागली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत चुरशीची झाली होती. या मतदार संघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना होता. यामध्ये ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटाच्या बाबूराव कदम यांचा पराभव केला. त्यानंतर नवी दिल्ली येथील संसदेत सर्वच नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान हिंगोली लोकसभेचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा शपथविधी सुरु झाला. नागेश पाटील आष्टीकर यांनी संसदेत मराठीत शपथ घेताना शपथेच्या सुरुवातीला म्हटलं की, मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्य...
बाबारमजान गल्लीत आठ आठ दिवस येत नाही नळाला पाणी, न.प.चे दुर्लक्ष; रहिवाशांनी दिला घागर मोर्चाचा इशारा -NNL

बाबारमजान गल्लीत आठ आठ दिवस येत नाही नळाला पाणी, न.प.चे दुर्लक्ष; रहिवाशांनी दिला घागर मोर्चाचा इशारा -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। शहरातील बाबारमजान गल्ली येथे नळांना पाणीच येत नसतांना न.प.च्या ट्रॅक्टरद्वारे पाणी पुरवठा केला जाणारे टेंकर पण या वार्डात येत नसून टँकर कर्मचारी व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या संगणमताने केला जात असुन आठवड्यातून दोनदा टँकर येतो तर कधी कधी आठवड्यातून एकदाच येतो बाकी वार्डात दररोज टँकर चालू असुन बाबारमजान गल्लीतील जनतेचे म्हणणे आहे. अधिच नळाला पाणी येत नसतांना टँकरद्वारे नियोजीत पाणीपुरवठा करणारे न.पा. कर्मचारी यांना सांगल्यावरही ते टँकर पाठवत नाहीत नळ ही सोडत नाहीत. नवीन पाईपलाईन सुद्धा झालेली आहे ते पण पाणी आतापर्यंत चालू झाले नाही बाबा रमजान गल्ली येथील रहिवासी असलेले सय्यद अजहर यांनी इतर नागरिकांनी लेखी निवेदन न.प. चे मुख्याधीकरी यांना येथील रहिवाशांनी निवेदन देऊन तक्रार सुद्धा केलेली आहे. हर एक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा काम नगरपालिकेचे आहे. या सर्व बाबींची दखल ...
भारतीय स्टेट बँकेचा प्रगतीशील शेतकरी मेळावा नांदेड येथे संपन्न -NNL

भारतीय स्टेट बँकेचा प्रगतीशील शेतकरी मेळावा नांदेड येथे संपन्न -NNL

नांदेड
नांदेड। भारतीय स्टेट बँक क्षेत्रिय कार्यालय नांदेड यांचेवतीने प्रगतीशील शेतकरी मेळावा दि 21.06.2024 रोजी शहरातील नामांकित विसावा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यास शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन श्री भाऊसाहेब बारहाटे, जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड यांचे हस्ते करण्यात आले, ह्यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय स्टेट बॅंकेचे उपमहाप्रबंधक श्री. प्रियकुमार सरिगला , मुख्य अतिथी श्री दिलीप दमयावार , जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड यांचेसह भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रिय प्रबंधक श्री पक्काला कालीदासु, डाॅ समीर बिलोलीकर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती. आपले उद्घाटनपर विचार मांडताना जिल्हा कृषी अधीक्षकांनी शेतकर्यांना विविध शासकीय योजनांची माहीती दिली. तर अध्यक्षीय भाषणात श्री सरीगला यांनी कृषी दिर्घमुदत कर्जविषयक मार्गदर्शन केले तसेच शेतक...
मनरेगाचा तांत्रिक अभियंता सोळा वर्षांपासून हिमायतनगर पंचायत समितीला तळ ठोकून कसा ? -NNL

