Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
CRIME NEWS – हिमायतनगरचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर चाकू हल्ला; गंभीर जखमीवर नांदेड येथे उपचार सुरु – NNL

CRIME NEWS – हिमायतनगरचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर चाकू हल्ला; गंभीर जखमीवर नांदेड येथे उपचार सुरु – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर| येथील नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर येथील एका युवकाने चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात कुणाल राठोड हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णलयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर हिमायतनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.  हिमायतनगर येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड हे नेहमीप्रमाणे आपल्या मित्रासह श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयाच्या ओट्यावर दिनांक ०२ जुलै रात्री ११ वाजेच्या सुमारास बसून चर्चा करत होते. दरम्यान सोबतच काही मित्र गेले व एक मित्र लघवीसाठी बाजूला गेला होता. ही संधी साधून मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या राठोड यांच्यावर भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी याने चाकू हल्ला केला आहे. हा प्रकार लक्षात येताच राठोड यांच्या सोबतच्या मित्राने धावत येऊन अ...
शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाणारी मानव विकास मिशनची बस हिमायतनगर / सिरपल्ली चिखलमय रस्त्यामूळ फसली -NNL

शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाणारी मानव विकास मिशनची बस हिमायतनगर / सिरपल्ली चिखलमय रस्त्यामूळ फसली -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथून सिरपल्ली कडे शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाणारी मानव विकास मिशनची बस रस्त्यावर टाकलेलं मटेरियल व चिखलमय रस्त्यांच्या अडचणीमुळे फसली आहे. बुधवारी सकाळी ७ वाजतपासन तब्बल दोन तास एसटी बस अडकून राहिल्याने शालेय विद्यार्थी व आठवडी बाजारासाठी येणाऱ्या प्रवाशांना ताटकळत बसावं लागलं आहे. यामुळे पुन्हा एकदा हिमायतनगर पळसपुर डोल्हारी मार्ग शिरपल्ली जाणारा प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्यावर रिमझिम पावसामुळे चिखल निर्माण झाला असून, यामुळे नागरिक वाहनधारकांना आणि आता एसटी महामंडळच्या बसेसना देखील अडकून पडावे लागत हे. आत्तातरी मूग गिळून गप्प बसलेले राजकीय नेत्यांसह संबंधित गुत्तेदार,अभियंता या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे नेन्यासाठी प्रयत्न करतील का..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हिंग...
विभागीय व्यस्थापक नीती सरकारच्या दौऱ्यानंतर देखील इंटरसिटी रेल्वे वारंवार रद्द होत असल्याने प्रवाशांचे बेहाल – NNL

विभागीय व्यस्थापक नीती सरकारच्या दौऱ्यानंतर देखील इंटरसिटी रेल्वे वारंवार रद्द होत असल्याने प्रवाशांचे बेहाल – NNL

नांदेड
हिमायतनगर। आदिलाबाद नांदेड इंटरसिटी रेल्वे गेल्या अनेक महिन्यांपासून वेळेवर धावत नाही. कधी कधी तर अचानक बंद असल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगून मोकळे होतात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पेअवॉशन ऐन वेळी पुढे जायचं असल्याने अडथळे निर्माण होत असून, या प्रकारामुळे प्रवाशी वर्गातुन रेल्वेच्या ढिसाळ नियोजन बाबत नाराजी व्यक्त केली जाते आहे. एव्हढंच नाहीतर अचानक नांदेड रेल्वे डिव्हिजनच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी भेट देऊन आढावा घेतला, यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देतांना आता रेल्वे वेळेवर सुरु असल्याचे सांगितले त्यानंतर दोन वेळा आदीलाबाद नांदेड रेल्वे उशिरा धावत असल्याने रद्द झाली हे विशेष. नादेड रेल्वेच्या डिआरएम निती सरकार यांनी २२ जून रोजी हिमायतनगर रेल्वे स्थानकाला अचानक भेट देऊन येथील कामकाज व प्रवाशांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. रेल्वे ...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत -NNL

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत -NNL

Blog
मुंबई। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यावेळी उपस्थित होते. योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून ल...
माहितीचा अधिकार; द्वितीय अपिलासाठी एसएमएस, ई- मेल, व्हॉटसॲप ग्रुप व वेबसाईटवर नोटीस, निर्णय मिळणार -NNL

माहितीचा अधिकार; द्वितीय अपिलासाठी एसएमएस, ई- मेल, व्हॉटसॲप ग्रुप व वेबसाईटवर नोटीस, निर्णय मिळणार -NNL

महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर| माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे असणाऱ्या द्वितीय अपिल सुनावणीसाठीची नोटीस तसेच अपिल निर्णय इ. आता एसएमएस, ई-मेल. व्हॉट्स ॲप ग्रुप व वेबसाईटवर देण्यात येण्याची व्यवस्था खंडपीठाने केली आहे, अशी माहिती राज्य माहिती  आयोगाच्या खंडपीठ छत्रपती संभाजीनगरचे राज्य माहिती आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली आहे. राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाद्वारे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, द्वितीय अपिलासाठी  सुनावणीची नोटीस ही टपालाद्वारे पाठविण्यात येते. मात्र बऱ्याचदा या नोटीस अपिलार्थिंना, जनमाहिती अधिकाऱ्यांना वेळेत प्राप्त होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यासाठी द्वितीय अपिल सुनावणीसाठी अपिलार्थी, जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांना एसएमएस, ई- मेल, वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच त्या त्या जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्यांच्य...
सीईओ मीनल करणवाल यांच्या उपस्थितीत 4 जुलै रोजी हिमायतनगर येथे तक्रार निवारण सभा -NNL

