Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
महिलांनो ! “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी “नारी शक्ती दूत ॲप” डाउनलोड करा -NNL

महिलांनो ! “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी “नारी शक्ती दूत ॲप” डाउनलोड करा -NNL

महाराष्ट्र
नांदेड| राज्य शासनाने “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक केला आहे. त्यासाठी कोणताही ॲनरॉईड मोबाईलवर नारी शक्ती दूत ॲप सहजरित्या डाउनलोड केल्या जाते. यावर आपला अर्ज दाखल करावा. ऑनलाईन अर्जामुळे मध्यस्थांकडून पैशांची मागणी होणार नाही व कोणतीही फसवणूक होणार नाही. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांना मदत करण्यासाठी सोमवारपासून गावागावात शिबीर सुरू होतील. यामध्ये मागेपुढे होऊ शकते. मात्र त्यासाठी गोंधळ, गडबड करू नये. प्रशासनाकडून सर्व पात्र महिलांना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज यासंदर्भात सर्व तहसिलदार, सर्व मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी तसेच यासंदर्भातील सर्व यंत्रणेतील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. अंगणवाडी सेविकेजवळ, नगरपालिकेमध्ये शहरासाठी प्रभाग कार्या...
ना.पा.वि. दक्षिण विभागात दोन महिन्यांपासून पगार नाही, कर्मचारी हैराण -NNL

ना.पा.वि. दक्षिण विभागात दोन महिन्यांपासून पगार नाही, कर्मचारी हैराण -NNL

नांदेड
नांदेड| नांदेड पाटबंधारे विभाग दक्षिण येथील कर्मचार्‍यांचे दोन महिन्यांपासून पगार झाले नसल्यामुळे संबंधित विभागाचे कर्मचारी हैराण झाले असून संबंधित कर्मचार्‍यांचे पगार त्वरित करण्याची मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक सिध्दार्थ तलवारे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे. शासन निर्णयानुसार बॅक खात्यात आधारकार्ड अथवा पॅनकार्ड जोडले नसल्यास पगाराची वीस टक्के रक्कम थांबवून पगार करणे अपेक्षित होते तथापि नांदेड पाटबंधारे विभाग दक्षिण च्या कार्यकारी अभियंत्यांनी कर्मचार्‍यांचे मे व जून महिन्यातील वेतन अदा करण्यासाठी कसलीच कार्यवाही केली नाही. परिणामी कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत. अनेक कर्मचार्‍यांच्या पाल्यांचे शैक्षणिक कार्यासाठी लागणारे हप्ते व विविध प्रकारचे हप्ते थकले आहेत. या संदर्भात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ तलवारे...
हिमायतनगर येथे सीईओंच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण -NNL

हिमायतनगर येथे सीईओंच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण -NNL

नांदेड
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या उपस्थितीत हिमायतनगर पंचायत समिती येथे गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी उपस्थित नागरिंकांच्‍या समस्यांवर चर्चा करुन निवारण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुखांची उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नागरिकांच्या व्यक्तिगत तक्रारी ऐकून त्यांच्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. तक्रार निवारण दिनाच्या आयोजनामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांबाबत त्वरित उत्तर मिळाली. तक्रार निवारण उपक्रमाम...
6 जुलै सकाळी 6 पासून ते 20 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू -NNL

6 जुलै सकाळी 6 पासून ते 20 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात 6 जुलै 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 20 जुलै 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 6 जुलैच्या सकाळी 6 वाजेपासून ते 20 जुलै 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना...
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन – NNL

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन – NNL

नांदेड
नांदेड| केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव https://awards.gov.in या संकेतस्थळावर 31 जुलै 2024 पर्यंत करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै 2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक ...
कृषि विभागाचे विविध कृषि पुरस्कार -NNL

कृषि विभागाचे विविध कृषि पुरस्कार -NNL

नांदेड
नांदेड| राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत सन 2023 या वर्षांमध्ये कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्था यांच्याकडून विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकरी, गट, संस्था, व्यक्तींनी कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. जिल्ह्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गटांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतर...
महिलांच्या योजना, कायदे आणि संरक्षण संदर्भात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत आढावा – NNL

महिलांच्या योजना, कायदे आणि संरक्षण संदर्भात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत आढावा – NNL

नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्ह्यातील विद्यार्थीनीपासून ते गृहिणी पर्यंत, परितक्तापासून कामगार महिलांपर्यंत सर्वांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी योजनांची सर्वदूर प्रसिद्धी व लाभ देण्याचे लक्षांश वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. यासोबतच राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामुहिक सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची पुनर्रचित बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली 4 जुलै रोजी करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवा...
नैसर्गिक आपत्तीचे पूरग्रस्तांचे अनुदान अजून वाटप झाले नाही ; प्रशासन येवढे उदासीन का? – NNL

नैसर्गिक आपत्तीचे पूरग्रस्तांचे अनुदान अजून वाटप झाले नाही ; प्रशासन येवढे उदासीन का? – NNL

नांदेड
नांदेड| २६-२७ जुलै २०२३ रोजी नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती.१९० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन च्या वतीने शहरात सर्वेक्षण करून पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. ३६ वेळा वेगवेगळी आंदोलने प्रशाकीय कार्यालया समोर करण्यात आली. शेवटी दहा हजार रुपये प्रति पीडितास मंजूर करण्यात आले. एकूण नऊ कोटी रुपये नांदेड शहरातील पूरग्रस्तांना मंजूर झाले होते. त्यापैकी साडे सात कोटी सोईनुसार वाटप करण्यात आले असून राहिलेले दीड कोटी वाटपास तहसील आणि मनपा प्रशासनाने हयगई केली आहे. सीटू कामगार संघटनेच्या नेतृत्वात १३५ दिवस साखळी उपोषण करण्यात आले. सद्यस्थितीत देखील १० जून पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर चार दिवस आमरण उपोषण व १४ जून पासून बेमुद्दत साखळी उपोषण सुरूच आहे. शासन आदेशाचे उलंघन करून अनुदान वाटप करणाऱ्यांना जिल्हाधिकारी...
विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील वडजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न – NNL

विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील वडजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न – NNL

नांदेड
नांदेड। सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते आज घडीला मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी म्हणून सर्वपरिचित असणारे शिवश्री शाम पाटील वडजे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मराठा युवा क्रांती महाराष्ट्र राज्य व शिवनेरी प्रतिष्ठान च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.सामाजिक भान जपत सामाजिक कार्यकर्त्याने पुन्हा एकदा समाजाने अनुकरण करावा असा सामाजिक ऋणानुबंध जपणारा उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला. श्याम पाटील वडजे यांच्या वाढदिवसानिमित्त आज घडीला मराठवाड्यामध्ये रक्ताची कमतरता भासत आहे. या गोष्टीची जाण ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. निसर्गाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी पर्यावरणाकडे त्याचबरोबर चिरंतन नैसर्गिक समतोल राहावा व भारतात सर्वात जास्त उष्णता असलेला म्हणून नांदेडची झालेली नोंद या सर्व गोष्टीचा विचार करत 1000 वृक्षाचे वृक्षरो...
भर उन्हात पावसात मुख्यमंञ्यांच्या लाडकी बहीणींची धावपळ… NNL

भर उन्हात पावसात मुख्यमंञ्यांच्या लाडकी बहीणींची धावपळ… NNL

नांदेड
हदगाव, शे.चांदपाशा| मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच लाभ घेण्यासाठी सुरुवातीला अधिवास प्रमाणपञ अवश्यक करण्यात आले होते. माञ आता लाभार्थी महीलेकडे आधिवासपञ उपलब्ध नसेल तरी चालणार आहे. त्या ऐवजी महीलाकडे १५ वर्षाच रेशन कार्ड जन्म दाखला मतदान ओळखपञ किवा शाळा सोडण्याचे प्रमाण पञ यापैकी ओळखपञ असल्यास ही ग्राहय धरले जाणार असल्याचे नंतर सरकार कडुन सागण्यात आले. तो पर्यत तलाठी नगरपालिका तहसिल कार्यालय मध्ये या करिता लाडकी बहीनीना या कार्यालयात कागदपञे काढण्या करिता अनेक समस्याचा सामना करावा लागला. कार्यालयात ना पिण्याच्याच्या पाण्याची सोय ना बसण्याची सोय नाही घामाने लाडक्या बहीनी ओल चिंब झाल्याचे चिञ तलाठी नगरपालिका व तहसिल कार्यालय मध्ये पाहायावायस मिळत आहे. जन्मच्या दाखल्या करिता गर्दी होणार आहे. याची माहीती असतांना ही माञ संबंधित विभागाने या बाबतीत ठोस नियोजन दिसुन आलेल नाही. तहसिल कार्यालया...
error: Content is protected !!