Thursday, July 2

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘वृक्षोत्सव पंधरवाडा’ निमित्त वृक्ष लागवड – NNL

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘वृक्षोत्सव पंधरवाडा’ निमित्त वृक्ष लागवड – NNL

नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना व उद्यान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० जून ते २४ जून या कालावधीमध्ये वृक्षोत्सव पंधरवाडा निमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात वड, कृष्णवड, पिंपळ पिंप्रन, उंबर, कडुलिंब, अर्जुन, नागकेशर, खैर, रुद्राक्ष, रिटा, हिरडा, बेहडा, आपटा, नारळ, आवळा, अंबा, जांभूळ, बोर, फणस, बकुळ, बेल, पळस, पारिजात इ. विविध वृक्षाच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परिषद सदस्य इंजिनिअर नारायण चौधरी, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, ज्ञानस्त्रो...
‘रामायण-महाभारत’ या ग्रंथांमध्ये शेकडो खगोलीय संदर्भ; भारतीय ज्ञानामुळेच पाश्चात्त्यांची वैज्ञानिक प्रगती ! – डॉ. नीलेश ओक, अमेरिका – NNL

‘रामायण-महाभारत’ या ग्रंथांमध्ये शेकडो खगोलीय संदर्भ; भारतीय ज्ञानामुळेच पाश्चात्त्यांची वैज्ञानिक प्रगती ! – डॉ. नीलेश ओक, अमेरिका – NNL

Blog
गोवा| सनातन धर्म हा शब्दप्रामाण्यावर आधारित आहे; कारण आपल्या ऋषीमुनींनी जे प्रत्यक्ष अनुभवले तेच शब्द प्रमाण मानले आहे. या शब्दप्रमाणाचा आपण ही अनुभव घेण्याचा प्रयत्न करायला हवा. रामायण-महाभारत आदी ग्रंथांमध्ये शेकडो खगोलीय संदर्भ आहेत. अमेरिका, कॅनडा या देशांतील ५००-६०० विद्यापिठांमध्ये या ग्रंथाचे अध्ययन केले जाते. युरोपात विज्ञानाची प्रगती झाली असली, तरी हे ज्ञान भारतातूनच विदेशात नेण्यात आले आहे. भारतातील समृद्ध ग्रंथांचे भाषांतर करूनच पाश्चात्त्यांनी आधुनिक विज्ञानामध्ये प्रगती केली आहे, असे स्पष्ट प्रतिपादन अमेरिका येथील ‘इन्स्टीट्यूट ऑफ ॲडवान्स सायन्स’चे डॉ. नीलेश नीळकंठ ओक यांनी केले. ते ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी ‘विश्वगुरु भारताचे बलस्थान : सनातन हिंदु धर्म ’ यावर बोलत होते. या महोत्सवासाठी इंडोनेशिया येथील...
इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे अतिविलंब शुल्काने आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ – NNL

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे अतिविलंब शुल्काने आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ – NNL

नांदेड
नांदेड| जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित व विलंब शुल्कासह परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन स्वीकारण्याची मुदत 17 जून 2024 होती. आता आवेदन पत्र सादर करण्याची विलंब शुल्काची निर्धारित मुदत संपल्यानंतर अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्क आकारून आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखांना मुदतवाढ दिली आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अतिविलंब शुल्क अंतिम मुदत रु. 50 प्रतिदिन प्रतिविद्यार्थी याप्रमाणे आहे. सोमवार 24 जून ते 1 जुलै 2024 असा आहे. विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत प्रतिदिन 100 रुपये प्रतिविद्यार्थी असून मंगळवार 2 जुलै ते 8 जुलै 2024 पर्यत आहे. अति विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 200 रुपये प्रतिदिन, प्रतिविद्यार्थी याप्रमाणे असून मंगळवार 9 जुलै त...
बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांसाठी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन – NNL

बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांसाठी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन – NNL

नांदेड
नांदेड| श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी विष्णुपूरी नांदेड यांच्या तर्फे बारावी उर्त्तीण विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट) 2024 कार्यक्रमाचे आयोजन बुधवार 26 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी विष्णुपूरी, नांदेड यांच्या मार्फत केले आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदेवे, श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी विष्णुपूरीचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 12 वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना पुढील शिक्...
कौठा ता. कंधार येथील गुन्हयातील आंतर राज्यीय दरोडयाचे टोळीतील 06 आरोपीतांना 34,88,461/- रुपयाचे मुद्देमालासह अटक -NNL