मनरेगाचा तांत्रिक अभियंता सोळा वर्षांपासून हिमायतनगर पंचायत समितीला तळ ठोकून कसा ? -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर। येथील पंचायत समिती कार्यालयात मनरेगा विभागात तांत्रिक अभियंता गेल्या सोळा वर्षांपासून तळ ठोकून बसला असुन, माहूर येथे बदली झाल्यानंतर सहा महिन्यांत परत हिमायतनगर पं.स.ला तांत्रिक अभियंता म्हणून पदभार स्वीकारला आहे. सदरील तांत्रिक अभियंता यांनी एकाच ठिकाणी राहण्यासाठी नरेगा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरले असून, हिमायतनगर पंचायत समितीत तळ ठोकून रहाण्याचे गुड काही वेगळेच असल्याची चर्चा रंगू लागली आहे आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मीनल करनवाल यांनी लक्ष देण्याची मागणी कामानिमित्त या कार्यालयात चकरा मारणाऱ्या लाभार्थी मधून केली जाते आहे.  प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना एका ठिकाणी तिन वर्षाचा कालावधी असतो. याचं पंचायत समिती कार्यालयातील अनेक गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे वास्तव आहे. परंतु हिमायतनगर येथील पंचायत समितीच्...
नांदेड-लातूर लोकसभेत “आळस ” भोवला; विधानसभेत गावागावात “लीड ‘देण्यासाठी सज्ज व्हा -प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड-लातूर लोकसभेत “आळस ” भोवला; विधानसभेत गावागावात “लीड ‘देण्यासाठी सज्ज व्हा -प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड
नांदेड| नांदेडमध्ये जो हलगर्जीपणा झाला तसा जर लोहा विधानसभा मतदारसंघात होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. आपण पराभवानंतर पुन्हा जोमाने उभे राहिलो. माझा पराभव झाला पण त्याचा मी कोणालाही दोष देणार नाही पण कोणी संपत्तीच्या जोरावर येथील निवडणूक जिकतो असे म्हणत असेल तर त्यांनी हा पैसा कसा मार्गाने मिळविला आणि तो आज पर्यंत सुरक्षित आहे याचे काळजी करा. आपण पैसा कमविला नाही पण आपल्या सारखी जीवापाड प्रेम करणारी माणसे कमावली. प्रत्येक गावात जर पंचाहत्तर टक्के मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असाल तरच आपल्या भावनांचा विचार करू असे आवाहन केले. लोहा-कंधार तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विक्की गार्डन पारडी येथे "संवाद "बैठकीचे माजी सभापती आनंदराव पाटील व पदाधिकारी यांनी स्वतः याचे आयोजन केले होते. यावेळी ॲड.किशोर देशमुख, कल्याण सावकार सुर्यवंशी, सौ. प्रणिताताई देवरे-चिखलीकर, प्रवीण पाटील चिखली...
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे – सर्वजित बनसोडे – NNL

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे – सर्वजित बनसोडे – NNL

नांदेड
नांदेड| वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने जोमाला कामाला लागावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा निरीक्षक ॲड. सर्वजित बनसोडे यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटन बांधणीचा त्याचबरोबर आगामी विधानसभेची तयारी निमित्ताने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हा दक्षिणच्यावतीने दक्षिण विभागाच्या संपर्क कार्यालयात आज आढावा बैठक संपन्न झाली. तालुका पदाधिकारी व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या यावेळी प्रतिक्रिया घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी काय करावे लागेल यासाठी सूचना व चर्चा करण्यात आली. यावेळी मंचावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा निरीक्षक ॲड. सर्वजित बनसोडे यांची प्रमुख ...
हेलन केलर: अंधार आणि शांततेच्या पलीकडे – NNL

हेलन केलर: अंधार आणि शांततेच्या पलीकडे – NNL

लेख
हेलन केलरचा जन्म 27 जून 1880 साली अमेरिकेच्या तुस्कुम्बिया, अलाबामा इथला. 19 महिन्यांच्या वयात छोट्या वयात तिला गंभीर आजाराने ग्रासले आणि त्यात कर्णबधिर आणि दृष्टीहीन करून सोडले. तिच्या असहाय्यतेमुळे निराश झालेली हेलन चिडचिडी आणि रागीट बनली होती. केलरच्या वयाच्या सातव्या वर्षी तिला शिकवण्यासाठी ॲन मॅन्सफिल्ड सुलिव्हन ह्या 20 वर्षीय तरुणीला तिच्या पालकांनी शिक्षिका म्हणून कामावर ठेवले. सुलिव्हन ही केलरच्या आयुष्यात आली तो क्षण तिच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरला. फिंगर-स्पेलिंग, स्पर्शिक सांकेतिक भाषा आणि कठोर शिक्षणाद्वारे, सुलिव्हनने केलरला शिकवायला सुरू केली. तिने हेलन केलर सोबत संवाद साधण्यासाठी प्रामुख्याने अमेरिकन सांकेतिक भाषा (एएसएल) वापरली.. एएसएल व्यतिरिक्त, तिने स्पर्शिक सांकेतिक भाषा देखील वापरली, जिथे चिन्हे दिसण्याऐवजी स्पर्शाने ओळखल्या जातात. हेलनच्या वयाच्या 10व्या वर्षी ॲनने...
संतोष यादवराव मिसलवार यांचे निधन -NNL

संतोष यादवराव मिसलवार यांचे निधन -NNL

नांदेड
किनवट। येथील लोहार गल्लीतील  रहिवाशी तथा गट शिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समितीमधील वरिष्ठ सहाय्यक  संतोष यादवराव मिसलवार ( वय 49 वर्षे )  यांचे रविवारी (ता.23) सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने  निधन झाले आहे. त्यांचे प्रश्चात पत्नी , एक मुलगा व मुलगी असा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता.24) सकाळी 11 वा. येथील कैलास मोक्षभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
error: Content is protected !!