Thursday, July 2

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
मतदार यादीमध्ये आपल्या नावांची खातरजमा करण्यासाठी पुनरिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

मतदार यादीमध्ये आपल्या नावांची खातरजमा करण्यासाठी पुनरिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड
नांदेड| मतदार यादी मध्ये आपले नाव नाही, आपले नाव व्यवस्थित नाही, छायाचित्र नाही, आपल्या नगरातील मृत व्यक्तींची नावे आहे, चुकीची नावे आहे अशा अनेक तक्रारी मतदानाच्या दिवशी केल्या जातात. मात्र या सर्व बाबींवर मात करण्याची संधी आता येणाऱ्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगांनी मतदारांना दिली आहे. २५ जून पासून मतदान पुनरिक्षण कार्य नांदेड जिल्ह्यात सुरू झाला आहे. आपले नाव आहे अथवा नाही, याची खातरजमा करण्याची संधी आयोगाने दिली असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) घोषित केला आहे. 25 जुलै रोजी जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप निवडणूक यादी तयार होणार आहे...
मुलांची पाहिली कमाई आणि भावनिक झालेले पालक ! मराठा समाजासाठीच्या योजनेचे ‘सारथी’चे प्रशिक्षणानंतरचे दमदार सादरीकरण -NNL

मुलांची पाहिली कमाई आणि भावनिक झालेले पालक ! मराठा समाजासाठीच्या योजनेचे ‘सारथी’चे प्रशिक्षणानंतरचे दमदार सादरीकरण -NNL

नांदेड
नांदेड| सरसेनापती वीर बाजी पासलकर “शिकता शिकता कमवा” या योजने अंतर्गत आज एका अभिनव उपक्रमात विद्यार्थ्यांच्या पहिल्या कमाईतून आपल्या आई-वडिलांना मुलांनी भेटवस्तू दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांच्या उपस्थितीत हा भावनिक कार्यक्रम लक्षवेधी ठरला. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांनी आज या उपक्रमात आपल्या पालकांसह सहभाग नोंदवला होता. मुला मुलींच्या पहिल्या कमाईतील पैशातून आपल्याच आई-वडिलांना भेटवस्तू देण्याचा हा कार्यक्रम एक भावनिक सोहळा झाला. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे मार्फत एमकेसीएलच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण केंद्रद्वारे दिनांक 1 फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य कार्यक्रम सहा महिन्याचा डिप्लोमा कोर्...
अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड
नांदेड| जिल्ह्यात गत दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळविण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्‍ये झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे, मार्च-एप्रिल 2023 मध्‍ये झालेल्‍या गारपिठ व अवकाळी पावसामुळे, जुन-जुलै 2023 मधील झालेल्या अतिवृष्टीमुळे व नोव्‍हेंबर 2023 मधील अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या त्रिस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. आजपर्यंत 5 लाख 14 हजार 183 शेतक-यांना 415 कोट...
शासन परिपत्रकनुसार प्राथमिक शाळां भरविण्यात यावी – पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांची मागणी -NNL

शासन परिपत्रकनुसार प्राथमिक शाळां भरविण्यात यावी – पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांची मागणी -NNL

नांदेड
नांदेड। शासन परिपत्रकातनुसार इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरविण्यात यावे अशी मागणी पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याकडे केली आहे. शासनाने दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरविण्याचे आदेश दिले होते. हे आदेश शैक्षणिक वर्ष 2024 -25 पासून लागू झाले आहेत. विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होईल ते उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासन परिपत्रक काढण्यात आले. परंतु जिल्ह्यातील अनेक शाळांनी या परिपत्रकाला बगल दिली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील शाळा 15 जून पासून सुरू झाल्या असून आठवडा लोटला असला तरी शाळांनी वेळेत बदल केला नाही. ही बाब गंभीर असून शिक्षण विभागाने परिपत्रकाचीची अंमलबजावणी न करणाऱ्या...
सुदर्शननगर येथील रहिवाशांनी आ.कल्याणकर यांचे मानले आभार -NNL

सुदर्शननगर येथील रहिवाशांनी आ.कल्याणकर यांचे मानले आभार -NNL

नांदेड
नांदेड। येथील तरोडा खुर्द भागातील सुदर्शन नगर येथील नागरिकांनी आमदार बालाजीराव कल्याणकर यांचे त्यांनी त्यांच्या विशेष निधीतून प्रभागात केलेल्या विविध विकास कामांसाठी व नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल संबंधित नगरातील व प्रभागातील नागरिकांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानत आमदार कल्याणकर यांचा सत्कार करण्यात आला. याविषयी अधिक माहिती अशी की आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांनी सुदर्शन नगरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर विषयाचा विचार करून कॉलनीतील ओपन स्पेस मध्ये एक बोर तातडीने मारून द्यायचा निर्णय घेतला. व तसेच एल.टी. पोल विषय अन्वय येणाऱ्या (जिल्हा नियोजन समिती) मधून निधी मंजूर करण्याचे संबंधित विभागास आदेश देण्यासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यासाठी नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी उपस्थित सुदर्शन नगर येथील रहिवासी प्रकाश मामुलवार, हन...
राज्यात महाविकास आघाडीचेच सरकारी येईल : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. चंद्रकांत हंडोरे यांचा विश्वास -NNL

राज्यात महाविकास आघाडीचेच सरकारी येईल : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. चंद्रकांत हंडोरे यांचा विश्वास -NNL