कौठा ता. कंधार येथील गुन्हयातील आंतर राज्यीय दरोडयाचे टोळीतील 06 आरोपीतांना 34,88,461/- रुपयाचे मुद्देमालासह अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मौजे मौजे कौठा येथे पाच ते सहा आरोपीतांनी गजानन श्रीहरी येरावा यांचे राहते घरी शस्त्राचा धाक दाखवुन दरोडा टाकुन सोन्याचे चांदीचे दागीने व नगदी रक्कम असा एकुण 41,35,000/- रुपये जबरीने चोरुन नेले होते. या घटनेनंतर नांदेड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अखेर कौठा ता. कंधार येथील गुन्हयातील आंतर राज्यीय दरोडयाचे टोळीतील 06 आरोपीतांना 34,88,461/- रुपयाचे मुद्देमालासह अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. याबाबत सवसितर वृत्त असे कि, दिनांक 15/06/2024 रोजी 03.00 वाजताचे सुमारास मौजे कौठा येथे पाच ते सहा आरोपीतांनी फिर्यादी नामे गजानन श्रीहरी येरावार, रा. कौठा ता. कंधार जि. नांदेड यांचे राहते घरी शस्त्राचा धाक दाखवुन दरोडा टाकुन सोन्याचे चांदीचे दागीने व नगदी रक्कम असा एकुण 41,35,000/- रुपये जबरीने चोरुन नेले...
पोफाळी पोलिसांनी वाहनासह २० लाखाचा गुटखा पकडला -NNL

पोफाळी पोलिसांनी वाहनासह २० लाखाचा गुटखा पकडला -NNL

क्राईम, उमरखेड, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार। शासन प्रतिबंधीत असलेला व अवैधरित्या वाहतुक होत असलेला २०,६१,५००/- रुपयाचा गुटखा मुददेमाल वाहनासह पोलीस स्टेशन पोफाळी च्या पथकाने पकडला. या कार्यवाहीमुळे गुटख्याचा गोरखधंदा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक्षक डॉ पवन बनसोड यांनी पोस्टे हददीत वाहतुक होत असलेल्या अवैध शासन प्रतिबंधीत गुटखा वाहतुकीवर सक्त कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पोफाळी चे पथकाने गोपनिय माहीती घेत दि. २४ जुन रोजीचे मध्यरात्री ०१.०० वा. एक संशयीत बोलेरो पिकअप वाहन क्र. एम.एच. २६-सी.एच. ०२६४ हे शासन प्रतिबंधीत गुटखा माल अवैधरित्या घेवुन जात असतांना उमरखेड पुसद रोडवर गंगणमाळ फाट्यावर सापळा लावला . एक पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप वाहन उमरखेड वरुन पुसद च्या दिशेने येतांना दिसली. सदर वाहनास हात दाखवुन थांबविले असता वाहनातील चालक पोलीसांना पाहुन वाहन जागे...
कोठारी ते पार्डी जाणाऱ्या रोडवरील शनिवारपेठ जवळील नव्याने बांधलेला पूल कोसळला -NNL

कोठारी ते पार्डी जाणाऱ्या रोडवरील शनिवारपेठ जवळील नव्याने बांधलेला पूल कोसळला -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे। रस्ते विकासावर भर दिला खरा मात्र केलेल्या कामाच्या दर्जाची कंत्राटदाराने वाट लावल्यामुळे कोठारी ते पार्डी-बोधडी जाणार्‍या मार्गावरील शनिवारपेठ जवळील नव्याने बांधलेला पूल कोसळला. नेमकाच रहदारीला पूल खुला करुन दिला होता. पूल दिवसा कोसळल्यामुळे वाहनांचा अपघात टळला. रात्री कोसळला असता तर कित्येक वाहनांचे अपघात झाले असते हे सांगणे कठीण होते. कोठारी ते पार्डी-बोधडीकडे जाणार्‍या मुख्य मार्गाचे कांही ठिकाणी डांबरीकरण आणि लहान पुलांचे बांधकाम करण्यात आले. डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा लपून राहिलेला नाही. किनवट ते मांडवा जाणार्‍या मार्गावर कमी जाडीचा डांबराचा थर देऊन गुत्तेदार कामाची गुंडाळपट्टी करीत असतांना वंजारवाडीतील कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क कामच थांबवल्याने प्रशासनातील संबंधित अभियंत्यांनी तात्काळ दखल घेतल्याने दुसर्‍याच दिवस्यी पुन्हा आवश्यकतेनुसार डांबरीकरण क...
स्वर्गीय अनुसयाबाई महाजन मरडे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी व गोळया औषधी वाटप -NNL