सीईओ मीनल करणवाल यांच्या उपस्थितीत 4 जुलै रोजी हिमायतनगर येथे तक्रार निवारण सभा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| हिमायतनगर पंचायत समिती येथे गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात तक्रार निवारण सभा घेण्यात येणार आहे. हिमायतनगर तालुक्यातील विविध विषयासंदर्भात पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त झालेल्या तक्रारीचा निपटारा यावेळी करण्यात येणार आहे. ज्या तक्रारदारांनी तक्रारी दिलेल्या आहेत अशा तक्रारदारांना पंचायत समितीच्या वतीने उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख तक्रार निवारण सभेसाठी उपस्थित राहून तक्रारींचा निपटारा करणार आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी दिली आहे....
हिमायतनगर तालुक्यातील पारवा खुर्द ते पोटा बु. रस्त्यावर अल्प पाऊस होताच चिखलाचे साम्राज्य विद्यार्थिनीसह नागरिक त्रस्त – NNL

हिमायतनगर तालुक्यातील पारवा खुर्द ते पोटा बु. रस्त्यावर अल्प पाऊस होताच चिखलाचे साम्राज्य विद्यार्थिनीसह नागरिक त्रस्त – NNL

नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पारवा खुर्द ते पोटा बु.कडे जाणाऱ्या रस्त्यावर अल्पसा पाऊस होताच मोठ्याप्रमाणात चिखल होत आहे. परिणामी पोटा बु. येथे शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थिनीसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हि समस्या लक्षात घेता लोकप्रतिनिधीं व प्रशासनाने दखल घेऊन गावाजवळील रस्त्यासाठी मंजूर घेऊन रास्ता चांगला करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे . नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पारवा खुर्द येथील नागरिकांना बाजारासाठी पोटा बु. येथे येऊन बसने व खाजगी वाहनातून भोकर व हिमायतनगर येथे जावे लागते. तर विद्यार्थिनी विद्यार्थ्याना शिक्षणासाठी पोटा बु जवळगाव हिमायतनगर भोकर येथे जावे लागते. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने काही रिमझिम पाऊस बरसात असल्याने पारवा गावाजवळील रास्ता चिखलमय होत आहे. त्यामुळे रस्त्याची घसररगुंडी होत असून, रस्त्याने पायी चालण्...
हिमायतनगर तालुक्यात खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात ; दमदार पावसाची प्रतिक्षा – NNL

हिमायतनगर तालुक्यात खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात ; दमदार पावसाची प्रतिक्षा – NNL

नांदेड
हिमायतनगर| तालुक्यात चांगल्या प्रकारे पाऊस बरसल्याने खरिपाच्या पेरणीला आता वेग आला आहे. जवळपास ७०% पेरण्या पुर्णत्वास आल्या असून, उर्वरित पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. या वर्षी ३९ हजार ६४४ हेक्टर जमिनीवर खरिपाची पेरणी होणार आहे. यात नगदी पिक सोयाबीनचा पेरा एक नंबर राहणार असून, कपाशी दोन नंबर वर राहणार आहे. तालुक्यातील काही भागात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने अनेक शेतकऱ्यानी सुरुवातीला केलेली पेरणी धोक्यात आली असून, त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात ४९ हजार ६७८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून पेरणीयोग्य क्षेत्र ३९ हजार ८७० हेक्टर आहे. गेल्या खरिप हंगामात ३९ हजार ६४४ हेक्टर वर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. गेल्या वर्षी सर्वाधिक १९ हजार ८५७ हेक्टर वर नगदी पिक सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. तर कपाशीची लागवड १४ हजार २२४ हेक्टर वर ...
‘हिंदू इकोसिस्टम’ बनवण्यासाठी प्रत्येक राज्यात हिंदू राष्ट्र समन्वय समितीची स्थापना करून हिंदूंवरील अन्यायांच्या विरोधात जनआंदोलन करणार -NNL

‘हिंदू इकोसिस्टम’ बनवण्यासाठी प्रत्येक राज्यात हिंदू राष्ट्र समन्वय समितीची स्थापना करून हिंदूंवरील अन्यायांच्या विरोधात जनआंदोलन करणार -NNL

Blog
गोवा| दरवर्षी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी देशविदेशातून येणार्‍या, तसेच ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेशी जोडलेल्या सर्व हिंदू संघटनांनी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून वर्षभर कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यातून हिंदु ‘इको-सिस्टीम’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज काश्मीर, बंगाल आदी प्रांतांतील हिंदूंवरील अत्याचार देशभरात चालू झाले आहेत. त्यामुळे शासनाला हिंदूंच्या प्रश्नांची दखल घ्यायला लावणारा ‘दबावगट’ कार्यरत करण्यात येणार आहे. सेक्युलरवादाच्या नावे केले जाणारे अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण बंद करण्यात यावे आणि हिंदू समाजावरील अन्यायांच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर जनआंदोलन उभारून ‘हिंदु राष्ट्र निर्मिती’च्या कार्याला देशभर गती देण्यात येणार आहे, अशी माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट...
सेतू केंद्र चालकांनी अधिकचे शुल्क आकारल्यास लेखी स्वरुपात तक्रार नोंदवा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

सेतू केंद्र चालकांनी अधिकचे शुल्क आकारल्यास लेखी स्वरुपात तक्रार नोंदवा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

नांदेड
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाच्यावतीने नुकतीच सुरु केली आहे. या योजनेत अर्ज करताना नागरिकांना विविध प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे. ही प्रमाणपत्र, दाखले काढण्यासाठी नागरिकांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून अर्ज करुन काढून घ्यावेत. ही प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतू केंद्र चालकांनी निर्धारित सेवा शुल्का व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारल्यास नागरिकांनी संबंधित तहसिलदाराकडे लेखी स्वरुपात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी अर्जदाराने राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (रहीवासी प्र...
error: Content is protected !!