नांदेड
नांदेड। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रात झालेला पराभव आणि महाविकास आघाडीला मिळालेले यश हे निश्चितपणे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणारे ठरेल . महाविकास आघाडी राज्यात 170 हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी काल नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केला . एका खाजगी कामानिमित्त हंडोरे नांदेड येथे आले असता ते माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते . यावेळी भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिनेश निखाते , सुरेश हटकर संजय कवठेकर, शत्रुघ्न वाघमारे , प्रकाश दिपके , मिलिंद लोकरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. मध्यमशी संवाद साधताना खा. हंडोरे म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपकी बार चार सौ पार चा नारा देण्यात आला होता. चार सो पारचा नारा द...
शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात भगवा पंधरवाडा : २५ जून ते 10 जुलै पर्यंत प्राथमिक सदस्य नोंदणीसह विविध कार्यक्रम -NNL

शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात भगवा पंधरवाडा : २५ जून ते 10 जुलै पर्यंत प्राथमिक सदस्य नोंदणीसह विविध कार्यक्रम -NNL

नांदेड
नांदेड। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने भगवा पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. दिनांक 25 जून ते 10 जुलै या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून याच वेळी बूथ प्रमुख , शिव दूत प्रमुखांच्या नेमणुका करण्यात येणार असून उर्वरित शाखा प्रमुखांचे नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर , जिल्हा प्रमुख उमेश मुंडे , जिल्हा प्रमुख गंगाधर बडूरे यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत दिली. शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत जिल्हाप्रमुख शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले , सह संपर्कप्रमुख सरदार गुरमीत सिंग टामाना , रावसाहेब महाराज , मागासवर्गीय सेलचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम , विधानसभा प्रमुख अशोकराव पाटील उमरेकर ,...
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या प्रेरणादायी सहभागाने जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयात स्वच्छता -NNL

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या प्रेरणादायी सहभागाने जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयात स्वच्छता -NNL

नांदेड
नांदेड| मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी स्वच्छता मोहिमेच्या दरम्यान स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या कृतीने कर्मचार्‍यांना स्वच्छतेचे महत्‍व आणि त्यात सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रभावीपणे पटवून दिले. कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्‍वच्‍छ व निटनेटका राहावा यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दर महिन्‍याच्‍या 25 तारखेला जिल्‍हा परिषदेअंतर्गत सर्व कार्यालयात स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍याचा उपक्रम हाती घेतला आहे. आज या माहिमेचा जिल्‍हा परिषदेत शुभारंभ करण्‍यात आला. मोहिमेच्‍या पहिल्‍याच दिवशी परिषदेसह जिल्‍हयातील सर्व कार्यालयातून स्‍वच्‍छता करण्‍यात आली. यावेळी सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग नोंदवला. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्‍कावार, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शिवप्रसाद चन...
क्‍युआर कोडव्‍दारे हजेरी न देणा-या कर्मचा-यांची व्हिडीओ कॉलव्‍दारे पडताळणी: मुख्‍य कार्यकारी अधिकारी करणार कारवाई – NNL

क्‍युआर कोडव्‍दारे हजेरी न देणा-या कर्मचा-यांची व्हिडीओ कॉलव्‍दारे पडताळणी: मुख्‍य कार्यकारी अधिकारी करणार कारवाई – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| ग्रामीण भागातील कर्मचा-यांच्‍या उपस्थितीसाठी जिल्‍हा परिषदेने शाळा, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र, ग्राम पंचायत आदी ठिकाणी क्‍युआर कोड लावले आहेत. परंतू काही कर्मचारी या नवीन प्रणालीचा वापर करण्यास नकार देत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल ह्या शाळा, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, ग्रामपंचायत आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी थेट व्हिडिओ कॉलकरुन पडताळणी करणार आहेत. दरम्‍यान कार्यालयाची वेळ व शिस्‍त न पाळणा-या व गैरहजर असणा-या कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उचलण्‍यात येणार असल्‍याची माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे. ग्रामीण व दुर्गम भगात कर्मचारी गावात वेळेवर उपस्थित राहत नाहीत. काही वेळा अनुपस्थित राहतात अशा तक्रारी वारंवार जिल्‍हा परिषदेला येत होत्‍या. त्‍या अनुषंगाने ग्राम पातळीवरील कर्मचारी गाव...
अंगारिका चतुर्थी निमित्ताने वाढोण्याच्या इच्छापूर्ती श्री वरद विनायक दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी -NNL

अंगारिका चतुर्थी निमित्ताने वाढोण्याच्या इच्छापूर्ती श्री वरद विनायक दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी -NNL

Blog
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) शहराजवळील पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर इच्छापूर्ती श्री वरद विनायक आणि श्री कनकेश्वर महादेव मंदिर आहे. येथील मंदिरात भाविक दर्शनासाठी दररोज येत असतात चतुर्थीला विशेष गर्दी असते. यंदाच्या नूतन वर्षातील हि पहिली अंगारिका चतुर्थी असल्याने आज सकाळपासून महिला मंडळींनी गर्दी केली होती अशी माहिती पुरोहित परमेश्वर बडवे यांनी दिली. मृग नक्षत्र प्रारंभ होऊन १५ दिवस झाले मात्र म्हणावा तास पाऊस झाला नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील भाविक भक्तांनी पाऊस पाणी चांगले पडू दे.... आणि बळीराजाला सुगीचे दिवस येऊ दे.... असे म्हणत पावसासाठी साकडे घातले आहे. मंदिराची निमित्ती होऊन अनेक वर्ष लोटली मात्र भाव मंदिरावर कळस बसविण्याचा मुहूर्त लागला नव्हता. या मंदिराच्या कळस रोहणाचा मुहूर्त बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, दत्त संस्थान पिंपळगावकर आणि स...
error: Content is protected !!