स्वर्गीय अनुसयाबाई महाजन मरडे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी व गोळया औषधी वाटप -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। गोकुंदा हददीतील शिवशंकरनगर येथे आज स्वर्गीय अनुसयाबाई महाजन मरडे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ ग्रामस्थांकरीता मोफत सर्वांग आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. सर्व प्रथम स्वर्गीय अनुसयाबाई महाजन मरडे यांच्या प्रतिमेचे पुजन त्यांचे पती महाजन मरडे, चिरंजीव आनंदा, संजय, गुरुनाथ मरडे, सूना सुलोचना, अर्चना, सुरेखा मरडे, त्यांचे नातू संदिप, गणेश मरडे यांनी केले. यानंतर कार्यक्रमात मरडे कुटुंबिय व भारत जोडो युवा अकादमी साने गुरुजी रुग्णालय, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ समाज सेवक डॉ. अशोक बेलेखोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी, गरोदर माता, बालके, वयोवृद पुरुष व महिला, किशोर वयीन मुली असे एकूण 51 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत औषधी, गोळया वाटप करण्यात आले. सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. मार्तंड कुलकर्णी, भारत जोडो युवा...
किनवट/माहुर तालुक्यातील बनावट दारूचा महापूर, राज्य उत्पादन शुल्काचे दुर्लक्ष -NNL

किनवट/माहुर तालुक्यातील बनावट दारूचा महापूर, राज्य उत्पादन शुल्काचे दुर्लक्ष -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट/माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसाढवळ्या टपऱ्या, हॉटेल व ढाब्यावर अनधिकृतपणे विदेशी दारू तर गावठी दारुची विक्री होत आहे. काही गावात थेट गावठी दारू काढण्याचे कारखाने पेव फुटल्याचे बोलले जात आहे. हे सर्व घडत असताना यावर नियंत्रण ठेवणारे किनवटचे राज्य उत्पादन शुल्क विभाग रसद गोळा करण्यात मश्गुल असल्याचा आरोप होत आहे. नांदेड जिल्ह्याचा अंदमान निकोबार संबोधल्या जाणाऱ्या किनवट/माहूर हे तालुके जिल्हा मुख्यालयापासून दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. अशात जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून तालुका स्तरावरील अधिकारी यांचा अर्थपूर्ण संबंधातून दारू व्यवसाय जोमात सुरू आहे. मग ते राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्ष करून अवैध व्यवसायात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती उदयास येत आहे. किनवट/माहूर तालुक्यातील आज घडील...
चालण्याची भव्य स्पर्धा रिमझिम पावसात देखील २८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला- धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर -NNL

चालण्याची भव्य स्पर्धा रिमझिम पावसात देखील २८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला- धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त घेण्यात आलेली २३ वी चालण्याची भव्य स्पर्धा रिमझिम पावसात देखील २८९ स्पर्धकांनी सहभाग घेतल्यामुळे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण संयोजनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून ११ विजेत्यांना मोबाईल तर ३३ स्पर्धकांना आकर्षक स्मृतीचिन्ह व सर्वांना टी-शर्ट मोफत देण्यात आले. भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.श्रीराम सेतू गोवर्धन घाट नांदेड येथे रविवारी सकाळी सहा वाजता भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते भाजपाचा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ विविज्ञ ॲड.प्रवीण आयाचित, मुकेश पटेल, सुधीर आंबेकर, राजू बच्चेवार, साईनाथ पदमवार, सुभाष वळबे, सुरेश इंदुरकर, गणेश गुरुपवार, सूर्यकांत सुवर्णकार यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रमुख अतिथीं...
error: Content is protected !!